HSRP Number Plate Registration : वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य ! अन्यथा मार्च पासून दंडात्मक कारवाई होणार.

HSRP Number Plate Registration : आता येत्या 31 जानेवारीपासून सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणी अनिवार्य करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काही काळापूर्वी परिवहन विभागाच्या मार्फत हाय सेक्युरिटी नंबर प्लेट प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महाराष्ट्रात आता या आदेशावर प्रादेशिक परिवहन विभागाने यातायात विभागाकडून अंमलबजावणी होणार असून,ज्या वाहनांना एचएसआरपी अर्थातच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नसेल अशा वाहनधारकां विरुद्ध आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

यापूर्वी पुणेमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एचएसआरपी रजिस्ट्रेशन करण्याचे वाहनधारकांना आव्हान करीत यासाठी एजन्सीची नेमणूक केलेली आहे.आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत या बाबीवर अंमलबजावणी होणार असून,सर्व वाहनधारकांना आता या नंबर प्लेट लावण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि प्रक्रिया करावी लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

केंद्र सरकारने,देशभरात विविध वाहनावरील नंबर प्लेटमध्ये छेडछाड,वाहन खरेदी विक्रीत धोकाधडी,फसवणुक, बनावट नंबर प्लेट सारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी विशेष निर्णय घेतला आहे. या संदर्भात देशभरातील सर्व राज्यांना याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रात एचएसआरपी नंबर प्लेट वाहनांवर लावणे बंधनकारक होणार असून असे न केल्यास प्रादेशिक परिवहन विभाग आणि यातायात विभाग मार्च 2025 पासून दंडात्मक कारवाईला सुरुवात करणार आहे.

ज्या वाहनांना हाईसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP Number Plate Compulsory For All Vheicles) लागलेली नसेल,त्यांना 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. यासाठी नंबर प्लेट लावण्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

यासाठी घेतला सरकारने एचएसआरपी प्लेट बसविण्याचा निर्णय.

उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 50 सरकारकडून सर्व वाहनांना एचएसआरपी प्लेट्स अर्थातच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद केलेली आहे.याचा मुख्य उद्देश्य म्हणजे सर्व प्रकारचे वाहनांना लागलेल्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड रोख,बनावटगिरी करून फसवणुकीचे गुन्हे कमी करणे,रस्त्यावर धावणाऱ्या हजारो वाहनांची ओळख, तसेच महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश यापूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

त्यामुळे याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वात प्रथम केंद्र आणि यानंतर राज्य सरकारांची आहे.त्यामुळे आता या प्रक्रियेवर अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.31 मार्च नंतर ज्या वाहनांना एसएसआरपी नंबर नसेल त्यांना आर्थिक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

एस एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी अशी आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया.

सर्व प्रकारच्या वाहनांना त्याच्यासारखी नंबर प्लेट लावण्यासाठी विशेष रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल. वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी बुकिंग करिता सरकारकडून प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत. डिजिटल हाय सेक्युरिटी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करिता सरकारकडून https://transport.maharashtra.gov.in हे अधिकृत पोर्टल निर्धारित करण्यात आले आहे.सर्व वाहनधारकांनी या सरकारी पोर्टलवर नंबर प्लेट साठी बुकिंग करणे आणि आपल्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन वाहनांना नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल.या संदर्भात वाहतूक पोलिसांकडूनही आता जनजागरणाला सुरुवात होत आहे.

इतके पैसे करावे लागेल खर्च.

आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि बुकिंग केल्यानंतर नंबर प्लेट बनविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून Portal नोंदणी करून सरकारच्या निर्देशानुसार शुल्क वसुली होणार आहे.यानुसार असे शुल्क आकारण्यात येईल.

  • दुचाकी आणि ट्रॅक्टर वाहनांना नंबर प्लेट साठी 450/- रुपये अदा करावे लागेल यात जीएसटी चार्ज वेगळा आकारण्यात येईल.
  • तीन चाकी वाहनांसाठी 500/-रुपये शुल्क आणि जीएसटी चार्ज लागेल.
  • हलकी मोटर वाहन, ट्रॅव्हलर्स कार, व्यवसायिक विविध प्रकारची वाहने, अवजड व्यवसायिक वाहने आणि ट्रेलर वाहनांवर नंबर प्लेट लावण्यासाठी 745/- रुपये शुल्क अदा करावा लागेल, यात सुद्धा जीएसटी चार्ज वेगळा आकारण्यात येईल.

अन्यथा अशी होईल कारवाई

आपल्या वाहनांना नागरिकांनी याचे सारखे नंबर प्लेट न बसविता वाहन चालविताना प्रादेशिक परिवहन अधिकारी पथक किंवा वाहतूक पथकाने रोखल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.

यानंतर अशा वाहनांचे मालकी अधिकार,वाहन हस्तांतरण, वाहन मालकाचा पत्ता बदल, फायनान्स प्रक्रिया रोखणे,कर्ज बोझ चढवीने किंवा उतरविणे,वाहन दस्तावेजांची दुय्यम प्रत,इन्शुरन्स अपडेट, आधी कामकाज थांबविले जाईल.यादरम्यान एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची चेकिंग आणि बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची जप्ती,तसेच वाहन मालक आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई होईल.असा प्रावधान या संदर्भातील कायद्यात सुद्धा आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one + 14 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.