‘मूल होत नाही म्हणून टोमणे आणि माहेरची ५ एकर शेती नावावर कर’; सासरच्या जाचाला कंटाळून तरुण शिक्षिकेची आत्महत्या | Ghuggus Teacher Suicide Case

Ghuggus Teacher Suicide Case : मूल होत नसल्याचे टोमणे, चारित्र्यावरील संशय आणि माहेरची मालमत्ता हडपण्याची हाव… अशा अनेक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहित शिक्षिकेने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसगाव येथे हा प्रकार उघडकीस आला असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. करिश्मा विलास देरकर असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शिक्षिका होती करिश्मा; असा सुरू झाला छळ | Ghuggus Teacher Suicide Case

करिश्मा ही मूळची पळसगाव (ता. बल्लारपूर) येथील रहिवासी होती. तिचा विवाह २०१९ मध्ये उसगाव येथील विलास भुताराम देरकर याच्याशी झाला होता. करिश्मा एका कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती.

लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे संसार अगदी सुरळीत सुरू होता. मात्र, लग्नाला सात वर्षे होत आली तरी मूल होत नसल्याने पती विलास आणि सासू कासुबाई भुताराम देरकर यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.

Also Read : Chandrapur शेतकऱ्याची थरारक कहाणी! १० लाखांची फसवणूक करून बँकेतच लुटले.

माहेरची ५ एकर जमीन नावावर करण्यासाठी दबाव!

करिश्माचा छळ केवळ टोमण्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तिच्या माहेरची ५ एकर शेती पतीच्या नावावर करून आणण्यासाठी तिच्यावर सतत प्रचंड दबाव टाकला जात होता.

या मालमत्तेच्या हव्यासापोटी तिला अत्यंत मानसिक यातना दिल्या जात होत्या, ज्यामुळे ती तीव्र नैराश्यात गेली होती. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या शेतीचा काही भाग औद्योगिक प्रकल्पासाठी संपादित करण्यात आला होता. त्यातून मिळालेल्या रकमेतून ४ लाख रुपये गायब झाल्याचा खोटा आळही करिश्मावर घालण्यात आला आणि तिला मारहाण करण्यात आली.

ओढणीने गळफास घेत संपवले जीवन; पोलिसात गुन्हा

या सततच्या छळाला कंटाळून अखेर बुधवार, १७ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास करिश्माने राहत्या घरातील बेडरुममध्ये लोखंडी अँगला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

Also Read : चंद्रपूर हादरले! बाळ विक्रीचे पाप लपवण्यासाठी पोटच्या पोरीचे केले ‘मुंडण’; नराधम प्रियकराचे क्रूर कृत्य उघड!

करिश्माच्या आई अनिता शंकर खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घुग्घुस पोलिसांनी पती विलास देरकर आणि सासू कासुबाई देरकर यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १०८, ८५, ११५ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत.

“स्त्री ही घराची लक्ष्मी असते. मूल न होणे किंवा कौटुंबिक अडचणींवरून एखाद्या सुशिक्षित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा केवळ गुन्हा नसून मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. कौटुंबिक छळ किंवा मानसिक छळाविरुद्ध महिलांनी शांत न बसता वेळीच आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही समस्येवर आत्मसमर्पण करणे हा मार्ग नाही!”


अशाच महत्त्वाच्या सामाजिक घडामोडी, गुन्हेगारी क्षेत्रातील अपडेट्स, कायदेविषयक माहिती आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.