Smart Meter Installation Notice Yavatmal : सर्वसामान्यांकडून होणारा तीव्र विरोध धुडकावून लावत वीज वितरण कंपनीने अखेर स्मार्ट वीज मीटर बसवण्याची मोहीम अत्यंत आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आता थेट कंपनीकडून ४८ तासांची अंतिम चेतावणी देणारे (Warning) मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, हे मेसेज वरिष्ठ पातळीवरूनच पाठवले जात असल्याचे स्पष्टीकरण वीज वितरण कंपनीने दिले आहे.
२० हजार ग्राहकांच्या घरात बसले मीटर; ग्राहकांना मनस्ताप?
यवतमाळ विभागात आतापर्यंत सुमारे २० हजार ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये दोष असणारे (Faulty) मीटर, नवीन मीटर आणि अत्यंत वेगाने फिरणारे (Fast) मीटर अशा तक्रारींचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालये, औद्योगिक संस्था आणि व्यावसायिक ग्राहकांनंतर आता थेट सर्वसामान्य घरगुती ग्राहकांच्या घरांचे मीटर बदलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कंपनीने पाठवलेल्या मेसेजमध्ये, ‘मीटर बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि यामुळे अचूक बिलिंग होईल’ असा दावा केला आहे.
Also Read : Yavatmal जिल्हा प्रशासनाकडून JEE-NEET मोफत निवासी कोचिंग; ‘सुपर ५०’ साठी २० जूनपर्यंत अर्ज
सक्तीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका! | Smart Meter Installation Notice Yavatmal
ग्राहकांना विश्वास न देता आणि त्यांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने मीटर बदलणे हे सगळे कृत्य संविधानाच्या कलम १९, १ अ चे सरळ उल्लंघन आहे, असा आक्षेप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी घेतला आहे. या सक्तीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली असून स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘स्मार्ट वीज मीटर नको’ यासाठी ग्राहक संघटनेकडे आतापर्यंत २ हजारपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.
“वीज ग्राहकांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. स्मार्ट मीटर लावायचे की नाही, हा पूर्णपणे ग्राहक यांचा निर्णय आहे. वीज वितरण कंपनी जर बळजबरीने स्मार्ट मीटर बसवत असेल, तर त्याला ठामपणे विरोध करा आणि ग्राहक संघटनेकडे आपले अर्ज नोंदवा.”
— बापू दर्यापूरकर, विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना.
Also Read : Yavatmal डॉक्टरांचा हलगर्जीपणा पडला महाग! रुग्णाच्या मृत्यूनंतर महिला डॉक्टरला १० लाखांचा दंड
“ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना नागरिकांना विश्वासात घेणे आणि पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. जागरूक नागरिक म्हणून आपल्या हक्कांची जाणीव ठेवा, अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवा आणि संघटित राहा!”
अशाच प्रकारच्या सर्व शासकीय योजना, वीज बिल सवलती, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि तुमच्या हक्कांच्या ताज्या घडामोडी थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.
