दारव्हा येथे पहिल्या डिजिटल शाळेचे लोकार्पण.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शाळेतील फळाही झाला डिजिटल : चार वर्गखोल्यांत बसविले प्रत्येकी २० संगणक. दारव्हा : दारव्हा येथे जिल्ह्यातली पहिली डिजिटल सरकारी शाळा सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून, १५० हून अधिक विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेतील प्रत्येक वर्गखोल्यात २० ...
Read moreआमदार यांचे कडून शेवटच्या माणसाला गावातील विकास कामांच्या लोकार्पणचा मान.

*बाभुळगाव ता, प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू दिसावे असा आपला प्रयत्न असल्याचे मत राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश मानलवार यांनी व्यक्त केले. ते महमदपुर येथे श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. आमदार अशोक उईके यांनी स्वतः लोकार्पण न करता महंमदपूर येथील विविध विकास कामाचे लोकार्पण गावातील रहिवाशी व कोलाम समाजाचे रामदास गाडेकर ...
Read moreबाभूळगाव येथे बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन साजरा.

*विदर्भ टाईम्स बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* मराठी भाषेतील आद्य पत्रकार व दर्पण या मराठी मधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक श्री. बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिना निमित्त बाभूळगाव प्रेस क्लबच्या वतीने दि. 6जानेवारी रोजी बाभुळगाव प्रेस क्लबचे मुख्य कार्यालय श्रीराम ॲग्रो सेंटर, येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळशास्त्री ...
Read moreHuman Trafficking: तीन वर्षाच्या मुलाची वडिलांनी केली अडीचं लाखात तेलंगणात विक्री!

यवतमाळ जिल्ह्यातील मानव तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश. Human Trafficking: दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वत:च्या मुलाची अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली. याची कुणकुण तीन वर्षीय बालकाच्या आईला लागताचं तिने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना अटक केली. वडील श्रावण दादाराव देवकर(वय 32), चंद्रभान लकडाजी देवकर (वय ...
Read moreसरुळ येथे शाळा सुधार समिती कार्यकारणी गठीत.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सरुळ जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाळा सुधार समितीची नवनिर्वाचित कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी संजयजी शेडे तर उपाध्यक्ष म्हणून सुनीता राजगुरे, सचिव म्हणून जि प शाळेचे मुख्याध्यापक वानखेड़े यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षक तज्ञ म्हणुन प्रविन भुजबळ , ग्राम पंचायत सदस्य राहुलजी वाघ, तर महिला शिक्षीका टागले तर सदस्य श्रध्दा कंनाके, ...
Read moreवंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – Dr Niraj Waghmare

*बाभूळगाव, ता. प्र.मोहम्मद अदिब* बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.परंतु आजपर्यंत वंचितांचा प्रस्ताव इंडिया आघाडीने स्वीकारला नाही. त्यामुळे काँग्रेस ही भाजपाची वाट मोकळी करून देत आहे. व काँग्रेस भाजपाची बी टीम तयार करतांना दिसत आहे. असा आरोप करीत वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपाचा पराभव होऊ शकत नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही चांगले यश ...
Read moreसायखेड येथे शनिवारपासून श्री गुणवंत बाबा प्रकटदिन व यात्रा सोहळा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा- विश्वप्रभू गुणवंतबाबा दरबार (कुटी) सायखेड ता. दारव्हा जि. यावतामाळ यांच्या वतीने श्री. गुणवंत बाबा प्रकटदिन आणि यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार (दि.५) ते शनिवार (दि. १२) जानेवारी दरम्यान विश्वप्रभू गुणवंतबाबा दरबार (कुटी) सायखेड येथे संपन्न होणार आहे. या निमित्त शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा, महादेवाच्या गाण्याची ...
Read moreबाभुळगाव येथे तुरीचा खरेदीचा शुभारंभ.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* पहिल्या दिवशी ७हजार ५५१रुपये तूरीला भाव. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तूर खरेदीचा शुभारंभ दि.3 जानेवारी रोजी करण्यात आला. यावेळी शेतकऱ्याच्या नवीन तुरिला 7551 रुपये भाव देण्यात आला. बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डॉ.रमेश माहनुर,सचिव विलास गायकवाड यांच्या हस्ते काटा पूजनाने खरेदीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार ...
Read moreबाभुळगावचे स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तहसीलदार यांना दिले निवेदन. बाभुळगाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांनी राशन वाटप बंदचे आंदोलन पुकारले असून या संबंधीचे निवेदन बाभूळगाव येथील तहसीलदार यांना दिले आहे. ऑल इंडिया फेयेर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी केलेल्या बेमुदत बंद ...
Read moreकेंद्र सरकार आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात शेबालपिपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरन)* शेबालपिपरी:- केंद्र सरकार ने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जवाबदार ट्रकचालकास १० वर्षाच्या क्षिक्षेची तरतुद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपए दंड देखील आकराला जानर आहें दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असुन ऑल इंडिया वाहन चालक मालक माहासंघ शेबालपिपरी द्वारे दिनांक ०३/०१/२०२४/ रोजी ...
Read more