Indias First Hydrogen Train : भारताने रेल्वे क्षेत्रात अमुलाग्र बदल आणि क्रांतिकारी अशी टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे देशात डिझेल आणि कोळशाच्या वाफेवर चालणारी ट्रेन आता इतिहास जमा झाली आहे.डिझेल रेल्वे इंजिन वापरानंतर संपूर्ण देशात भारतीय रेल्वे इलेक्ट्रिक पद्धतीने आपली सेवा देत आहे.यात आधुनिक रेल्वे टेक्नॉलॉजी वापरात येत आहे.मात्र आता भारतीय रेल्वेने एकदा क्रांतिकारी अशी नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
भारताने जगातील सर्वात जास्त हॉर्सपावर क्षमतेचा हायड्रोजन ट्रेन इंजन विकसित केला आहे,{Most Powerful Hydrogen Train Engine In India}येणाऱ्या 2031या वर्षात भारतात पहिली पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन रेल्वे ट्रॅक वर धावणार आहे.तर चला जाणून घेऊया काय आहे ही हायड्रोजन ट्रेन सिस्टम आणि देशात हे केव्हा सुरू होणार.
देशात डिझेल रेल इंजिन वापरानंतर भारतीय रेल्वे सेवा ही इलेक्ट्रिक सिस्टम कडे वळलेली आहे.भारतीय रेल्वेने यात खूप प्रगतीही गाठली आहे. आता देशाची रेल सेवा ही पुन्हा एकदा नवीन हायड्रोजन पॉवर तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज दिसत आहे.
{Hydrogen Power System} रेल्वे मंत्रालय आता देशात लवकरच हायड्रोजनवर शक्तीवर आधारित रेल्वे सेवा सुरू करण्याच्या तयारीत दिसत आहे.उल्लेखनीय म्हणजे देशात पहिली हायड्रोजन ट्रेन सेवा मार्च 2031 मध्ये उत्तर रेल्वे विभागातून सुरु होईल यानंतर अश्या हायड्रोजन पॉवर आधारित ट्रेन सेवा संपूर्ण भारता सुरु भौन यातून देशात उर्जेची मोठी बचत होणार आहे.{North Railway Division}
Hydrogen Train technology साठी 2800 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
रेल्वे मंत्रालयाने भारतात पावरफुल हायड्रोजन शक्तीवर चालणारी ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे देशात रेल्वे इंजिनियर्स जगातील सर्वात पावरफुल क्षमतेचा हायड्रोजन रेल इंजन निश्चित केलेला आहे सोबतच या आधुनिक ट्रेन सिस्टीम साठी रेल्वे मंत्रालयाकडून भरभरून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
प्राथमिक स्वरूपात रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन ट्रेन इंजन आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीकरिता 2800 कोटी रुपयांचा निधी मंजूर सुद्धा केलेला आहे यानंतर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन चेन्नई मध्ये असलेल्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (Integral Coach Factory) येथे तयार केली जात आहे.
हे आहेत Indias First Hydrogen Train इंधन ट्रेनचे फायदे.
देशाला या हायड्रोजन इंधन ट्रेनमुले अनेक फायदे मिळणार आहेत. यात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे भारतात ग्रीन ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी वापरून 0 कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे एक मोठे पाऊल असेल.
2023-24 या आर्थिक वर्षत रेल्वे मंत्रालयाने यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आणि 35 हायड्रोजन फ्युअल सेल आधारित रेल्वे इंजिन आणि कोच विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे.
भारतात पहिली हायड्रोजन ट्रेन सेट या मार्च 2025 महिन्यात तयार होणे अपेक्षित आहे.यापूर्वी यासंदर्भात माहिती देताना जानेवारी महिन्यातच रेल्वेचे जनरल मॅनेजर यू. सुब्बा राव यांनी म्हटले होते कि,प्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून भारतीय रेल्वे कडून सध्या Hydrogen Fuel Cell ट्रेन सेटवर काम केलेल्या जात आहे. सोबतच हायड्रोजन फ्युअल सेल कोच निर्मितीचे काम सुद्धा सुरू असून मार्च २०२५ मध्ये हा ट्रेन सेट तयार होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
1200 हॉर्सपॉवर (HP) क्षमतेचे हायड्रोजन रेल इंजिन तयार करून देशाचे मोठे यश.
भारताने अलिकडे भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आणि रेल्वे निर्मितीवर विकासाचा मोठा टप्पा गाठला आहे भारतात विविध ठिकाणी मेट्रो ट्रेन प्रोजेक्ट आणि मुंबई ते गुजरात बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रगती पथावर आहेत सोबतच देशभरातील रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण आणि रेल्वे टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे.
आता भारताने हायड्रोजन ट्रेन टेक्नॉलॉजी मध्ये गगन भरारी घेण्यास सुरुवात केली असून भारताने आता जगातील सर्वाधिक जास्त क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे हे ट्रेन इंजिन विकसित केले आहे.
आतापर्यंत एवढ्या पावरफुल क्षमतेने कोणत्याही देशाने असे हायड्रोजन ट्रेन इंजिन बनविण्यात अद्याप यश प्राप्त केले नाही यापूर्वी जगात बहुतांश देशांमध्ये फक्त 500 ते 600 हॉर्सपॉवर (Horse Power) क्षमतेच्या हायड्रोजन ट्रेन आहेत,मात्र नुकतेच भारताने 1200 हॉर्सपॉवर (HP) क्षमतेचे हे हायड्रोजन रेल इंजिन तयार करून या क्षेत्रात मोठे असे यश मिळविलेले आहे.
पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे धावणार?
वर्ष 2031 मध्ये भारतात स्वदेशी तंत्रज्ञानातून निर्मित देशाची ही पहिली हायड्रोजन ट्रेन सर्वात आधी उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातून धावणार आहे. याची सर्वात आधी जबाबदारी ही सध्या या रेल्वे विभागाला देण्यात आली आहे. या वर्षत हि हायड्रोजन रेल्वे या विभागात 89 किलोमीटर लांबीच्या जिंद-सोनीपत या Track वर धावण्याची शक्यता आहे.