Aadhaar Linked SIMs : जाणून घ्या तुमच्या आधार नंबर सोबत किती Sim Card लिंक आहेत ? अगदी सोपे  स्टेप्स!

Aadhaar Linked SIMs : आजच्या या डिजिटल युगात प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक हे दोन महत्त्वाचे साधन झालेले आहे.कोणत्याही शासकीय कामासाठी,बँक खाते, शासकीय नोकरी,सरकारी सेवा योजनांसाठी आधार कार्ड हा प्रमुख ओळखपत्र म्हणून ओळखला जातो.

तर मोबाईल फोन क्रमांकमुळे व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात असतात. अर्थातच आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे महत्त्वाचे झालेले आहे.तर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे एकमेकांच्या संपर्कात जोडल्या जाते.त्यामुळे नागरिकांना स्वतःचे सिम कार्ड मिळत असते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आधार कार्ड व्हेरिफाइड करताना असे गैरप्रकार टाळा?

आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आपल्या बँक खात्यासोबत जोडल्या जात असल्याने बँकिंग व्यवहार आणि इतर शासकीय योजनांचा लाभ सहजपणे घेण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे.

आता तर आधार कार्डचा वापर हा मोबाईलसाठी सिम कार्ड खरेदी करण्यात महत्त्वाचा झालेला आहे,पण मोबाईलसाठी सिम कार्ड खरेदी करताना,आधार कार्ड व्हेरिफाइड करताना अनेक गैरप्रकार सुद्धा होत आहे.

मोबाईलसाठी सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्डचा वापर केल्यास अनेकदा गैरप्रकार आणि होतात.हे टाळण्यासाठी आपल्या आधार कार्ड अंतर्गत किती सिम ऍक्टिव्ह आहेत, अर्थातच आपल्या आधार नंबर सोबत लिंक असलेले सिम कार्ड किती आहे हे,जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.या माध्यमातून आपण याची माहिती जाणून घेऊया…..

Aadhaar Linked SIMs : एका आधार कार्ड वर एकूण नऊ सिम कार्ड लिंक होतात.

भारतीय दूरसंचार विभागाच्या नियमानुसार कोणताही व्यक्ती आपल्या व्यक्तिगत आधार कार्ड चा वापर करून जास्तीत जास्त एकूण 9 सिमकार्ड आपल्या आधारसोबत लिंक करू शकतो.(DOT Guideline).जर ही मर्यादा ओलांडली तर अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते.

त्यामुळे आपल्या आधारकार्ड सोबत एकूण किती मोबाईल नंबर लिंक आहे,याची खात्री जर नसल्यास अगदी काही मिनिटातच आपण याबाबतीत ऑनलाइन तपासणी करू शकतो. ती कशी? तर खाली दिलेली माहिती जाणून घ्या.

  • दूरसंचार विभागाच्या (DoT) नियमांनुसार, एक व्यक्ती  आपल्या  आधार कार्डसोबत जास्तीत जास्त म्हणजे 9 नऊ Sim Cards link करू शकते.
  • जर ही मर्यादा ओलांडली तर कायदेशीर कारवाईची शक्यता असते.
  • आपला आधार नंबर एकूण किती मोबाईल Sim नंबर लिंक(Aadhaar linked SIMs) आहेत,याबाबत जर  काहीच खात्री नसल्यास,अगदी मिनिटांतच याची ऑनलाइन तपासणी होऊ शकते.ती Online तपासणी खालील प्रमाणे करा.
  • सर्वात आधी आपल्या टेलिकॉम ऑपरेटर वेबसाइटला ओपन करा.
  • जर तुमचा सिम सेवा ऑपरेटर एअरटेल, जिओ, व्हीआय किंवा बीएसएनएल असेल तर  यापैकी जो ऑपरेटर असेल त्यावेळी दिलेल्या ऑप्शन वर आपला आधार लिंकिंग’ किंवा ‘व्हेरिफाय नंबर शोधा.
  • तेथे आपल्या आधार कार्डचे डिटेल्स नमूद करून ते सबमिट करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  • आपल्या  आधार नंबरसोबत लिंक असलेल्या ACTIVE Numbers ची यादी येथे पाहण्यासाठी आलेला ओटीपी Enter करा.
  • यानंतर  मोबाइल यूएसएसडी कोडद्वारे तपासणी करा.{USD CODE}
  • आपल्या मोबाइल फोनवर **121# * हे क्रमांक  डायल करा.
  • आधार लिंक केलेले मोबाइल नंबर तपासण्यासाठी येथे दिलेल्या ऑन-स्क्रीन माहितीचे पालन करा.
  • आधार कार्ड सोबत सिम कार्ड लिंक असल्याची माहिती देण्यासाठी  ही सेवा  टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे पडताळणीसाठी {Verifications)} प्रदान केली जात असते.

