ITI प्रवेश 2026 सुरू; AI, ड्रोनसह 13 नव्या कोर्सेसचा समावेश | ITI New Courses Maharashtra

ITI New Courses Maharashtra : बदलत्या जागतिक बाजारपेठेची आणि आधुनिक उद्योगांची गरज ओळखून राज्य शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पारंपरिक ट्रेड्ससोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान आणि सोलर टेक्निशियनसारखे अत्यंत मागणीत असलेले ‘न्यू एज’ (New Age) कोर्सेस शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या तांत्रिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये प्रचंड वाढ होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजला!

राज्यातील शासकीय व खाजगी आयटीआयमधील प्रवेशासाठी २९ मे २०२६ पासून अधिकृत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी राज्यभरात सुमारे १ लाख ५७ हजार ६६४ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यापैकी ७ हजार जागा केवळ या नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

‘हे’ आहेत नवीन समाविष्ट झालेले मुख्य अभ्यासक्रम:

विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योगांसाठी सज्ज करण्यासाठी खालील १३ नव्या आधुनिक अभ्यासक्रमांची भर घालण्यात आली आहे:

• कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा विश्लेषण: आयटी क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन.

• ड्रोन तंत्रज्ञान व ऑपरेशन: शेती, सर्वेक्षण आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक उड्डाणासाठी.

• सोलर टेक्निशियन आणि ईव्ही टेक्निशियन: सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) दुरुस्तीसाठी.

• Application Testing आणि HR असिस्टंट: कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी.

थेट कंपन्यांमध्ये मिळणार ‘प्रॅक्टिकल’ ट्रेनिंग!

या नव्या पॅटर्नचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ वर्गात बसून पुस्तकी ज्ञान दिले जाणार नाही. आयटीआय प्रशासनाने विविध बड्या कंपन्यांसोबत थेट समन्वय साधला आहे. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीत नेऊन ‘ऑन-जॉब ट्रेनिंग’ (On-Job Training) दिले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि शिक्षण पूर्ण होताच नोकरी मिळणे अत्यंत सोपे होईल.

जिल्हा अधिकाऱ्यांचे काय आहे म्हणणे?

वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग क्षेत्रामध्ये होणारे वेगवान बदल लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

“विद्यार्थ्यांनी पारंपारिक चौकटीबाहेर पडून या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांच्या करिअरला मोठी गती मिळेल.”

— वैभव बोनगीरवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, चंद्रपूर

पात्रता, निकष आणि वेळापत्रक: | ITI New Courses Maharashtra

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्सेससाठी अर्ज करू शकतात. काही तांत्रिक ट्रेड्ससाठी गणित आणि विज्ञान हे विषय आवश्यक राहतील.

चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांसाठी मोठी उमेद

चंद्रपूर जिल्ह्यामधील एकूण १८ आयटीआय संस्थांमध्ये तब्बल ३,६७२ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे, यामुळे त्याचा ग्रामीण भागात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होईल.

पुढील प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पुढील महिन्यात पहिली गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश फेऱ्या सुरू होतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत कागदपत्रांची पडताळणी करून आपला अर्ज सादर करावा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

8 − one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.