अमरावती मनपात हायव्होल्टेज ड्रामा! किरीट सोमय्यांच्या गाडीवर टोमॅटोफेक; MIM-उद्धव सेनेच्या नगरसेवकांना पोलिसांनी फरफटत नेले | Kirit Somaiya Amravati

Kirit Somaiya Amravati : अमरावती महानगरपालिकेत गुरुवारी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अधिकृत बैठकीवरून प्रचंड गदारोळ आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

महापालिकेतील कथित ‘जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या’वर चर्चा करण्यासाठी सोमय्या येथे आले असता, एमआयएम (MIM) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यांना तीव्र विरोध केला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना राजकीय नेत्याला अशी बैठक घेण्याची परवानगी कशी दिली, असा संतप्त सवाल करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

गाडीवर टोमॅटोफेक अन् रस्त्यावर लोटांगण!

दुपारी ठीक २:३० वाजता किरीट सोमय्या यांचा ताफा महापालिकेत पोहोचताच वातावरण कमालीचे तापले. एमआयएम आणि उद्धव सेनेच्या नगरसेवकांनी ‘किरीट सोमय्या वापस जाओ’, ‘सोमय्या मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की त्यांनी सोमय्या यांच्या गाडीवर टोमॅटो फेकले.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एमआयएमचे गटनेते अब्दुल हमीद आणि नगरसेवक मुनज्जर अली हे थेट सोमय्या यांच्या वाहनासमोर आडवे झाले आणि त्यांनी रस्त्यावर लोटांगण घातले.

अखेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अब्दुल हमीद आणि मुनज्जर अली यांना रस्त्यावरून फरफटत बाजूला नेले. या अनपेक्षित गदारोळामुळे महापालिकेला छावणीचे स्वरूप आले होते.

आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप

“सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असताना किरीट सोमय्या महापालिकेत अधिकृत आढावा बैठक कशी काय घेऊ शकतात? ते अमरावती आणि संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण जाणीवपूर्वक खराब करत आहेत,” असा थेट आरोप शिवसेनेचे नगरसेवक संजय वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

या प्रकरणी पोलिसांनी ५ नगरसेवकांसह अंदाजे २० ते २५ कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ६८ अन्वये ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

Also Read : इंस्टाग्रामवर ‘म्हैस’ खरेदी बेतली महाग! लिंकवर क्लिक करताच बँक खाती रिकामी; अमरावतीत सायबर भामट्यांचा सुळसुळाट.

कडेकोट बंदोबस्तात आयुक्तांच्या दालनात बैठक

बाहेर विरोधकांचा प्रचंड गदारोळ सुरू असताना, पोलिसांनी सोमय्या यांना कडेकोट सुरक्षेत महापालिका आयुक्त हर्षाली लांडगे यांच्या दालनात नेले.

या बैठकीला महापौर श्रीचंद तेज्वाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेता चेतन गावंडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे उपस्थित होते.

“किरीट सोमय्या हे कोणत्याही अधिकृत बैठकीसाठी नव्हे तर केवळ चर्चेसाठी आले होते. जुन्या सॉफ्टवेअरमधून नवीन सॉफ्टवेअरमध्ये जन्म प्रमाणपत्रात सुधारणा करताना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

पण ते खरे की खोटे हे तपासल्यानंतरच स्पष्ट होईल,” अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त हर्षाली लांडगे यांनी दिली.

Also Read : अमरावतीकरांना लुटले! अवघ्या ५ महिन्यांत तब्बल २.२२ कोटींचा सायबर दरोडा; ‘हा’ ठरतोय सर्वाधिक मोठा सापळा.

महत्त्वाची बाब | Kirit Somaiya Amravati

“लोकशाहीत प्रत्येक पक्षाला विरोध करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रशासकीय इमारतींमध्ये आंदोलने करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वच राजकीय पक्षांची आणि सजग नागरिकांची जबाबदारी आहे.”

अपडेट्ससाठी जॉईन करा

अशाच खळबळजनक राजकीय घडामोडी, महापालिकेतील निर्णय आणि अमरावती जिल्ह्यातील ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

Amravati : आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

11 + 11 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.