Helmet Rule 2026 : दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केवळ पोलिसांचा दंड वाचवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या प्राणाच्या रक्षणासाठी आहे, हे आता अमरावतीकरांना चांगल्याच कडक भाषेत समजणार आहे.
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी विनाहेल्मेट सुसाट धावणाऱ्या दुचाकीस्वारांना लगाम घालण्यासाठी एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. येत्या २२ जूनपासून संपूर्ण अमरावती ग्रामीण पोलीस क्षेत्रात हेल्मेट सक्तीची ‘विशेष मोहीम’ राबवली जाणार असून, नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी गुल होणार आहे.
केवळ दंड नाही, तर ‘नो ड्रायव्हिंग’चा दणका!
अनेकदा वाहन वागणारे काही रुपयांचा दंड भरून पुन्हा हेल्मेट न लावता फिरताना सऱ्यास दिसतात.
मात्र, आता तसे चालणार नाही. २२ जूननंतर जर तुम्ही विनाहेल्मेट आढळलात, तर जागेवरच जबर दंड तर आकारला जाईलच, पण सोबतच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ (सुधारित कायदा २०१९) नुसार तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते. म्हणजेच, पुढील ३ महिने तुम्हाला गाडी चालवता येणार नाही.
धक्कादायक आकडेवारी: प्राणांतिक अपघातांमध्ये ७०% दुचाकीस्वार!
पोलिस प्रशासनाने हा कडक निर्णय घेण्यामागे जिल्ह्यातील अपघातांची वाढती आणि चिंताजनक आकडेवारी आहे:
Read Also : अमरावतीकरांना लुटले! अवघ्या ५ महिन्यांत तब्बल २.२२ कोटींचा सायबर दरोडा; ‘हा’ ठरतोय सर्वाधिक मोठा सापळा.
अपघातांची आकडेवारी | Helmet Rule 2026
- सन २०२४: जिल्ह्यात ५७१ भीषण अपघात झाले.
- सन २०२५: अपघातांची संख्या वाढून ५१९ वर पोहोचली.
- चालू वर्ष (१ जानेवारी २०२६ ते ३१ मे २०२६): अवघ्या ५ महिन्यांत तब्बल २२२ अपघातांची नोंद झाली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्राणांतिक अपघातांपैकी जवळपास ७० टक्के अपघात हे दुचाकीचालकांचे झाले आहेत. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अनेकांना आपले नाहक प्राण गमवावे लागले आहेत.
मागे बसणाऱ्यालाही नियम लागू!
हा नियम केवळ दुचाकी चालवणाऱ्यासाठीच नाही, तर त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांवर हा नियम कडकपणे लागू केला जाणार आहे.
Also Read : Chandrapur : स्मशानभूमीत अघोरी विधीचा संशय; अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच रंगला थरार, तिघे जखमी.
सुरक्षिततेसाठी हेल्मेटची सवय अंगीकारा
“हेल्मेट हे तुमच्या डोक्यावरील ओझे नसून तुमच्या आयुष्याचे सुरक्षा कवच आहे. पोलिसांच्या दंडाला घाबरण्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याची सवय आजच अंगीकारा. सुरक्षित राहा, सुरक्षित प्रवास करा!”
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा
अशाच नवनवीन, शासकीय नियम आणि अमरावती जिल्ह्यातील ताज्या घडामोडींच्या विश्वासार्ह अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.
