Nagpur Love Trap Case ज्या हाताने आयुष्यभर साथ देण्याची वचने दिली, त्याच हाताने एका तरुणीला देहव्यापाराच्या अंधाऱ्या दुनियेत ढकलल्याची संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पैशांच्या मोहापायी प्रेम आणि विश्वास किती स्वस्त होऊ शकतो, याचे विदारक चित्रण या प्रकरणातून समोर आले असून गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
ओयो हॉटेलमध्ये रॅकेटचा पर्दाफाश
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गणेशपेठ परिसरातील ‘ओयो ‘ या हॉटेलवर छापा टाकला असता हे धक्कादायक वास्तव समोर आले. ऑनलाईन वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांना जाळ्यात ओढले जात होते. या कारवाईत उत्तर प्रदेशातील एका २८ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली, जी गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात राहून कॉल गर्ल म्हणून काम करत होती.
रक्षकच बनला भक्षक | Nagpur Love Trap Case
या प्रकरणातील सर्वात वेदनादायक पैलू म्हणजे या तरुणीचा प्रियकर. पोलीस तपासात निष्पन्न झाले की, ही तरुणी देहव्यापार करत असल्याची पूर्ण कल्पना तिच्या प्रियकराला होती. इतकेच नाही, तर तो स्वतः तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सोडून यायचा आणि ग्राहक मिळवून देण्यासाठी मदत करायचा. “तिला सहज पैसे मिळत होते आणि मी तिच्या कामात अडकाठी आणत नव्हतो,” अशी निर्लज्ज कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.
मोबाईल ट्रांझॅक्शनने उघडले पितळ
ग्राहकांकडून मिळणारे पैसे अनेकदा प्रियकराच्या मोबाईलवर ऑनलाईन ट्रान्सफर केले जात होते. दोन महिन्यांत त्याने ४० हून अधिक ग्राहकांकडे स्वतः या तरुणीला सोडले होते. एखादा प्रियकर संकटात आपल्या प्रेयसीच्या पाठीशी उभा राहतो, मात्र येथे प्रियकरच तिला नरकाच्या दारापर्यंत पोहोचवत होता. ‘शॉर्टकट’ कमाईच्या नशेने या तरुणाला इतके अंध केले होते की, आपल्या प्रेयसीचा सौदा होताना त्याचे मन एकदाही हेलावले नाही.
Also Read : सावधान! अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ देताय? नागपुरातील धक्कादायक प्रकार वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
पालकांसाठी आणि तरुणाईसाठी धडा
प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या घृणास्पद व्यापारामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. राज नावाचा एजंट या संपूर्ण व्यवहाराचे सूत्रसंचालन करत असल्याचेही तपासात पुढे आले आहे. केवळ चैनीसाठी आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी स्वतःच्या नात्याचा बळी देणारी ही प्रवृत्ती समाजासाठी धोक्याची घंटा आहे.
अशाच नवनवीन आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाइटला फॉलो करा.