Nagpur Water Crisis : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! मान्सून लांबल्याने शहरावर जलसंकटाचे सावट.

Nagpur Water Crisis : विदर्भासह नागपूर शहरात अद्यापही मान्सूनने हजेरी न लावल्यामुळे उपराजधानीवर पाणीटंचाईचे मोठे संकट घोंगावू लागले आहे. जून महिना संपत आला तरी उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही, ज्यामुळे जलशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जर पाऊस आला नाही तर, नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागपूर ...
Read moreआंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७७ डॉलरवर घसरले, तरीही भारतात पेट्रोल महागच! सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार? | Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत कमालीची घट झाली असली, तरी देशातील सामान्य नागरिकांना मात्र त्याचा कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ११५ अमेरिकन डॉलरवरून घसरून शनिवारी थेट ७७.३३ डॉलरपर्यंत खाली आले आहेत. एवढी मोठी घसरण होऊनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे ...
Read moreHospital Cyber Attack : सावधान! आता सायबर चोरांचे लक्ष तुमच्या आरोग्यावर, आरोग्याचा डेटा चोरीची भीती

Hospital Cyber Attack : सध्याच्या डिजिटल युगात आरोग्यसेवा जेवढी हायटेक आणि वेगवान झाली आहे, तेवढाच एक मोठा धोका आता समोर येऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांनी आता आपला मोर्चा आरोग्य क्षेत्राकडे वळवला असून रुग्णांचा अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील वैद्यकीय डेटा त्यांच्या निशाण्यावर आला आहे. नुकतीच केरळमधील एर्नाकुलम येथील एका नामांकित खाजगी रुग्णालयाची तब्बल ८०० ...
Read moreसायबर फ्रॉड झालेल्यांसाठी गूड न्यूज! गेलेले पैसे आता थेट खात्यात होणार जमा | Steps to recover money after cyber crime

Steps to recover money after cyber crime : ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला (Cyber Fraud) बळी पडणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. सायबर चोरांनी लंपास केलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता पीडित व्यक्तीला कोर्ट किंवा बँकांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने’ (I4C) ...
Read moreरेल्वेच्या खिडकीला गळफास, बाहेर लटकत होता मृतदेह! ‘त्या’ दृश्याने तुमसर रोड स्टेशन हादरले; हत्या की आत्महत्या? | Tumsar Train Death Mystery

Tumsar Train Death Mystery : तुमसर रेल्वे स्थानकामध्ये गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. एका धावत्या प्रवासी ट्रेनच्या डब्याबाहेर चक्क एका अज्ञात युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत असताना आढळून आला. या भयावह दृश्याने रेल्वे प्रवाशांसह प्रशासन देखील घाबरले आहेत. ही घटना केवळ एक आत्महत्या ...
Read more‘मॅट्रिमोनी’वर बनला सिरीयल थग! लग्नाचे आमिष दाखवून नागपूरच्या तरुणीला तब्बल ४६.९७ लाखांचा गंडा | Nagpur Matrimonial Fraud

Nagpur Matrimonial Fraud : इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून नागरिकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. नागपूर शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या ‘सिव्हिल लाईन्स’ परिसरातील एका सुशिक्षित तरुणीला अशाच एका आंतरराष्ट्रीय सायबर भामट्याने आपल्या जाळ्यात ओढले आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि भावनिक साद घालत या ठकबाजाने तरुणीची ...
Read more‘मूल होत नाही म्हणून टोमणे आणि माहेरची ५ एकर शेती नावावर कर’; सासरच्या जाचाला कंटाळून तरुण शिक्षिकेची आत्महत्या | Ghuggus Teacher Suicide Case

Ghuggus Teacher Suicide Case : मूल होत नसल्याचे टोमणे, चारित्र्यावरील संशय आणि माहेरची मालमत्ता हडपण्याची हाव… अशा अनेक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहित शिक्षिकेने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसगाव येथे हा प्रकार उघडकीस आला असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. करिश्मा ...
Read moreअखेर मान्सूनचा ब्रेक संपणार; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा धडाका, पण चिंतेची बाब काय? | Rain Alert Maharashtra

Rain Alert Maharashtra : गेल्या बऱ्याच दिवसांपासून गायब झालेल्या मान्सूनबद्दल शेवटी एक आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनचा खोळंबलेला प्रवास पुढील आठवड्यात म्हणजेच २४ ते २५ जूनपासून पुन्हा एकदा गतिमान होणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या भागात अडकून पडलेल्या मान्सूनमुळे देशभरात चिंतेचे ढग जमा झाले होते, ...
Read moreसरकारी शाळांचा कायापालट होणार! आता बडे अधिकारी शाळा ‘दत्तक’ घेणार; विद्यार्थ्यांना मिळणार खासगीसारख्या हायटेक सुविधा | One Officer One School Scheme

One Officer One School Scheme : शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच गेल्या काही वर्षांत वेगाने घटलेली पटसंख्या रोखण्यासाठी शिक्षण विभागाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील सरकारी शाळा आता वाऱ्यावर न सोडता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात दिल्या जाणार आहेत. नव्या निर्णयानुसार, शिक्षण विभागातील वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या उच्च ...
Read moreकॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा सरकारवर घणाघात, २० जूनपासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा! | Abhijeet Dipke in Nagpur

Abhijeet Dipke in Nagpur : नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमधील कथित गोंधळ, गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे देशातील तरुण वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात ‘शिक्षण वाचवा, देश बदलवा’ अशी हाक देत ‘जेन-झी’ (Gen-Z) म्हणजेच आजच्या तरुण पिढीने एक विराट आणि आक्रमक आंदोलन छेडले. हातात संविधानाची प्रत आणि शिक्षण ...
Read more