New Passport Rules 2025 : केंद्र सरकारकडून आता पासपोर्ट जारी करण्याचे नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे.पासपोर्ट बनविण्यासाठी काही नवीन कागदपत्रे लागणार आहेत.पासपोर्ट मध्ये पत्त्याच्या जाग्यावर आता बारकोड राहणार आहे.सोबतच नवीन रंग कोड प्रणाली राहणार आहे.
आता विविध श्रेणीतील पासपोर्टचा रंग सुद्धा बदलण्यात येणार आहे.अर्थातच यापुढे पासपोर्ट संदर्भात नवीन कलर कोडींग असेल.त्यामुळे आता विविध पासपोर्टचे कव्हर सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे असेल.विमान प्रवास करण्यापूर्वी विमानतळावर पासपोर्टचे वर्गीकरण करणे यामुळे अधिकाऱ्यांना सोपे होईल.
- सर्वसामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणे निळ्या रंगाचा पासपोर्ट असेल.{Blue Color Passport}.
- तर सरकारी अधिकाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या पासपोर्ट हा पांढरा रंगाचा असेल.{White Color Passport}.
- केंद्रीय प्रशासनिक सेवेतील मुत्सद्दी अधिकाऱ्यांना लाल रंगाचा पासपोर्ट मिळेल.{Red Color Passport}.
दरम्यान केंद्र सरकारने पासपोर्ट जारी करण्याचे नियमात काय बदल केलेला आहे आपण ते या माध्यमातून जाणून घेऊया…..
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट हा निकाल दस्तावेज असतो.Passport नसल्यास कोणत्याही देशाचा व्हिसा मिळविता येत नाही.आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारतातील पासपोर्ट हा एका प्रकारे भारतीय नागरिकत्वाचा आणि वैयक्तिक माहितीचा महत्वपूर्ण दस्तावेज असतो.इतर देशात प्रवासासाठी पासपोर्ट असणे अनिवार्य आहे.
भारतात परराष्ट्र मंत्रालयाच्या यंत्रणे कडून विविध प्रकारचे पासपोर्ट जारी करण्यात येतात.दरम्यान केंद्र सरकारने आता देशात पासपोर्टच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत.पासपोर्ट नियम 1980 नियमावलीनुसार हे बदल येणाऱ्या आठवड्यात लागू होणार आहे.सरकारकडून पासपोर्ट संदर्भात नवीन नियम हे राजपत्रात प्रकाशित होईल.
New Passport Rules 2025 : जन्म दाखला प्रस्तुत करणे अनिवार्य.
आता पासपोर्ट बनविण्यासाठी काही नवीन डॉक्युमेंट्स संबंधित यंत्रणेला प्रस्तुत करावे लागेल.
यात जन्म दाखला प्रस्तुत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या पासपोर्ट संदर्भात सुधारित नियमानुसार आता 1 ऑक्टोबर 2023 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीला पासपोर्टसाठी अर्ज करताना आपला जन्म दाखला Passport साठी अर्जासह जोडून देणे अनिवार्य असेल.उल्लेखनीय म्हणजे महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था भागात जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत संबंधित प्राधिकरणाकडूनच हा जन्म दाखला प्राप्त असावा.
- विशेष म्हणजे 1 आक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना पासपोर्ट संबंधात हा नवा नियम लागू होणार नाही.
- असे नागरिक जे 2023 पूर्वी जन्मलेले आहे,ते पासपोर्ट मिळविण्यासाठी पूर्वीप्रमाणे
- एसएससी बोर्ड सर्टिफिकेट{SSC Board Certificate }.
- शाळा सोडल्याचा दाखला{School Transfer Certificate}.
- वाहन चालक परवाना.
- पॅन कार्ड, आणि इतर सरकारी ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करू शकणार आहे.
निवासी पत्र दाखल करणे आवश्यक.
आता पासपोर्ट बनविण्यासाठी अर्ज करताना अर्जदाराचा निवासी पत्ता दाखला देणे गरजेचे राहणार आहे. यापूर्वी पासपोर्टच्या शेवटच्या पेजवर संबंधित पासपोर्ट धारकाचा कायमचा पत्ता छापलेला असायचा.
मात्र यापुढे आता पासपोर्टच्या शेवटच्या पानावर फक्त छापल्या जाणार नसून,त्याऐवजी तेथे एक बारकोड छापला जाईल आणि हा बारकोड इमिग्रेशन अधिकारी स्कॅन करून पासपोर्ट धारकाच्या पत्यासंदर्भात आधुनिक पद्धतीने बारकोडनेच माहिती घेतील.{Barcode System For Address Proof}
पासपोर्टसाठी आता नवीन कलर कोड.
सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार आता विविध श्रेणीतील पासपोर्टाचे रंग वेगवेगळे रंगात असेल.यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना विविध स्तरावर विविध पासपोर्टचे वर्गीकरण करणे सोपे होईल.
सर्वसामान्य नागरिक श्रेणीतील लोकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगाचा कव्हर असलेला पासपोर्ट पूरविला जाईल.तर सरकारी अधिकाऱ्यांना यापुढे पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट मिळेल.तर मुत्सद्दी अधिकाऱ्यांना लाल रंगाचा कव्हर असलेला पासपोर्ट मिळणार आहे.
शेवटच्या पानावर पालकाचे नाव राहणार नाही.
आता नवीन नियमावलीनुसार पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्ट धारकाचे पालकांचे नाव छापले जाणार. या बदलावामुळे पालक किंवा विभक्त कुटुंबातील पासपोर्ट धारकाला कोणताही दिलासा मिळणार नाही.
पासपोर्ट मधून या संबंधात व्यक्तिगत बाबीची माहिती जाहीर करण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तींना अशी माहितीची गोपनीयता बाळगता येणार आहे.
देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढणार.
उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत विविध राज्यात पासपोर्ट साठी अर्ज करणाऱ्या नागरिकांसाठी आपल्या मुख्यालयांना जाऊन तेथे संबंधित पासपोर्ट अर्ज प्राधिकरणाला अर्ज करावे लागते.यामुळे नागरिकांना पासपोर्ट साठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.
मात्र आता देशभरात सरकार पासपोर्ट संबंधित सेवा केंद्रांची संख्या वाढविणार आहे.यामुळे आता नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे,पासपोर्ट मध्ये मजकुरात असलेला बदल करणे, पासपोर्ट रिन्यूअल करणे यासारखी कामे या पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे होईल.
सरकारद्वारे पुढील 5 वर्षात देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या आता 600 पर्यंत केली जाणार आहे.