Rain Alert Maharashtra : गेल्या बऱ्याच दिवसांपासून गायब झालेल्या मान्सूनबद्दल शेवटी एक आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनचा खोळंबलेला प्रवास पुढील आठवड्यात म्हणजेच २४ ते २५ जूनपासून पुन्हा एकदा गतिमान होणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत.
सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या भागात अडकून पडलेल्या मान्सूनमुळे देशभरात चिंतेचे ढग जमा झाले होते, मात्र आता ही प्रतीक्षा संपणार आहे.
देशभरात ४१ टक्के पावसाची मोठी तूट!
आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून या कालावधीत संपूर्ण देशात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. या काळात देशात सरासरी ७२.२ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४२.६ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे.
८ जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात वेळेत दाखल झाल्यानंतर, १० ते १५ जून दरम्यान पाऊस वाढणे अपेक्षित होते; मात्र १७-१८ जूनपर्यंत मान्सूनची पुढची चाल पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
पुढील वाटचाल कशी असणार?
हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, मान्सूनची उत्तर सीमा सध्या हरणे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुझफ्फरपूर या भागांवर स्थिर आहे.
इतर राज्यांमध्ये हालचाली:
पुढील ४ ते ५ दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
२२ जूनपर्यंत कमी पाऊस: Rain Alert Maharashtra
महाराष्ट्रात २२ जूनपर्यंत केवळ काही भागातच हलका पाऊस पडेल, म्हणजेच या काळामध्ये कोणत्याच भागात अतिवृष्टी किंवा जोरात पाऊस होणार नाही.
२४ जूननंतर पावसाचा ‘रुद्र अवतार’; अतिवृष्टीचा इशारा!
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ जूनच्या सुमारास कोकण पट्टी आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवर २४ जूनपासून पाऊस सक्रिय होईल, तर २६ आणि २७ जूनच्या सुमारास तो उत्तर कोकणात धडकण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, २५ ते २८ जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होताना दिसत आहेत. मुंबईत यंदा मान्सूनच्या विलंबाने आगमनाचा नवा विक्रम नोंदवला जाऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
“निसर्गाच्या बदलामुळे दिवसेंदिवस पावसामध्ये बदल होत आहेत, मात्र हवामान विभागाच्या यंदाच्या अंदाजानुसार लवकरच पाऊस येण्याचे सांगीतले जात आहे. शेतकरी बांधवांनी घाईघाईने पेरण्या न करता, जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरणीचा योग्य निर्णय घ्यावा. पाणी जपून वापरा.”
अशाच नवनवीन हवामान अंदाज, मान्सूनचे थेट अपडेट्स, शेतीविषयक सल्ले आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.