इंधन खरेदीवर नवे कडक निर्बंध! आता केवळ ४० लीटर पेट्रोल आणि २०० लीटर डिझेलच मिळणार | Maharashtra Fuel Policy 2026

Maharashtra Fuel Policy 2026 : वाढत्या जागतिक ऊर्जा संकटामुळे इंधनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना कोणताही तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे किरकोळ पेट्रोल पंपांवरून कोणत्याही ग्राहकाला अमर्याद इंधन खरेदी करता येणार नाही. शासनाच्या नव्या नियमांनुसार, आता एकावेळी जास्तीत जास्त २०० लीटर डिझेल आणि ४० लीटर पेट्रोल खरेदीवर मर्यादा (कॅपिंग) घालण्यात आली आहे.

ठोक खरेदीदारांमुळे सामान्य नागरिक अडचणीत?

मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत इंधनाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. घाऊक किंवा ठोक डिझेलचे दर हे किरकोळ दरांपेक्षा जास्त असल्याने अनेक मोठे व्यावसायिक आणि औद्योगिक संस्था थेट किरकोळ पेट्रोल पंपांवरून मोठ्या प्रमाणावर डिझेल आणि पेट्रोलची खरेदी करत असल्याचे समोर आले होते. यामुळे किरकोळ पंपांवरील साठा संपून सामान्य वाहनधारकांना इंधनासाठी ताटकळत राहावे लागत होते. हीच समस्या लक्षात घेऊन अन्न व पुरवठा विभागाने विशेष जीआर (शासन निर्णय) काढून या ठोक विक्रीवर तात्काळ निर्बंध लादले आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बॅरल आणि कॅनमध्ये इंधन भरण्यास मनाई!

पेट्रोल पंप चालक राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या कडक सूचनेनुसार पंपावरून आता निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त इंधन कोणालाही दिले जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, हे मर्यादित इंधनही केवळ वाहन पंपावर आणल्यासच मिळणार आहे. कोणत्याही व्यक्तीला बॅरल, कॅन किंवा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पेट्रोल अथवा डिझेल भरून दिले जाणार नाही.

नियम मोडल्यास थेट फौजदारी गुन्हा!

इंधनाचा काळाबाजार आणि अनधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. किरकोळ दुकानांमधून पेट्रोलियम पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणे, कॅन किंवा बॅरलमध्ये वारंवार इंधन भरणे, असुरक्षित वाहतूक आणि इंधनामध्ये भेसळ करणे अशा गैरप्रकारांवर कडक पाळत ठेवली जाणार आहे.

Also Read : ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना धक्का?डिजिटल व्यवहारांना ब्रेक लागण्याची भीती; नव्या अहवालात खळबळजनक खुलासा

जर एखादा घाऊक ग्राहक किरकोळ केंद्रावरून संशयास्पद खरेदी करताना आढळला, तर संबंधित ग्राहकासह त्या पेट्रोल पंप चालकावरही जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलमांनुसार थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांपासून ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. व्यावसायिक किंवा औद्योगिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज असल्यास, त्यांनी थेट तेल विपणन कंपन्यांमार्फत अधिकृत खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नागरिकांना सरकारचे आवाहन | Maharashtra Fuel Policy 2026

“इंधन हे देशाची मौल्यवान संपत्ती असून त्याचा साठा मर्यादित आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता गरजेपुरतेच इंधन खरेदी करा. साठेबाजी किंवा काळाबाजार करून देशाच्या ऊर्जा सुरक्षेला धोक्यात आणू नका. एक जबाबदार नागरिक म्हणून शासकीय नियमांचे पालन करा आणि इंधनाची बचत करा!”

Also Read : ‘गुगल’वर स्वस्त सिमेंट शोधणे पडले महाग; नागपूरच्या उद्योजकाला सायबर भामट्यांनी लावला २.३० लाखांचा चुना!

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा

अशाच नवनवीन शासकीय निर्णय, पेट्रोल-डिझेलचे दर आणि अमरावती जिल्ह्यातील ताज्या घडामोडींच्या विश्वासार्ह अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − 13 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.