आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७७ डॉलरवर घसरले, तरीही भारतात पेट्रोल महागच! सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार? | Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत कमालीची घट झाली असली, तरी देशातील सामान्य नागरिकांना मात्र त्याचा कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ११५ अमेरिकन डॉलरवरून घसरून शनिवारी थेट ७७.३३ डॉलरपर्यंत खाली आले आहेत.

एवढी मोठी घसरण होऊनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे असल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या या धोरणाचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी आता देशभरात जोर धरू लागली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ग्लोबल मार्केटमध्ये घसरण, पण स्थानिक बाजारात कपातीला ‘ब्रेक’

जेव्हा जागतिक पातळीवर कच्चे तेल ११५ डॉलरवर होते, तेव्हा देशात इंधन दरवाढ करण्यात आली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय घसरणीचा फायदा थेट ग्राहकांना देण्याऐवजी तेल कंपन्या आणि सरकार आपले खिसे भरत असल्याचा आरोप होत आहे.

सध्या नागपूरमध्ये विविध कंपन्यांनुसार पेट्रोलचे दर १११.७२ ते ११२.१० रुपये प्रतिलिटर एवढे चढेच आहेत, तर डिझेल ९८.३८ ते ९८.७८ रुपयांच्या पातळीवर विकले जात आहे. महाराष्ट्रातील स्थानिक व्हॅट (VAT) आणि विविध उपकरांमुळे राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे दर थोडेफार बदलतात, परंतु महागाईचा आलेख मात्र खाली येण्याचे नाव घेत नाहीये.

Also Read : गुटखा माफियांना थेट जेलची हवा! अवैध विक्री करणाऱ्यांवर आता लागणार ‘मकोका’; तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय.

डिझेलच्या भडक्यामुळे वाहतूक खर्च वाढला; दुधापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच महाग!

इंधन दर कमी न झाल्याने बाजारातील गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत:

महागाईने गाठले टोक | Petrol Diesel Price Today

डिझेलचे दर चढेच राहिल्याने मालवाहतुकीचा खर्च प्रचंड वाढला आहे. याचा थेट परिणाम रोजच्या लागणाऱ्या दुधाच्या पिशव्या, किराणा सामान आणि भाजीपाल्याच्या किमतींवर होत असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

Also Read : सायबर फ्रॉड झालेल्यांसाठी गूड न्यूज! गेलेले पैसे आता थेट खात्यात होणार जमा

व्यापाऱ्यांना मोठा फटका

लहान व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ही परिस्थिती अत्यंत घातक ठरत आहे. इंधनाचे दर कमी झाले तरच मालवाहतूक स्वस्त होईल आणि बाजारपेठेतील मंदी दूर होईल, असे मत स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

“इंधन ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज बनली आहे. वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांनी वैयक्तिक वाहनांचा वापर गरजेपुरताच करावा. शक्य तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसमधील प्रवास) किंवा शेअरींगचा पर्याय निवडून इंधनाची आणि स्वतःच्या पैशांची बचत करावी. थेंब-थेंब वाचवणे हीच आपली संपत्ती आहे!”

अशाच इंधन दरातील चढ-उतार, चालू घडामोडी, महागाईच्या अपडेट्स आणि महाराष्ट्रातील खळबळजनक बातम्यांचे थेट अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

14 − six =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.