वीज बिलातून कायमची मुक्ती! आता अवघ्या 2500 रुपयांत घरावर बसणार ‘सोलर पॅनेल’; वाचा सविस्तर योजना | Smart Solar Scheme

Smart Solar Scheme : वाढत्या वीज बिलामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. आता दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहकांना वीज बिलाच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर’ म्हणजेच ‘स्मार्ट’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे आता अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये तुमचे घर सौर उर्जेने प्रकाशमय होणार आहे.


‘स्मार्ट’ योजनेचे जबरदस्त गणित: ५० हजारांचा प्रकल्प २,५०० मध्ये!

एका किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी अंदाजे ५० हजार रुपये खर्च येतो. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत यासाठी ३० हजार रुपयांचे अनुदान आधीच दिले जात आहे. आता यात राज्य शासनाने आपल्या ‘स्मार्ट’ योजनेची भर घालत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसाठी आणखी ३५ टक्के, म्हणजेच १७ हजार ५०० रुपये अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

याचा अर्थ असा की, ५० हजारांच्या या प्रकल्पासाठी बीपीएल ग्राहकाला स्वतःच्या खिशाला फक्त २,५०० रुपये लावायचे आहेत.


वर्धा जिल्ह्यात ४१९८ लाभार्थ्यांची संधी | Smart Solar Scheme

यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्याकरिता ४ हजार १९८ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (OBC) ग्राहकांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या योजनेत सामावून घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

Also Read : आता लाईट गेली तरी फोनची गरज नाही? महावितरणची नवी Smart System चर्चेत!

या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आहेत अटी?

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. अर्जदार हा केवळ घरगुती वीज ग्राहक असावा आणि त्याच्याकडे वैध वीज जोडणी (Connection) असावी.
  2. सौर पॅनेल बसवण्यासाठी छतावर पुरेशी मोकळी जागा असावी.
  3. ग्राहकाने यापूर्वी कोणत्याही सौर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  4. गेल्या १२ महिन्यांतील त्यांचा सरासरी मासिक वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असावा.

या योजनेत पूर्णपणे भारतीय बनावटीचे आणि आयईसी (IEC) प्रमाणित सोलर मॉड्यूल्स वापरले जातील. विशेष म्हणजे, पुरवठादाराकडून ग्राहकांना तब्बल ५ वर्षांची मोफत देखभाल आणि दुरुस्तीची हमी दिली जाणार आहे.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ही योजना राबवली जाणार असल्याने, पात्र नागरिकांनी त्वरित या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Website : solarrooftop.pmsuryaghar.gov.in

अशाच नवनवीन सरकारी योजना आणि सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा.

 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

14 + 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.