संचार साठी पोर्टलची मदत घ्या.

उल्लेखनीय म्हणजे  टेलिफोन  रेगुलीरिटीच्या या सेवेव्यतिरिक्त आपण संचार साथी पोर्टल चा वापर करून आपला आधार कार्ड लिंक असलेले सिमची तपासणी करू शकतो.यासाठी केंद्र सरकारकडून आधार नंबर सोबत लिंक असलेले मोबाईल नंबर ट्रॅक करण्यासाठी संचार साठी पोर्टल www.sancharsaathi.gov.in ही सेवा सुरू केली आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी संचार साथी पोर्टलच्या वेबसाइटला जावे लागेल.{Sanchar Sathi Portal}

  • ही साईट ओपन केल्यावर तेथे दिलेल्या ‘Citizen Centric Services’  या ऑप्शनवर क्लिक करा.
  • येथे दिलेला Know Your Mobile Connections {TAFCOP}हा पर्याय निवडा.
  • आपला  रजिस्टर मोबाइल नंबर येथे नमूद करा आणि आपल्या फोनवर मिळालेला OTP वापरून त्याची पडताळणी {Verification} करा.
  • येथे पडताळणी सुरु केल्यावर आपल्या  आधार नंबर सोबत Link केलेल्या मोबाइल नंबरची यादी येथे दिसेल.

आपले आधार कार्डनंबर लिंक केलेले सिम नियमितपणे का तपासावे?

स्वतःसाठी मोबाईल सिम घेताना आणि त्याची नोंदणी करताना,आधार नंबरचा वापर होतो.{Aadhaar Unique Identity Numbers}.त्यामुळे SIM CARD नोंदणीसाठी आपल्या आधार नंबरचा याकरिता कोणीही अनधिकृत वापर करू नये,आणि हा गैरप्रकार टाळण्यासाठी वरील पर्याय हे महत्त्वाचे आहे.

वेळोवेळी आपल्या आधार नंबर सोबत आपले किती मोबाईल नंबर लिंक आहे,याची माहिती घेणे गरजेचे आहे.{Aadhaar Linked SIMs}.कारण असे केल्यास आपल्या आधार नंबर संबंधित फसवणूक आणि बेकायदेशीर एक्टिविटी आपण टाळू शकतो.

वेळीच याची माहिती असल्यास तुम्ही आपल्या आधार नंबरचा गैरवापर कुणीही करणार नाही याची खात्री करण्यासाठी वरील दिलेले सोपे स्टेप्सचे पालन करायला हवे.

असे करून आपल्या आधार नंबर सोबत लिंक असलेले आपले सिम कार्ड आणि इतर कोणी आपल्या आधार कार्डचा नंबर वापरून अनधिकृतपणे SIM Card तर वापरत नाही ना?याला आपण  या माध्यमातून सहजपणे ट्रॅक करू शकतो,आणि पुढील अनुचित आणि गैर कायदेशीर प्रकार स्वतः काढू शकतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.