ST Smart Card Scam Wardha : एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट? वर्ध्यात धक्कादायक प्रकार

ST Smart Card Scam Wardha : एसटी महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळवून देणारे ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट कार्डच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यात खाजगी एजंटकडून प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमका घोळ काय?

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. शासनाने या कार्डसाठी ११९ रुपये (साधारण २०० रुपये) शुल्क निश्चित केले आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यातील अनेक खाजगी एजंट प्रवाशांच्या अज्ञानाचा फायदा घेत चक्क २५० ते ३०० रुपये वसूल करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरजू प्रवाशांना ‘लवकर कार्ड काढून देतो’ असे आमिष दाखवून ही जास्तीची रक्कम उकळली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

एजंटांचा मनमानी कारभार; महामंडळाचे दुर्लक्ष?

जिल्ह्यातील पाचही आगारांच्या परिसरात ३१ हून अधिक एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार, एजंटने अधिकृत शुल्काचा फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, कुठेही असे फलक न लावता ही ‘स्मार्ट लूट’ सुरू आहे. काही ठिकाणी तर एजंटनी चक्क दुकाने थाटली असून, शासन निर्णयापेक्षा दुप्पट-तिप्पट पैसे घेऊन प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. महामंडळाचे स्थानिक अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप संतापलेले प्रवासी करत आहेत.

आतापर्यंतची नोंदणी आणि आकडेवारी | ST Smart Card Scam Wardha

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत हजारो कार्ड्सची नोंदणी झाली आहे. आकडेवारीनुसार:

  • अमृत ज्येष्ठ नागरिक: ७,२१६
  • ज्येष्ठ नागरिक: ७,२११
  • महिला सन्मान योजना: ७,७३८
  • इतर लाभार्थी: ७,१५१

या सर्व नोंदींमध्ये हिंगणघाट आणि वर्धा आगारात सर्वाधिक स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

विभागीय नियंत्रकांचा इशारा

या प्रकरणाची दखल घेत विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी स्पष्ट केले आहे की, “डेपोमध्ये २०० रुपये शुल्क घेणे बंधनकारक आहे आणि डेपोबाहेरील एजंटनी २१० रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊ नये. जर कोणी यापेक्षा अधिक पैसे मागत असेल, तर प्रवाशांनी तातडीने लेखी तक्रार करावी. दोषी एजंटवर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील.”

वाचकहो, जर तुमच्याकडूनही स्मार्ट कार्डसाठी जास्तीचे पैसे घेतले गेले असतील, तर गप्प बसू नका. ही बातमी शेअर करा आणि इतरांना जागरूक करा!

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

20 − nine =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.