Statewide Strike: आयटक Maharashtra राज्य आरोग्य खाते आशा व‌ गटप्रवर्तकांनी दिली जिल्हापरिषदेवर धडक‌.

१८ ऑक्टोबर पासून आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप.

Statewide Strike: आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचा‌ मोर्चा १८ ऑक्टोबरला श्रम शक्ती भवन यवतमाळ येथुन घोषणा देत आगेकुच करत निघाला शहरवासीयांचे लक्ष केंद्रीत करीत जिल्हा परिषद मार्गे जुना बसस्थानक चौकातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सलामी देवून सरळ नेताजी भवन पासून, नेताजी मार्केट मार्गे दत्त चौकातून पुन्हा जुना बसस्थानक चौकमार्गे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे कार्यालया पासुन जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्या ठिकाणी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एखनाथ शिंदे यांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, यवतमाळ यांचे मार्फत मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले असून खालील मागण्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्रातील ७० हजार आशा आणि ४ हजार गटप्रवर्तक राज्य व्यापी बेमुदत संपावर आजपासून जात असुन महाराष्ट्रात संप सुरू झाला आहे असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची १६ अॉक्टोबर रोजी प्रधान सचिव मा.मिंलिद म्हैसकर यांचे सोबत चर्चा झाली यावेळी आरोग्य सहसंचालक मा.सुभाष बोरकर उपस्थित होते.परंतु शासनाचे वतीने कुठल्याही मागण्या निकाली काढण्यात आल्या नाही त्यामुळे १८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीने कायम ठेवला असुन शासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात संपाचे हत्यार उपसले आहे.

मागण्या आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतनश्रेणी लागू करा.तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागु असलेली वार्षीक वेतनवाढ ५% अनुभव बोनस १५% गटप्रवर्तकांनासुद्धा लागु करून अॉक्टोबर २०२० पासून मागील फरकासहीत थकबाकी देण्यात यावी. या खेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा.

आशांना किमान वेतन दरमहा रू.२६०००/– मानधन/वेतन द्या. आशा स्वंयसेविकांना व गटप्रवर्तकांना दिवाळी पुर्वी एक महीण्याचे वेतना येवढे बोनस जाहीर करा.केंद्र सरकारने आशा यांच्या मोबदल्यात २०१८ पासुन कोणतीही वाढ केली नाही त्यात महागाई निर्देशांकानुसार भरिव वाढ करा.आशा सेविकावर लादलेली ऑनलाईन कामे बंद करा.

आशा व गटप्रवर्तकांना प्रस्तुती रजा मंजूर करा , यासह ईतरही न्याय मागण्यांना घेऊन आयटकचे नेतृत्वात मोर्चा धडकला यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे , कॉ.विजय ठाकरे, कॉ.निरंजन गोंधळेकर, नंदुभाऊ बुट, पप्पु भोयर नाकाळे सर यांनी मोर्चाला शुभेच्छा दिल्या वंदना बोंडे, आशा बडेराव , रंजना राऊत, रंजना वानखडे, सविता बरडे , सुनंदा कांबळे , राजाबाई लीखेवार, सुनिता सोनटक्के, विजया आत्राम, सुनिता कुंभारे , वंदना वाळुकर , रेश्मा वाघ, अनामिका कांबळे , मंजु कोळापे, रत्नमाला वडस्कर ,सिमा धादोड, नंदा चिंचे.

योगीता करमणकर , सुनिता चव्हाण,शालीनी पोले, छाया पाटील, सुजाता खाडे , सुलताना शेख, सुहासिनी भगत, पुजा भिमटे, ममता घनमोडे, माला इंगोले, रेखा मुधाने , विजया तायडे,नलिनी काळे, रंजना बलखंडे, कांता खरवडे, विजया शेखावत, सुलभा पवार, ज्योत्स्ना दुधे, माया इंगोले, बबिता चिंचोले , वर्षा वानखडे, गुंफा गेडाम , सुजाता पुनेकर , संगीता बरडे, राखी पवार, चंचल केदार, छाया राठोड.

योगीता हेमने, गंगा घुमे, शमशाद पठाण,शिला पवार,शालीनी ढोके, शुंभागी सुकळकर, माया ठमके,निता सोयाम, लक्ष्मी आत्राम, रंजना मेश्राम,छाया खडतर, रविना मुनेश्वर , मंगला रांखुडे, ममता शिरसागर , रेखा होले, किरण कांबळे, उज्वला पाझरे,गीता जाधव,शीला भगत, अर्चना माघाडे,शील्पा राठोड, सुनिता धानोरकर, सविता वाघमारे, सुकेशणी हलवले, बेबी प्रधान, अर्चना तोंडरे, विद्या गोडे, सिमा मुन ,दिपा झोंबाळे, सविता सीडाम, प्रतिभा सुरपाम, अनिता अर्के, लक्ष्मी बोडूवार ,शोभा राहुलवाड, सुशीला आडे, सुवर्णा चव्हाण.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nine + 10 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.