प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : असंघटित क्षेत्रात मोठ्या संख्येने कामगार आयुष्यभर राबराब राबतात. उतारवयात काम होत नसल्याने त्यांना जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. औषधोपचार, दैनंदिन वस्तू व आवश्यक गरजा भागविणे कठीण जाते. अशा कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतून कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते.
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वृद्धापकाळाला आर्थिक सुरक्षिततेची जोड देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविली जात आहे. १८ ते ४० वयोगट आणि १५ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांना महिन्यांना ५५ ते २०० रुपयांचा हप्ता भरून वयाच्या साठीनंतर दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन मिळते.
घरकामगार, रस्त्यावरील विक्रेते, कचरा वेचणारे, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, विणकर आणि तत्सम असघंटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला देण्यात आले आहे.
निवृत्तिवेतनासाठी कोण ठरतात पात्र ? | प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
घरकामगार, रस्त्यावरील विक्रेते, कचरा वेचणारे, रिक्षाचालक, विणकर, तस्सम क्षेत्रातील असघंटित कामगार या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात.
दरमहा किती भरावा लागतो हप्ता ?
६० वर्षांपर्यंत सभासदाने आपल्या वयानुसार दरमहा ५५ ते २०० पर्यंत योगदान द्यावे लागते. १८ वर्षे वय असलेल्यांना ५५ रुपये प्रतिमहिना, २९ वर्षे वय असलेल्यांना प्रति १०० रुपये महिना ४० वर्ष वयोगटातील कामगारांना २०० रुपये प्रतिमहिना भरावा लागतो.
कधी आणि कोणाला मिळतो दरमहा लाभ?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना ही केंद्र सरकारची असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत वयाच्या ६० वर्षांनंतर पात्र कामगारांना दरमहा तीन हजार रुपयांची निश्चित पेन्शन मिळते.
अशी आहे प्रक्रिया
कामगारांना आपल्या वयानुसार १८ ते ४० वर्षे असल्यास दरमहा ५५ ते २०० रुपयापर्यंत योगदान द्यावे लागते. लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास जोडीदारास ५० टक्के म्हणजे दीड हजार रुपये पेन्शन मिळते. आपल्याजवळ असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, जनधन खाते, मोबाइल क्रमांक टाकून अर्ज भरावा. पहिल्या महिन्याचे योगदान रोख स्वरूपात भरून पावती घ्यावी. ती आपल्याजवळ ठेवावी.
पात्रता आणि निकष काय ?
अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार अर्थात घरकामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, रिक्षाचालक, मजूर असावा. अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे. मासिक उत्पन्न १५ हजार अथवा त्यापेक्षा कमी असावे. तो भारताचा नागरिक असावा. आयकर दाता नसावा, आदी योजनेसाठी पात्रता आणि निकष आहेत.
Website : https://www.labour.gov.in/offerings/schemes-and-services/details/pm-sym-QTOzATMtQWa