WhatsApp Privacy Alert : Meta विरोधात गंभीर आरोपांची याचिका End-to-End Encryption वर प्रश्नचिन्ह.
Meta कर्मचारी मेसेज वाचू शकतात असा दावा जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अॅप WhatsApp च्या सुरक्षिततेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे.
व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी Meta विरोधात अमेरिकेतील कॅलिफोर्निया न्यायालयात एक गंभीर याचिका दाखल करण्यात आली असून, WhatsApp Messages Privacy धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे “आपले मेसेज खरोखरच सुरक्षित आहेत का?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Meta कडून WhatsApp वर End-to-End Encryption असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच, पाठवलेला मेसेज फक्त पाठवणारा आणि स्वीकारणारा यांनाच वाचता येतो. मात्र, याचिकेत असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे, की Meta मध्ये काम करणारे काही कर्मचारी WhatsApp वरील खासगी मेसेजेस पाहू शकतात.
ही याचिका कॅलिफोर्नियातील Northern District Court मध्ये दाखल करण्यात आली असून, जगभरातील अनेक WhatsApp Users यामध्ये सहभागी आहेत. विशेष म्हणजे, या याचिकेत एका भारतीय महिला याचिकाकर्त्याचाही समावेश आहे.
Meta वर नेमके आरोप काय?
याचिकेनुसार, WhatsApp आणि Meta प्रत्यक्षात वापरकर्त्यांचे मेसेज Store आणि Analyse करतात. काही Meta Engineers आणि कर्मचारी “Kleptographic Backdoor” या तंत्रज्ञानाचा वापर करून WhatsApp Chats मध्ये प्रवेश मिळवतात, असा दावा करण्यात आला आहे. एकदा अॅक्सेस मिळाला की कोणत्याही युजरचे संपूर्ण Chat History, Message Time, Location Metadata आणि Sender Details पाहता येतात, असे आरोप आहेत.
हे आरोप थेट End-to-End Encryption Policy Violation कडे निर्देश करणारे आहेत. जर हे आरोप खरे ठरले, तर WhatsApp च्या सुरक्षिततेवरील विश्वासाला मोठा धक्का बसेल.
आधीही Meta वर दंड-
याचिकेत Meta वर याआधी झालेल्या कारवाईंचाही उल्लेख करण्यात आला आहे.
2019 मध्ये US Federal Trade Commission (FTC) ने Meta वर 5 Billion Dollar Fine ठोठावला होता.
युरोपमध्ये GDPR Violation प्रकरणी Meta ला 1.2 Billion Euro दंड भरावा लागला.
WhatsApp खरेदीवेळी चुकीची माहिती दिल्याबद्दल Meta ला 110 Million Euro चा दंड झाला होता.
तसेच, या प्रकरणात US Federal Wiretap Law चे उल्लंघन होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
Meta आणि WhatsApp चे प्रत्युत्तर- WhatsApp Privacy Alert
या आरोपांनंतर WhatsApp चे प्रमुख Will Cathcart यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळत सांगितले की,
“WhatsApp मेसेजेस आम्ही वाचू शकत नाही. कारण Encryption Keys या युजर्सच्या फोनमध्येच असतात, आमच्याकडे त्यांचा अॅक्सेस नाही.”
कॅथकार्ट यांनी इस्रायलच्या NSO Group वर आरोप करत, ही याचिका तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे, WhatsApp ने याआधी NSO Group विरोधात केस जिंकली असून त्यांना 168 Million Dollar नुकसानभरपाई मिळाली होती.
युजर्ससाठी महत्त्वाचा इशारा-
हा वाद सध्या न्यायालयात असला तरी, Data Privacy, Online Security आणि WhatsApp Safety या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे युजर्सनी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.