तुम्ही दहशतवादी आहात!” म्हणत नागपुरातील ज्येष्ठ नागरिकाला 21 लाखांचा गंडा. | Nagpur Digital Arrest Scam

दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बनावट धाक दाखवून सायबर भामट्यांनी केला घात; ‘हा’ थरारक प्रकार वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील!

Nagpur Digital Arrest Scam : सध्या सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांची झोप उडवली आहे. नागपूरमधून ‘डिजिटल अरेस्ट’ची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला चक्क दहशतवादी ठरवून, तब्बल २० दिवस घरातच ‘डिजिटल कैदेत’ ठेवण्यात आले. इतकेच नव्हे, तर कायदेशीर कारवाईची भीती दाखवून या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.


असा रचला संशयाचा सापळा… | Nagpur Digital Arrest Scam

पीडित अधिकारी २०२१ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून ते सध्या एकटेच राहतात. मार्च महिन्यात ते मित्रांसोबत आसामला पर्यटनासाठी गेले होते. १८ मार्च रोजी गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये असताना त्यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख कुलाबा एटीएस (ATS) मधील ‘आनंद शर्मा’ अशी करून दिली.
“तुमच्या नावावर सिमकार्ड आणि बँक खाते सुरू असून, त्याचा वापर थेट दहशतवादी संघटना करत आहेत,” असा खोटा आणि गंभीर आरोप त्याने केला. या अचानक आलेल्या फोनमुळे निवृत्त अधिकारी पुरते हादरून गेले.


२० दिवस मानसिक छळ आणि ‘डिजिटल अरेस्ट’

भामट्यांनी त्यांना तात्काळ खोलीचे दरवाजे-खिडक्या बंद करून हातात कागद-पेन घेण्यास भाग पाडले. त्यानंतर लखनौ एटीएसमधील कथित अधिकारी ‘प्रेमकुमार गौतम’ आणि एनआयए (NIA) अधिकारी ‘राकेश अग्रवाल’ यांच्याशी कॉन्फरन्स कॉलद्वारे जोडण्यात आले.

वॉट्सॲप आणि सिग्नल ॲपवर सातत्याने व्हिडिओ कॉल करून त्यांना चोवीस तास पाळत खाली ठेवण्यात आले.

Also Read : सावधान! अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ देताय? नागपुरातील धक्कादायक प्रकार वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

“तुमच्या नावावर तामिळनाडूमध्ये सिमकार्ड घेतले असून, आशिश फौजी नावाच्या दहशतवाद्याशी तुमचे संबंध जोडले गेले आहेत. एका मोठ्या हत्याकांडात तुमचे नाव आहे आणि तुमच्या मुलाच्या जीवालाही धोका आहे,” अशी भीती त्यांना सतत घालण्यात आली.

आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून त्यांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असल्याचे नाटक करण्यात आले.


आणि २१ लाखांची एफडी मोडली!

‘तपास पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे सुरक्षित परत मिळतील’ असे खोटे आश्वासन सायबर चोरांनी दिले. या मानसिक दबावाला बळी पडून, शेवटी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या वृद्ध अधिकाऱ्याने आपली तब्बल २१ लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट (FD) मोडली आणि ती रक्कम भामट्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली.

पैसे मिळताच आरोपींनी सर्व संपर्क तोडून टाकला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

Also Read : ​नागपूर हादरले: प्रेमाच्या नावाखाली तरुणीला लोटले नरकात; ‘शॉर्टकट’ कमाईसाठी नैतिकतेचा अंत!

वेबसाईट टीमचे आवाहन

पोलीस, सीबीआय, एटीएस किंवा एनआयए कधीही व्हिडिओ कॉलवर कोणालाही अटक किंवा चौकशी करत नाही. असा फोन आल्यास घाबरू नका, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

thirteen − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.