Nagpur Student Suicide News : धक्कादायक! नागपुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने फ्लायओव्हरवरून घेतली उडी.

Nagpur Student Suicide News : इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कामठी उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या केली. श्रीनागपायले (१८) असे उडी घेणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही थरारक घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कामठी मार्गावरील फ्लायट हाऊस समोर घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आशीष गडपायले (५१), रा. कामठी रोड, अरे फियादीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशीषचे दुसरे अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. त्यांना पत्नी, मुलगा आणि एक मुलगी आहे. श्रीना ही बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. गुरुवारी रात्री ती घरून निघाली. कामठी उड्डाण पुलावर गेली. काही क्षणात तिने पुलावरून उडी घेतली. ती खाली कोसळताच जवळपासचे लोक धावले. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Nagpur Student Suicide News

दरम्यान एका व्यक्तीने श्रीनाच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. काही वेळातच ते रुग्णालयात पोहोचले. श्रीनाला अंतर्गत जखमा असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्यांनी जखमीला कोराडी मार्गावरील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

एका दिवसात कोणी घेत नाही. ती एक प्रक्रिया आहे. दरम्यान याच अवस्थेत समुपदेशन करणारा कोणी मिळाल्यास आत्महत्या करणारा आपला निर्णय मागे घेऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांचे मित्र बना. त्यांच्याशी मित्रासारखे वागा, वेळोवेळी त्यांची विचारपूस करा.

त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका. राग बाजूला सारून त्यांच्याशी मनमोकळेपणे चर्चा करा. अडचणी समजून घ्या. म्हणजे पाल्याच्या डोक्यावरचा ताण कमी होऊन तो सकारात्मक विचार करेल,

असे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित बागडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आत्महत्या करून प्रश्न सुटतात, हा केवळ गैरसमज आहे. उलट प्रश्न आणखीच विचकतात.

पालकांनी मुलांचे मित्र बना – डॉ. सुचित बागडे

दरम्यान, या घटनेमुळे नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि वेळोवेळी मानसिक आधार देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या विदर्भातील बातम्यांसाठी आमच्या

WhatsApp ग्रुपला नक्की जॉईन व्हा आणि Vidarbha Times सोबत अपडेट राहा.

 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five + 6 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.