Petrol Prices : सध्या देशात पेट्रोलच्या किमती कमी होणार किंवा नाही याबाबत केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांनी अधिकृत घोषणा केली नाही मात्र देशातील एका महत्त्वाच्या पेट्रोल कंपनीने पेट्रोल दर कमी करू वाहनधारकांसाठी पेट्रोल भरून घेण्याकरिता विशेष अशी ऑफर दिलेली आहे.आता भारत पेट्रोलियमच्या पंपांवर फक्त 75 रुपये लिटर पेट्रोल मिळणार आहे.
भारत पेट्रोलियम कंपनीकडून वाहनधारकांना इंधन दरासाठी विशेष ऑफर देण्यात आली. मागील अनेक काळापासून देशात डिझेल पेट्रोल आणि इतर इंधन दरात कमी होत नसताना, सर्वसामान्य वाहनधारक आर्थिक बोजा सहन करीत आहे.मात्र भारत पेट्रोलियम ने आपल्या देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोबाईल नंबर नमूद करून अगदी स्वस्तात पेट्रोल देण्यास सुरू केले.
भारत पेट्रोलियम कंपनीने ग्राहकांना 75 रुपये प्रति लिटर पेट्रोल भरण्यासाठी खास अशी ऑफर दिल्याने या कंपनीच्या सर्व पेट्रोल पंपांवर खूप गर्दीही दिसून आली.तर आपण या माध्यमातून जाणून घेऊया भारत पेट्रोलियम ने हे 75 रुपये लिटरची हि ऑफर का दिली…
Petrol Prices : येथेच फक्त 75 रुपये लिटर पेट्रोल.
सध्या भारतात सर्वसामान्य नागरिक महागाई पासून त्रस्त आहे,फळभाजी,दैनंदिन वस्तू,खाद्यपदार्थ तसेच वस्त्रांचे दर खूप महाग झाले आहे तर दुसरीकडे वाहनांसाठी इंधन गरज जास्त असताना देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही.सध्या पेट्रोल डीझेल दर खूप महाग आहेत.
मात्र भारताची सरकारी तेल कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीने देशभरात आपल्या सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना स्वस्त म्हणजेच फक्त 75 रुपये लिटर पेट्रोल भरण्यासाठी खास ऑफर दिली.
दुचाकी वाहनधारकांना या ऑफर मधून फक्त 75 रुपयांमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचे ऑफर देण्यात आले.महत्त्वाचे म्हणजे भारत पेट्रोलियम कंपनीने फक्त 28 फेब्रुवारी 2025 च्या रात्रीपर्यंत ही ऑफर दिलेली आहे.
का दिली स्वस्त पेट्रोल ची अशी ऑफर ?
सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम चा 28 फेब्रुवारी रोजी स्थापना दिवस असल्याने या निमित्ताने कंपनीकडून आपल्या पेट्रोल पेट्रोल पंपांमध्ये दुचाकी वाहनधारकांसाठी प्रति लिटर 75 रुपये किमतीत पेट्रोल देण्याची ऑफर सुरू केली,मात्र यासाठी वाहन धारकाचे वय फक्त 18 वर्षे पेक्षा जास्त असणे हे अट ठेवण्यात आली होती.
75 रुपये लिटर पेट्रोल मिळविण्यासाठी कंपनीने ग्राहकांना या ऑफर मध्ये सामील होण्यासाठी पेट्रोल पंपावर आपला मोबाईल नंबर नमूद करण्यासह 1 हजार रुपये पर्यंत कॅशबॅक ऑफर सुद्धा दिली होती.
पण भारत पेट्रोलियम कंपनीच्या डीलर्स,भारत पेट्रोल पंपांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्यांना या ऑफर मध्ये सहभागी होण्याची परवानगी नव्हती,याव्यतिरिक देशातील ज्या राज्यात आणि टेरिटरी मध्ये यासारख्या ऑफर्स वर कायदेशीर बंदी असल्याने तिथे दुचाकी वाहनधारकांना स्वस्त पेट्रोल मिळणार नव्हता.
ग्राहक असे घेऊ शकतात या ऑफरचा लाभ ?.
भारत पेट्रोलियम कंपनीकडून हा ऑफर आपल्या सर्व ग्राहकांना सुरू करण्यात आला असून 28 फेब्रुवारी पर्यंत ग्राहकांना या ऑफर्स चा लाभ घेता येणार आहे. 75 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळविण्यासाठी कंपनीने खालील प्रमाणे ठेवले आहे.
- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावरून पेट्रोलसह MAK 4T इंजिन ऑइलचा किमान एक पॅक खरेदी करावा लागेल.
- इंजिन ऑइल खरेदी करण्यासोबतच, तुम्हाला ७५ रुपयांचे पेट्रोल त्वरित मोफत मिळेल.
- हवे असल्यास,भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर इंजिन ऑइल मोफत बदलू शकता. एवढेच नव्हे तर ग्राहकांना त्याच्या बॉक्सवर एक QR स्कॅन कोड मिळेल.
- हा QR कोड पेट्रोल पंपावरील कर्मचारी स्कॅन करेल आणि यामुळे तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो.
- आपल्या स्थापना दिनानिमित्त ग्राहकांना ऑफर्स देताना भारत पेट्रोलियम कंपनीकडून याचा लाभ फक्त एकदा आणि एकाच मोबाईल नंबर वर देण्याचे स्पष्ट केले होते.