RBI New 100 and 200 Rs Notes : देशात आता लवकरच चलनी नोटांमध्ये सामील असलेल्या 100 आणि 200 च्या नोटांच्या जागी आता नवीन स्वरूपाचे नोट चलनात येणार आहे.अर्थातच 100 आणि 200 च्या नवीन नोटा बाजारात चलनात येणार आहे.या संदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडिया {RBI} कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे आता भारतात आर्थिक स्वरुपात चलनी नोटांमध्ये 100 आणि 200 च्या नवीन नोटा लवकरच दाखल होत आहे.नियमानुसार नवीन नोटांवर वर्तमान आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी आहे.{RBI Governor Sanjay Malhotra}.
दरम्यान सध्या चलनात असलेल्या 100 आणि 200 नोटा चलनात राहणार किंवा नाही आणि याबाबत आरबीआयने काय निर्णय घेतला आहे?नवीन नोटांचे रंग,आकार,प्रकार कसा आहे,याबाबत आपण जाणून घेऊया…….
आता नव्या स्वरूपात या नोटा बाजारात चलनात सक्रिय होणार
भारतात आर्थिक नियोजन करणाऱ्या आणि देशासाठी चलनी नोट बनवून त्यांचे संचलन करणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाने {Reserve Bank Of India} चलनी नोटासंदर्भात मोठा असा निर्णय घेतला आहे.100 आणि 200 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्यात आला घोषणा आरबीआयने केली आहे.{100,200 Indian Currency Notes}.
त्यामुळे आता लवकरच देशात चलनात असलेल्या 100 आणि 200 रुपयांचे नोटामध्ये बदल झाला आहे.आता नव्या स्वरूपात या नोटा बाजारात चलनात सक्रिय होणार आहे.नियमानुसार या नोटांवर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी आहे.आता RBI कडून नोट छापणाऱ्या सरकारी छापखान्यात या नवीन स्वरूपांच्या नोटांची छपाई सुरु झालेली आहे.यानंतर देशात या नवीन शंभर आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा लाँच होणार आहे.
नुकतेच या संदर्भात आरबीआय ने निवेदन जारी केलेले आहे.{RBI Information About New Currency Notes}.यात दिलेल्या माहितीनुसार नवीन 100 आणि 200 रुपयांची नोटांची रचना पूर्वीप्रमाणे महात्मा गांधी यांच्या फोटोच्या सिरीज मधील नोटासारखीच आहे. {Mahatma Gandhi Indian Currency Note Series}.
तर यापूर्वी आरबीआयने जारी केलेले 100 आणि 200 रुपयांच्या नोटा ह्या देशात कायदेशीर चलन म्हणून सुरूच राहणार आहे.या बाबत नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चलनी नोटा चे स्वरूप बदलून त्यावर अमल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
( RBI New 100 and 200 Rs Notes ) हे आहे नवीन शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांची वैशिष्ट्ये.
- महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील ह्या 100,200 रुपयांच्या नोटा राहणार.
- या नोटांची डिझाईन ही महात्मा गांधी नोट सिरीज नुसारच आहे.
- महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील देशात चलनात येणाऱ्या 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही आहे.
- सोबतच या नवीन नोटांचे रंग,पॅटर्न आणि सर्व डिझाईन सारखे आहे.
- या 100,200 नोटेच्या मागील बाजूस ‘सांची स्तूप’ असे चित्र आहे, जे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. नोटेचा मूळ रंग चमकदार पिवळा आहे. नोटेच्या मागील बाजूस आणि मागील बाजूस इतर डिझाइन, भौमितिक नमुने आहेत, जे एकूण रंगसंगतीशी जुळतात.
- 200 रुपयांच्या नोटांचा आकार
नवीन 200 नोटेचा आकार 66 मिमी x 146mm.आहे.
- 100 रुपयांच्या नोटांचा आकार
नवीन नोटेचा आकार 66 मिमी x 142mm.आहे.
महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 100 रुपयांच्या नोटा
- महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 100 रुपयांच्या नवीन नोटांवर रिझर्व्ह बँक गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी आहे.
- या नोटेच्या मागील बाजूस ‘राणी की वाव’ हे चित्र आहे.हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
- नोटेचा मूळ रंग लैव्हेंडर आहे.या नोटेमध्ये इतर डिझाइन्स आहेत,नोटेच्या समोर आणि मागे दोन्ही बाजूंनी एकूण रंगसंगतीसोबत जुळणारे भौमितिक नमुने दिलेले आहेत.
सध्या चलनात असलेले 100आणि 200 रुपयांची नोट कायद्यानुसार पूर्वीप्रमाणे चलनात राहील.
उल्लेखनीय म्हणजे आरबीआय च्या {RBI}नोट स्वरूप बदलण्याचा निर्णय आणि याची घोषणा झाल्यानंतर जुन्या शंभर आणि दोनशे रुपयांचे नोट चलनात राहणार किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण झाले होते?यावर RBI चे स्पष्ट निर्देश आहे.देशात सध्या चलनात असलेले 100आणि 200 रुपयांची नोट कायद्यानुसार पूर्वीप्रमाणे चलनात राहील.या जुन्या नोटा देशात चलनात नियमितपणे सक्रिय राहणार आहे.{Current 100 And 200 Notes In Transactions}.
नव्या येणाऱ्या नोटांसह नागरिक जुन्या नोटांचे पूर्वीप्रमाणेच चलनासाठी वापर करू शकणार आहेत.याव्यतिरिक आरबीआय कडून 50 रुपयांच्या नोटावर आता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही राहणार आहे.या नव्या नोटा सुद्धा लवकरच आरबीआय बाजारात चलनात सक्रिय करणार असल्याची माहिती आहे.