Hospital Cyber Attack : सावधान! आता सायबर चोरांचे लक्ष तुमच्या आरोग्यावर, आरोग्याचा डेटा चोरीची भीती

Hospital Cyber Attack : सध्याच्या डिजिटल युगात आरोग्यसेवा जेवढी हायटेक आणि वेगवान झाली आहे, तेवढाच एक मोठा धोका आता समोर येऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांनी आता आपला मोर्चा आरोग्य क्षेत्राकडे वळवला असून रुग्णांचा अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील वैद्यकीय डेटा त्यांच्या निशाण्यावर आला आहे.

नुकतीच केरळमधील एर्नाकुलम येथील एका नामांकित खाजगी रुग्णालयाची तब्बल ८०० जीबी (GB) डेटा बँक हॅकर्सनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

डार्कवेबवर विक्री आणि गोपनीयतेला मोठा धोका!

डॉ. योगेश पांडे यांच्या विश्लेषणानुसार, आंतरराष्ट्रीय सायबर चोरांच्या टोळीने रुग्णालयाच्या संगणक प्रणालीमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. या चोरी झालेल्या डेटामध्ये रुग्णांचे वैद्यकीय अहवाल, तपासणी निष्कर्ष, वैयक्तिक माहिती, प्रशासकीय कागदपत्रे आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या नोंदींचा समावेश आहे. हा संपूर्ण डेटा आता ‘डार्कवेब’वर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने हजारो रुग्णांची गोपनीयता धोक्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अशीच एक घटना काही काळापूर्वी नागपुरातही समोर आली होती, जिथे एका डॉक्टराने दुसऱ्या डॉक्टरांच्या रुग्णालयातील महत्त्वाचा डेटा अनधिकृतपणे चोरल्याचा आरोप झाला होता.

Also Read : गुटखा माफियांना थेट जेलची हवा! अवैध विक्री करणाऱ्यांवर आता लागणार ‘मकोका’; तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय.

तुमचा वैद्यकीय डेटा हॅकर्ससाठी का महत्वाचा आहे?

आरोग्य क्षेत्रातील माहिती ही बँक खात्याच्या तपशिलापेक्षाही अधिक संवेदनशील मानली जाते, कारण:

बदलणे अशक्य | Hospital Cyber Attack

माणसाचे नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलता येऊ शकतो; मात्र त्याचा वैद्यकीय इतिहास, आजारपण, शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्य किंवा अनुवंशिक माहिती कधीही बदलता येत नाही.

Also Read : सायबर फ्रॉड झालेल्यांसाठी गूड न्यूज! गेलेले पैसे आता थेट खात्यात होणार जमा

दुष्परिणाम:

ही माहिती चुकीच्या हातात गेल्यास बनावट कर्ज प्रकरणे, वैद्यकीय विमा फसवणूक, ओळख चोरी आणि खंडणीसाठी प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल केले जाऊ शकते. हॅकर्स या माहितीचा वापर फिशिंग हल्ल्यांसाठीही करतात.

रुग्णालयांची निष्काळजीपणा आणि सायबर ऑडिटची गरज

कोविडनंतरच्या काळात हॉस्पिटल्स, निदान केंद्रे आणि विमा कंपन्यांमध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड आणि क्लाउड स्टोरेजचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

मात्र, अनेक लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये सायबर सुरक्षेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नियमित सुरक्षा तपासणीचा (Security Audit) अभाव दिसून येतो.

या त्रुटींचा फायदा हॅकर्स घेत आहेत. यावर उपाय म्हणून रुग्णालयांनी डेटा एन्क्रिप्शन, मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन, फायरवॉल मजबूत करणे आणि कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देणे आता अनिवार्य झाले आहे.

“डिजिटल युगात केवळ बँक खात्याचीच नव्हे, तर स्वतःच्या आरोग्याचे दस्तऐवज गुपित ठेवणेही खूप महत्त्वाचे झाले आहे. कोणतीही अज्ञात किंवा संशयास्पद ई-मेल लिंक आणि मेसेजवर क्लिक करणे टाळा. रुग्णालयांनी आणि नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक सजग राहणे ही काळाची गरज आहे!”

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा

अशाच नवनवीन सायबर क्राईम अलर्ट्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील बातम्यांचे थेट अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

three × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.