इंस्टाग्रामवर ‘म्हैस’ खरेदी बेतली महाग! लिंकवर क्लिक करताच बँक खाती रिकामी; अमरावतीत सायबर भामट्यांचा सुळसुळाट | Instagram Scam Maharashtra

Instagram Scam Maharashtra : सोशल मीडियाचा अतिवापर आणि अनोळखी लिंक्सवर डोळे झाकून केलेला विश्वास किती महागात पडू शकतो, याचा थरार अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे.

सायबर चोरांनी फसवणुकीचे नवनवे मार्ग शोधले असून, केवळ एका ‘क्लिक’वर लोकांची कष्टाची कमाई लंपास केली जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर भामट्यांनी लाखो रुपयांची दरोडेखोरी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

१. इंस्टाग्रामवर म्हैस खरेदी बेतली १ लाखाला!

पहिली धक्कादायक घटना खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळंबी येथे घडली. अवघ्या १८ वर्षांच्या कृष्णा घाटे या तरुणाला इंस्टाग्रामवर ‘म्हैस विकायची आहे’ अशी एक जाहिरात दिसली. कृष्णाने त्या आयडीवर संपर्क साधला. सायबर गुन्हेगाराने त्याला बोलण्यात गुंतवून पूर्ण विश्वासात घेतले आणि म्हैस देण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यांवर तब्बल १ लाख २ हजार १९९ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

पैसे दिले तरी म्हैस मिळाली नाही, तेव्हा हा प्रकार फसवणूक झाल्याचा कृष्णाच्या ध्यानात आले आणि ते सरळ पोलीस ठाण्यात गेले.

२. वरुडमध्ये विना ओटीपी (OTP) १.३७ लाख गायब!

दुसरी घटना वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरूड येथे घडली. येथे २८ वर्षीय वेल्डिंग व्यावसायिक अश्विन कोराटे यांनी आपले फोनपे (PhonePe) चेक केले असता, त्यांच्या एसबीआय (SBI) खात्यातून परस्पर ९९ हजार ५०० रुपये कमी झाल्याचे दिसले. घाबरलेल्या अश्विन यांनी बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट काढले, तेव्हा आणखी ३८ हजार रुपये कापल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे, कोणताही यूपीआय पिन (UPI PIN) किंवा परवानगी न घेता इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून एकूण १ लाख ३७ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले.

३. निवृत्त शिक्षकाचा मोबाईल हॅक करून १.७३ लाखांची लूट!

तिसरी घटना अंजनगाव सुर्जी येथे घडली. येथे ६५ वर्षीय निवृत्त शिक्षकाला एका अज्ञात भामट्याने मोबाईलवर ‘ऑनलाईन कामाची’ एक लिंक पाठवली. शिक्षकाने त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा संपूर्ण मोबाईल हॅक झाला. आरोपीने त्यांच्या गुगल पे (Google Pay) चा वापर करून २९ आणि ३० एप्रिल रोजी अनुक्रमे ९४,००० आणि ७९,००० रुपये, असे एकूण १ लाख ७३ हजार रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले.

पोलिसांचा तपास सुरू आणि महत्वाचे आवाहन!

या तिन्ही घटनांनंतर खल्लारचे पीएसआय सुनील पवार, वरुडचे पोलीस अंमलदार मिनेश खांडेकर आणि अंजनगावचे पोनि सूरज बोंडे या प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.

वाचकांसाठी महत्त्वाची टीप | Instagram Scam Maharashtra

सोशल मीडियावर प्राण्यांची किंवा वस्तूंची खरेदी करताना थेट पैसे पाठवू नका. तसेच, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या जॉब किंवा पैशांच्या अमिशा दाखवणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका; अन्यथा तुमचे बँक खाते एका सेकंदात रिकामे होऊ शकते!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 + 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.