Panic Button in Commercial Vehicles : सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ठेवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देशव्यापी कडक पाऊल उचलले आहे.
कोर्टाच्या नवीन आदेशानुसार, आता सर्व कमर्शियल वाहनांमध्ये लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस आणि लाल रंगाचे ‘पॅनिक बटन’ (Panic Button) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र किंवा वाहतूक परवाना (परमिट) थेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून चंद्रपूर आरटीओ (RTO) प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
काय आहे ‘पॅनिक बटन’ आणि ते कसे काम करते?
सार्वजनिक वाहनांमध्ये ‘व्हीएलटीडी’ (VLTD) म्हणजेच जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीम आणि एक लाल रंगाचे पॅनिक बटन बसवावे लागेल.
तात्काळ मदत:
प्रवासादरम्यान काही संकट आल्यास किंवा धोका जाणवल्यास प्रवाशाने हे बटन दाबायचे आहे.
थेट पोलिसांशी संपर्क:
बटन दाबताच थेट पोलीस नियंत्रण कक्ष (कमांड सेंटर) आणि परिवहन विभागाच्या मुख्य सर्व्हरला धोक्याचा संदेश जाईल.
अचूक लोकेशन:
संदेश मिळताच वाहनाचे अचूक लाईव्ह लोकेशन पोलिसांच्या स्क्रीनवर दिसेल आणि सर्वात जवळ असलेले पोलीस वाहन अवघ्या काही मिनिटांत मदतीसाठी घटनास्थळी पोहोचेल.
Also Read : वाहन चालकांनो लायसन्स किंवा आरसी बुक घरी विसरलात तरी ‘या’ 2 ॲप्समुळे ट्रॅफिक पोलीस एक रुपयाचाही दंड करणार नाहीत!
सन २०१८ पासूनचा नियम, पण देशात केवळ १ ते २ टक्केच पूर्तता!
केंद्र सरकारने हा नियम वास्तविक पाहता सन २०१८ मध्येच लागू केला होता. मात्र, वाहनधारकांची अनास्था आणि अंमलबजावणी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे आजवर देशात केवळ १ ते २ टक्के वाहनांमध्येच ही उपकरणे बसवण्यात आली आहेत. हीच कमालीची उदासीनता पाहून सर्वोच्च न्यायालयाला यात थेट हस्तक्षेप करावा लागला आहे. जे नागरिक नियम पाळत नाही अशा कोणत्याही नागरिकांच्या वाहनांवर कोणतीही दया न दाखवता ती थेट रस्त्यावरून उतरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘वाहन’ ॲप आणि पोर्टलवर नोंद असणे अनिवार्य!
वाहनधारकांनी केवळ हे उपकरण गाडीत बसवून चालणार नाही, तर त्या व्हीएलटीडी डिव्हाईसची अधिकृत नोंदणी परिवहन विभागाच्या केंद्रीय ‘वाहन’ ॲप आणि पोर्टलवर असणे आवश्यक आहे. जोपर्यंत पोर्टलवर हे डिव्हाईस ‘ॲक्टिव्ह’ दिसत नाही, तोपर्यंत वाहनाची पुढील कोणतीही शासकीय किंवा नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही.
सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल
प्रवाशांची, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. प्रवास करतांना लोकांकडून होणारे गैरवर्तन, अपहरण किंवा छेडछाडीच्या प्रकाराला वेळ असताना रोख घालण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरणार आहे. सर्व वाहनधारकांनी या नियमाकडे आर्थिक बोजा म्हणून न पाहता, सामाजिक सुरक्षेची जबाबदारी म्हणून तातडीने अंमलबजावणी करावी.
Also Read : १ जूनपासून ST प्रवाशांना मिळणार मोठी ‘फ्री’ सुविधा; नेमकं काय बदलणार ?
आरटीओ अधिकाऱ्यांचा इशारा | Panic Button in Commercial Vehicles
“प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व टॅक्सी, बस आणि व्यावसायिक वाहनधारकांनी आपल्या वाहनात तात्काळ व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन बसवून घ्यावे. अन्यथा, कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” — श्याम लोही, प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि आरटीओच्या नवीन नियमांच्या अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!