Amravati MSEB News : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यात वीज वापरात मोठी वाढ झाली आहे. घराघरात पंखे, कुलर, एसी आणि फ्रिजचा वापर वाढल्याने ग्राहकांचे वीजबिल अधिक फुगले आहे. त्यातच आता महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्याने ग्राहकांच्या तक्रारीत भर पडत आहे. संबंधित थकबाकी धोका लक्षात घेऊन ही अतिरिक्त ठेव आकारली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे.
महावितरणच्या नोटिसांमुळे ग्राहकांमध्ये नाराजी
वीजबिलालाच भार वाढलेला असताना महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा ग्राहकांना मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेकांना ही रक्कम अचानक आकारण्यात आली आहे.
एसी, कुलर आणि फ्रिजमुळे बिलात मोठी वाढ
उन्हाळ्यात घर चालवण्यासाठी नियमितपणे पंखे, रॉड, एसी, तसेच कुलर आणि फ्रिजचा सातत्याने वापर होत असल्याने अनेकांचे वीजबिल दुप्पट येऊ लागले आहे.
Amravati MSEB News : दरवर्षी एप्रिलमध्ये सुरक्षा ठेविचा आढावा
दरवर्षी एप्रिल महिन्यात ग्राहकांच्या मागील वीज वापराचा आढावा घेतला जातो. त्यानुसार सुरक्षा ठेव कमी-जास्त केली जाते. जास्त वापर वाढल्यास अतिरिक्त ठेव आकारली जाते, तर वापर घटल्यास ठेव कमी होऊ शकते.
थकबाकी टाळण्यासाठी अतिरिक्त ठेव आकारणी
ग्राहकांची भविष्याची थकबाकी निर्माण होऊ नये, म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जाते. ग्राहकाने बिल न भरल्यास महावितरणला आर्थिक फटका बसू नये, हा त्यामागील हेतू आहे.
काहींना ५० रुपये, तर काहींना ५ हजारांचा फटका
ग्राहकांच्या वीज वापरानुसार अतिरिक्त सुरक्षा ठेव निश्चित केली जाते. काहींना ५० ते १०० रुपयांची नोटीस मिळाली असून, तर काही व्यावसायिक ग्राहकांना २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम भरण्याचे आदेश येत आहेत.
उन्हाळ्यात वाढलेल्या वीज वापरामुळे आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना आता अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारणीमुळे ग्राहकांवर आणखी आर्थिक भार पडत आहे. महावितरणकडून ही प्रक्रिया नियमांनुसार होत असल्याचे सांगितले जात असले, तरी अचानक येणाऱ्या नोटिसांमुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. आगामी काळात वीज वापर आणि बिल यामध्ये संतुलन राखणे हेच ग्राहकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
👉 अशाच महत्त्वाच्या स्थानिक अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा आणि Vidarbha Times सोबत अपडेट राहा.