Yavatmal Online Fraud : डिजिटल युगात बँक खाती सुरक्षित ठेवणे हे नागरिकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यासह पांढरकवडा शहर आणि ग्रामीण भागात मोबाईलवर एक अत्यंत संशयास्पद संदेश (मेसेज) वेगाने पसरत आहे.
या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करण्याचा एक भयानक कट सायबर गुन्हेगारांनी रचला आहे. “तुमच्या खात्यात १०,८७८ रुपयांचा कॅशबॅक मंजूर झाला आहे,” अशा स्वरूपाचे खोटे आमिष दाखवून नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) हे बनावट संदेश धडकत आहेत.
नेमका कसा येतोय हा बनावट संदेश?
नागरिकांच्या मोबाईलवर प्रामुख्याने इंग्रजीत मेसेज येत असून त्याचा ढोबळमानाने अर्थ असा आहे:
“नमस्कार, तुमचा १०,८७८ रुपयांचा रिफंड मान्य झाला असून, तुम्ही मागविलेली सर्व सामग्री पाठवण्यात आली आहे.
आमच्या सेवेचा वापर केल्याबद्दल धन्यवाद. खालील दिलेल्या जागेवर क्लिक करा…”
या मजकुराच्या शेवटी एक संशयास्पद आणि घातक लिंक (दुवा) दिलेली असते.
लिंकवर क्लिक करताच काय होते? | Yavatmal Online Fraud
सायबर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेसेजमधील निळ्या रंगाच्या लिंकवर युझरने क्लिक करताच मोबाईलमध्ये एक छुपे आणि अत्यंत धोकादायक सॉफ्टवेअर (व्हायरस) कोणत्याही परवानगीशिवाय ऑटोमॅटिक डाउनलोड होते.
त्यानंतर, जेव्हा नागरिक आपले इंटरनेट बँकिंगचे आयडी-पासवर्ड किंवा युपीआय (UPI) पिन टाकतात, तेव्हा ती सर्व प्रकारची बंद माहिती सरळ चोरांपर्यंत पोहोचते. अवघ्या काही सेकंदांत नागरिकांचे बँक खाते पूर्णपणे रिकामे केले जाते.
Also Read : Amravati : नोकरीचे आमिष दाखवून १८ वर्षीय तरुणीला डांबले; चाकूचा धाक दाखवत 2 नराधमांनी केला अत्याचार!
नागरिकांनो, ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या!
लिंक ओपन करू नका:
कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमधील निळ्या रंगाच्या दुव्यावर (Link) चुकूनही क्लिक करू नका.
गोपनीय माहिती शेअर टाळा:
बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा पिन किंवा मोबाईलवर आलेला वन टाईम पासवर्ड (OTP) कोणालाही सांगू नका.
अफवा पसरवू नका:
जर तुम्हाला एखादा संदेश खोटा किंवा संशयास्पद वाटत असेल, तर तो इतर व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवून अफवा पसरवण्यास मदत करू नका.
फसवणूक झाल्यास त्वरित काय करावे?
जर तुमच्याकडून चुकून त्या लिंकवर क्लिक झाले आणि खात्यातून पैसे चोरीला गेले, तर अजिबात घाबरून जाऊ नका. अशा वेळी १ ते २ तासांच्या आत आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधून खाते आणि कार्ड तात्काळ ब्लॉक करून घ्यावे.
याशिवाय, केंद्र सरकारच्या ‘१९३०’ (1930) या राष्ट्रीय सायबर मदत क्रमांकावर त्वरित कॉल करून आपली तक्रार नोंदवावी, जेणेकरून चोरीला गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.
Also Read : पतीला सोड, माझ्याकडे ये!’ न्यूड फोटो काढून विवाहितेवर अमानुष अत्याचार; पुण्याच्या जिम ट्रेनरविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल
सतर्कता हाच एकमेव उपाय
कोणतीही बँक किंवा नामांकित ऑनलाईन खरेदी विक्री करणारी कंपनी ग्राहकांना थेट १० ते ११ हजार रुपयांचा परतावा मोफत देत नाही. सायबर चोर हे नेहमी माणसाच्या पैशांच्या मोहाचा गैरफायदा घेतात. सतर्कता असणे हा मात्र एकच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे. स्वतः सावध राहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा!
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा
अशाच महत्त्वाच्या, माहितीपूर्ण आणि सायबर सुरक्षेच्या ताज्या अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!
