Vidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News

यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला जाब विचारणार आहेत.

याशिवाय राजकीय स्तरावर शिवसेनेसोबत जी गद्दारी झाली त्यानंतरही सर्वसामान्य नागरिक व महिलांसह शिवसेनेच्या जे महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यां शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत पाय रोवून उभ्या राहिल्या त्यांना बळ देवून त्यांच्यासोबत संवाद साधून विविध मुद्यांवर चर्चा या स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहो अशी माहिती शिवसेनेच्या उपनेत्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा Jyoti Thackeray यांनी आज यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासोबतच्या शिवसेना उपनेत्या शितल देवरुखकर शेठ,जिल्हा पदाधिकारी सागरताई पुरी,कल्पनाताई,शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड,विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे,माजी आमदार विश्वास नांदेकर,प्रवीण पांडे,यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी हजर होते. यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यासोबत संवाद यात्रेची माहिती देताना म्हंटले की स्त्री संवाद यात्रेचे तीन भाग असून यातून शिवसेनेच्या महिला नेत्या व त्यांचे शिष्टमंडळ हजर राहणार आहेत.

विदर्भात रामटेक,यवतमाळ – वाशिम अमरावती या तीन लोकसभा क्षेत्रावर फोकस करीत आजपासून यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव विधानसभेपासून याची सुरुवात करण्यात आली आहे,यादरम्यान महिला पदाधिकारींच्या कार्याचा आढावा,रिक्त पदे भरणे,नेमणुका करीत पदाधिकारी व महिलांसोबत चर्चा करण्यात येत आहे,मुख्यत ग्रामीण महिलांचे प्रश्न शहरी भागापेक्षा वेगळे राहतात त्यामुळे ग्रामीण महिलांसोबत संवाद साधण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पाठविले आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले,पाहू या त्या काय म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 18 =