राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत मा.अजितदादा पवार यांचेशी सकारात्मक चर्चा.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे माध्यमातून आज दिनांक-०८ डिसेंबर रोजी विजयगड नागपूर येथील शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्याशी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अर्ध्या तासापेक्षा ही जास्त वेळ सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी मा.अजितदादांनी सांगितले की,मी मागील काळात ही जुनी पेंशन योजनेच्या विरोधात नव्हतो ,माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला होता,आपण ही योजना कशा पद्धतीने लागू करण्यात येईल याबाबत सकारात्मक असून लवकरच या बाबतीत मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी या विषयावर विस्तृत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी सह महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री वितेश खांडेकर ,राज्य कार्याध्यक्ष श्री आशितोष चौधरी,राज्य सल्लागार श्री सुनील दुधे,विभागीय कार्याध्यक्ष श्री गोपाल लोखंडे,वाशिम जिल्हाध्यक्ष श्री निलेश कानडे व अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख वाशिम इकराम खान आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.