अमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास | Amravati Bus Stand Theft News

Amravati Bus Stand Theft News :  सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांची पसंती एसटी बसला असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे.

मात्र, याच गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांचा डोळा आहे. अशीच एक घटना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर घडली असून, एका महिलेच्या पर्समधून तब्बल ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले आहेत. ९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दर्यापूर येथील ५४ वर्षीय फिर्यादी महिला आपल्या पतीसह एका विवाह सोहळ्यासाठी अमरावतीत आल्या होत्या. सोहळा आटोपून दर्यापूरकडे जाण्यासाठी त्या आपल्या मुलाच्या चारचाकी वाहनाने अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचल्या.

बसमध्ये बसल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या हॅडबॅगमध्ये पाहिले असता, त्यातील लाल रंगाची पर्स गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपला हार आणि ३० ग्रॅम वजनाची सोन्याची काळ्या मण्यांची पोत असे वापरते दागिने होते.

भरबसमध्ये दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

प्रवाशांनी काय काळजी घ्यावी? दागिन्यांचे प्रदर्शन टाळा. प्रवास करताना शक्यतो अंगावर जास्त दागिने घालू नका. बॅगेत दागिने असतील तर ती बॅग सतत नजरेसमोर आणि हातात ठेवा. गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगा.

बसमध्ये चढताना किंवा उतरताना होणाऱ्या गडबडीत चोरटे फायदा घेतात. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. प्रवासात कोणाही अनोळखी व्यक्तीकडे आपल्या सामानाची जबाबदारी सोपवू नका.

दरम्यान, लग्नसराई आणि सुट्ट्यांच्या काळात बसस्थानकांवरील वाढती गर्दी पाहता प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

विशेषतः महिलांनी दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, कारण क्षणभराचा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकतो. पोलिसांनीही नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

👉 अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या विदर्भातील बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला आत्ताच जॉइन करा आणि प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.