Nagpur Old Name : तुम्हाला माहित आहे का नागपूरचे प्राचीन नाव? 1085 वर्षे जुना इतिहास असलेल्या नागपूरचे नाव कसे पडले?

Nagpur Old Name : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे,याला राज्याची उपराजधानीचा दर्जा प्राप्त आहे. देशात ऑरेंज सिटी म्हणून नागपूरला  ओळखले जाते.याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागपूर जिल्ह्याला टायगर कॅपिटल म्हणूनही ओळख आहे.तर येथे भव्य अशी दीक्षाभूमी आहे.

गेल्या काही दशकात सर्वात जास्त वेगवान पद्धतीने नागपूर शहर हा विकासाला सामोरे जात आहे.पण अनेकांना विविध वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक वारसा भाभ्लेल्या नागपूर शहराचे प्राचीन नाव काय आहे,आणि हे नाव कसे पडले? हे बहुतेक लोकांना  माहिती नसेल.तर चला नागपूरचे प्राचीन आणि जुने ऐतिहासिक नाव काय आहे हे आपण या माध्यमातून जाणून घेऊया…

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

10 व्या शतकात ऐतिहासिक ताम्रपटावर नागपूरचा नाव.

महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे जसे प्रसिद्ध आहे तसेच राज्यात सर्वात मोठे तिसरे शहर हे नागपूर आहे,जो राज्याची  उपराजधानी तर आहेच. पण उपराजधानी सोबतच नागपूर शहर आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. राज्याची उपराजधानी असल्याने महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर मध्ये घेण्याची राजकीय आणि प्रशासकीय परंपरा आहे.

नागपूर राज्यातील खूप मोठा असा शहर आहे आणि याचा ऐतिहासिक वारसा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.नागपूरचा नाव उल्लेख देशाच्या प्राचीन इतिहासात नमूद आहे.10 व्या शतकात ऐतिहासिक ताम्रपटावर नागपूरचा नाव आढळलेला आहे.इसवी  सन 940 मध्ये नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या वर्धा जिल्ह्यातील तालुका असलेल्या देवळी येथे  आढळलेल्या ताम्रपटावर नागपूर शहराचा ऐतिहासिक उल्लेख आहे.

नागपूर शहर हे नाग नदीच्या तीरावर वसलेले शहर असून प्राचीन काळात या भागावर गोंड राजे बख्त बुलंदशहा यांनी या शहराला नाग नदीच्या तीरावर विकसित केले होते.{Gond King Bakhta Bulandshah}उल्लेखनीय म्हणजे नागपूर मध्ये वाहणारी नाग नदी ही एखाद्या नाग सर्पा सारखी वाहत जाते.

म्हणूनच या नाग नदीमुळे आधी या शहरला नाग असे नाव पडले.या नाग नदी मुळेच या प्राचीन आणि ऐतिहासिक शहराचे नाव नाग असे पडले होते.कालांतराने शहराचे नाव नाग वरून नागपूर झाले, आणि ते आजतागायात प्रचलित आहे.

Nagpur Old Name : ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर नागपूर

नागपूर शहराचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.याला ऐतिहासिक असा वारसा सुद्धा लाभलेला आहे. {Historical City Nagpur}भारताच्या स्वातंत्र्य काळापूर्वी 19 व्या शतकापूर्वीच ब्रिटिश साम्राज्य देशात विस्तारलेला होता.भारतात ब्रिटिश राज्याचा विस्तार होत गेला आणि त्यांनी अख्खे भारत आपल्या ब्रिटिश साम्राज्यात घेतले.याच दरम्यान 18 व्या शतकात ब्रिटिश शासनाने ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत नागपूर शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली होती.

{British Era In Vidarbha}याच काळात सेंट्रल प्रोव्हीअन्स अँड बेराची राजधानी म्हणून नागपूरला निश्चित करण्यात आले. दीर्घ काळ नागपुर हा बेरारची राजधानी राहिला.देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आला आणि बेरार प्रांत हे महाराष्ट्रात सामील झाले आणि मुंबई शहर हे महाराष्ट्राची  राजधानी बनले तर विदर्भातील नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी सह महत्त्वाचे शहर म्हणून आज व्यवसायिक केंद्र झालेले आहे.

औद्योगिक आणि आर्थिक विकासात वाढ.

गेल्या दोन दशकात नागपुराचा खूप विकास झाला असून,अलीकडे काही वर्षात येथे मिहान सेझ {MIHAN SEZ}आणि इतर औद्योगिक वसाहतींमुळे देशी-विदेशी गुंतवणूकदारांचे नागपूरकडे लक्ष आकर्षित झाले आहे.येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे.त्यामुळे नागपूर येथील अर्थव्यवस्था खूप विस्तारत आहे.विविध प्रकारचे उद्योग आणि पर्यटन केंद्र म्हणून नागपूर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.

धार्मिक वारसा लाभलेले शहर.

स्वातंत्र्य काळानंतर नागपुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता ते ठिकाण होते दीक्षाभूमी.या धम्मदीक्षामुळे नागपूर हे अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी येतात.{NAGPUR DIKSHABHUMI}.

तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात कामठी येथे आंतरराष्ट्रीय स्तराचे ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे.येथे इंटरनॅशनल विपश्यना केंद्र आहे.{KAMTHI DRAGON PALACE}. नागपुरात टेकडी गणेश मंदिर.{TEKADI GANESH TEMPLE},बेसा भागातील गुरु मंदिर,साई मंदिर,बालाजी देवस्थान कोराडी येथील देवी मंदिर,पारडी भागात भवानी देवी मंदिर असे नागपूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 1240 धार्मिक स्थळे आहेत.त्यामुळे नागपूरला धार्मिक वारसाही लाभलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.