अमरावतीकरांना लुटले! अवघ्या ५ महिन्यांत तब्बल २.२२ कोटींचा सायबर दरोडा; ‘हा’ ठरतोय सर्वाधिक मोठा सापळा | Amravati Cyber Fraud

Amravati Cyber Fraud : डिजिटल क्रांतीच्या या युगात ऑनलाईन फसवणुकीचे एक अत्यंत थरकाप उडवणारे वास्तव अमरावती शहरात समोर आले आहे. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यात सायबर चोरांनी अमरावतीच्या लोकांच्या कष्टाच्या पैशांवर मोठा हाथ मारला आहे.

सायबर भामट्यांनी नागरिकांच्या खिशावर तब्बल २ कोटी २२ लाख ८६ हजार ३३८ रुपयांचा अवाढव्य दरोडा टाकला आहे. या पाच महिन्यांत शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे एकूण १७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

‘शेअर मार्केट गुंतवणूक’ : चोरांचे सर्वात मोठे हत्यार!

नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता, सायबर चोरांनी अमरावतीकरांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘शेअर मार्केट गुंतवणूक’ या नावाचा सर्वाधिक वापर केल्याचे उघड झाले आहे. एकूण १७ गुन्ह्यांपैकी एकट्या शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ७ गुन्हे दाखल झाले आहेत.

घरी बसून कमी काळात कोट्यधीश होण्याच्या किंवा अवाजवी रिटर्न्स मिळविण्याच्या आमिषाला बळी पडून नागरिकांनी आपले लाखो रुपये चुकीचे ट्रेडिंग ॲप्स आणि खोट्या सल्लागारांना दिले आहेत.

Also Read : Chandrapur : स्मशानभूमीत अघोरी विधीचा संशय; अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच रंगला थरार, तिघे जखमी.

गुन्‍ह्यांची तुलनात्मक स्थिती आणि वेगवेगळ्या क्लृप्त्या | Amravati Cyber Fraud

सायबर गुन्हेगार केवळ एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन आमिषे दाखवत आहेत:

शेअर मार्केटपाठोपाठ इतर फसवणुकीचे प्रकार

  • शेअर मार्केट गुंतवणूक : ७ गुन्हे
  • ऑनलाईन फसवणूक : सर्वसाधारण प्रकारातील ३ गुन्हे दाखल
  • वर्क फ्रॉम होम टास्क : घरबसल्या कामाच्या नावाखाली नागरिकांना फसवणारा १ गुन्हा
  • यूट्यूब चॅनल लाईक्स : व्हिडिओ लाईक करून पैसे कमावण्याच्या आमिषाचा १ गुन्हा
  • इन्स्टंट लोन ॲप्स : माहिती न पडता कर्जाच्या जाळ्यात ओढणारा १ गुन्हा
  • ऑनलाईन ई-लिलाव : बनावट ई-लिलावाच्या नावाखाली झालेली फसवणुकीचा १ गुन्हा
  • मोबाईल टॉवर इन्स्टॉलेशन : घराबाहेर टॉवर बसवण्याच्या बहाण्याने फसवणारा १ गुन्हा
  • डेबिट कार्ड क्लोनिंग/फ्रॉड : बँक कार्डचा डेटा चोरून केलेला १ गुन्हा
  • बनावट डिस्ट्रिब्युटरशिप : नामांकित कंपन्यांची खोटी डीलरशिप देण्याच्या बहाण्याने झालेला १ गुन्हा

अमरावती पोलिसांची तत्परता: ४५ लाख रुपये केले फ्रीज!

जरी सायबर चोरांनी २.२२ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली असली, तरी अमरावती शहर पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झालेली ४५ लाख ४० हजार ३०७ रुपयांची रक्कम ‘होल्ड’ म्हणजेच गोठवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे ही रक्कम चोरांच्या हाती लागण्यापासून वाचली आहे.

याशिवाय ६ लाख ३० हजार रुपये जे पीडित लोक आहेत त्यांना यशस्वीरीत्या पैसे परत मिळवून देण्यात आले आहेत.

Also Read : चंद्रपुरात भामट्यांचा नवा फंडा ‘आम्ही पोलीस आहोत’ सांगत भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाचे ८ तोळे सोने लुटले

सन २०२६ (मे महिन्यापर्यंतची अधिकृत आकडेवारी)

तपशील आकडेवारी
एकूण एफआयआर (FIR) १७
चोरीला गेलेली एकूण रक्कम ₹ २,२२,८६,३३८
पोलिसांनी होल्ड केलेली रक्कम ₹ ४५,४०,३०७
पीडितांना परत मिळालेली रक्कम ₹ ६,३०,०००

महत्त्वाचा इशारा आणि कायदेशीर आवाहन

नागरिकांनी अनोळखी ऑफर्स, अनोळखी व्यक्तींनी सुचवलेले ॲप्स आणि संशयास्पद लिंक्सपासून अत्यंत सावध राहावे.

अशाच सायबर सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स, ताज्या घडामोडी थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!

Amravati : आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

12 + twelve =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.