वाहन चालकांनो लायसन्स किंवा आरसी बुक घरी विसरलात तरी ‘या’ 2 ॲप्समुळे ट्रॅफिक पोलीस एक रुपयाचाही दंड करणार नाहीत! | Traffic New Rules 2026

Traffic New Rules 2026 : घाईघाईत घरातून निघताना गाडीचे लायसन्स किंवा आरसी बुक (RC Book) घरीच विसरले, की रस्त्यात ट्रॅफिक पोलीस पकडतील या भीतीने अनेक वाहनचालकांची धडधड वाढते. बऱ्याचदा पोलिसांशी हुज्जत घालण्याची किंवा विनाकारण मोठा दंड भरण्याची वेळ येते.

आता मात्र, असलेल्या डिजिटल युगात या सगळ्या चिंतेतून वाहनधारकांना कायमची सुटका मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) आणि ‘एम परिवहन’ (mParivahan) या अधिकृत मोबाईल ॲप्समधील कागदपत्रे आता पूर्णपणे वैध मानली जाणार असून, त्यामुळे खिशात कागदपत्रांचे जाडजूड पाकीट घेऊन फिरण्याची कटकट आता संपली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नियम काय सांगतो? आरटीओ आणि पोलिसांना स्वीकारावेच लागणार!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत डिजीलॉकर आणि एम परिवहन ॲपमधील डिजिटल कागदपत्रांना मूळ कागदपत्रांइतकीच कायदेशीर मान्यता आहे.

वाहतूक पोलीस किंवा आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान हे डिजिटल कागदपत्रे मान्य न करणे संबंधित अधिकाऱ्यावर सरळ कायदेशीर कारवाई होऊ शकते.

सावधान! नवीन कायद्यात थेट १० पटीने दंडाची तरतूद:

सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार, जर तुमच्याकडे सोबत कागदपत्रे किंवा मोबाईलमध्ये वैध डिजिटल पुरावा नसेल, तर दंडाची रक्कम तब्बल १० पटीने वाढवण्यात आली आहे:

दंडाची नवीन रक्कम

  • लायसन्स नसणे: पूर्वी जिथे ₹५०० दंड होता, तो आता थेट ₹५,००० करण्यात आला आहे.
  • इतर कागदपत्रे: आरसी बुक किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्यास ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत दंडाची तरतूद आहे.
  • विमा नसणे: वाहनाचा विमा (Insurance) वैध नसल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ₹२,००० दंड किंवा ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या भारी दंडापासून वाचण्यासाठी मोबाईलमध्ये हे डिजिटल ॲप्स असणे हाच सर्वात सोपा आणि स्मार्ट मार्ग आहे.

कोणकोणती कागदपत्रे ठेवू शकता डिजिटल स्वरूपात?

या विश्वासू ॲप्समध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC Book), वाहन विमा प्रमाणपत्र, पीयूसी (PUC) प्रमाणपत्र आणि कमर्शियल वाहनांसाठी जे फिटनेस प्रमाणपत्र लागते ते सुरक्षित सांभाळून ठेवू शकता.

विशेष म्हणजे ‘एम परिवहन’ ॲपमध्ये इंटरनेट नसतानाही (Offline) हे आभासी व्हर्जन पोलिसांना दाखवता येते.

याव्यतिरिक्त, डिजीलॉकरमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, १० वी-१२ वीची गुणपत्रिका, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि एलपीजी गॅस सबस्क्रिप्शन व्हॉउचर यांसारखी महत्त्वाची शासकीय कागदपत्रेही सुरक्षित ठेवता येतात.

Also Read : तुमची गाडी सरकार ‘ब्लॅकलिस्ट’ करू शकते? वाचा नवीन ट्रॅफिक नियम.

कसा करायचा या ॲप्सचा वापर? जाणून घ्या ३ सोप्या स्टेप्स:

१. ॲप डाऊनलोड करा:

गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘DigiLocker’ किंवा ‘NextGen mParivahan’ ॲप पूर्णपणे मोफत डाऊनलोड करा.

२. साइन-अप आणि सुरक्षितता:

मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा वापर करून खाते तयार करा. आधार लिंक असलेल्या नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाकून ६ अंकी सुरक्षित पिन सेट करा.

३. कागदपत्रे मिळवा:

ॲपमधील ‘Search’ पर्यायावर जाऊन ‘Ministry of Road Transport and Highways’ निवडा. तुम्हाला हवे असलेले कागदपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स) निवडून तुमचा लायसन्स नंबर किंवा गाडीचा आरसी नंबर टाका. ‘Get Document’ वर क्लिक करताच तुमचे अधिकृत डिजिटल कागदपत्र डाउनलोड होऊन तुमच्या ‘Issued’ सेक्शनमध्ये कायमचे सेव्ह होईल.

वाहतूक पोलीस निरीक्षकांचा सल्ला: Traffic New Rules 2026

“नागरिकांनी आता तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. मोबाईलमधील ही कागदपत्रे पूर्णपणे कायदेशीर असून यामुळे केवळ दंडाची कारवाई टळत नाही, तर वाहन तपासणी दरम्यान तुमचा आणि पोलिसांचा मौल्यवान वेळही वाचतो.”

— प्रवीणकुमार पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

9 − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.