Toyota Innova Electric Car : टोयोटा ऑटोमोबाईल्स इनोव्हा कडून त्याची इनोव्हा ही आयकॉनिक कार आता इलेक्ट्रिक वर्जन मध्ये डिजिटल फीचर्स, नव्या डिझाईन मध्ये भारतात लवकरच लॉन्च होणार आहे.नुकतेच इंडोनेशियामध्ये झालेल्या इंटरनॅशनल मोटर शो 2025 मध्ये कंपनीने या Innova BEV SUV इलेक्ट्रिक कार ला आपल्या पूर्ण विकसित अशा मॉडेलमध्ये प्रदर्शित केले आहे.
यापूर्वी टोयोटा ने 2022 मध्ये इनोव्हा इलेक्ट्रिक कारचे पहिल्यांदा मॉडल सादर केले होते.आता त्यात अधिक डिजिटल फीचर्स आणि प्रगत टेक्नॉलॉजी सोबतच उत्कृष्ट डिझाईन सह नव्याने प्रदर्शित करण्यात आले आहे. टोयोटा इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो 2025 मध्ये या आयकॉनिक INNOVA Electric Car चे प्रदर्शन होताच ऑटोमोबाईल क्षेत्राचे या SUV इलेक्ट्रिक कार वर लक्ष येऊन ठेपले आहे.
- टोयोटा ऑटोमोबाईल्स कंपनीने ही नवीन टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिक कार इंडोनेशिया मधील डिझेल Keyjong Inova या मॉडेलच्या लुक वर आधारित नवीन अशी इलेक्ट्रिक SUV कार प्रदर्शित केलेली आहे.या इलेक्ट्रिक कारचे स्पोर्टियर हेडलाईट्स (DRL) डे टाईम रनिंग लाइट्स,टॉप माउंटेड LED Strip आणि यात विशिष्ट असा क्लोज ग्रील देण्यात आला आहे.
- भारतात लॉन्च होणारी ही BEV (बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल कार) इनोवा मध्ये 16- इंचाच्या Alloy Wheels देण्यात आले असून, याला पारंपरिक असे डोअर हँडल्स, ड्युअल टोन ओआरव्हीएम ORVM आधारित टर्न सिग्नल सह कारच्या मागील बाजूस रॅप अराउंड टेल लॅम्प आणि BEV बॅज असेल, हे बॅज या इनोवा EV SUV कारच्या इलेक्ट्रिक वर्जनला प्रदर्शित करेल.
Toyota Innova Electric Car इंटेरियर फीचर्स.
- टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिक कार मध्ये आतील भागात प्रशस्त अशी जागा आणि Luxury Look देणारा इंटेरियर डिझाईन करण्यात आला आहे.या लक्झरी कार मध्ये आता प्रवास करताना आरामदायी प्रवास होणार आहे.
- Toyota इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये डॅशबोर्ड वर 10 इंचाचा टच स्क्रीन Infotainment सिस्टम.
- Ambident Lighting वायरलेस चार्जर सुविधा.
- Dual Tone Interior Theme.
- एखादा प्रायव्हेट जेट मध्ये असलेली कॅप्टन सीट सारखी सीटिंग सिस्टम.
- रियल सीट इंटरटेनमेंट स्क्रीन सारखी डिजिटल आणि आधुनिक Features देण्यात आली आहे.
- आधुनिक आणि प्रगत अशा टेक्नॉलॉजी च्या मदतीने इनोव्हा कार फक्त एक एसयूव्ही कार नसून एखाद्या लक्झरी जेट प्लेन सारखे या 7 Seater कार चा फील येतो.
अशी असेल बॅटरी परफॉर्मन्स आणि मायलेज क्षमता.
- टोयोटा इनोव्हा इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये 59.3 Kwh बॅटरी पॅक सिस्टिम असेल.
- या सिस्टिममुळे ही कार 179 bhp Power आणि 700 एनएम चा पीकअप Torque कपचा डार्क Generate करण्याची क्षमता या कारमध्ये येईल.
महत्त्वाचे म्हणजे टोयोटा ने आपल्या या नवीन आयकॉनिक इलेक्ट्रिक एसयूव्ही कारची ड्रायव्हिंग रेंज आणि मायलेज क्षमता सध्या अधिकृतपणे घोषित केली नाही,मात्र इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत टोयोटा इनोव्हा 450 ते 500 किलोमीटर एका चार्जिंग मध्ये रेंज देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.याच प्रमुख कारणामुळे ही इनोव्हा SUV EV लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी आणि सुविधाजनक कार ठरणार आहे.
सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये लॉन्च
टोयोटा ने ही इलेक्ट्रिक इनोवा एसयूव्ही सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये लॉन्च केलेली आहे.त्यामुळे लवकरच भारतात टोयोटा SUV EV CAR लवकरच लॉन्चिंग करू शकते, अशी शक्यता आहे.मात्र याबाबत टोयोटा ने लॉन्चिंगची वेळ अद्याप अधिकृतपणे दिलेली नाही.
आटोमोबाईल क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेनुसार भारतात ही एसयूव्ही कार लॉन्चिंग झाल्यानंतर सुद्धा कंपनी भारतात आपली टोयोटा इनोवा पेट्रोल व्हर्जन आणि हायब्रीड कार प्रकारातील हायक्रॉस,डिझेल वर्जन मधील इनोवा क्रिस्टा सतत विक्री करत राहील.
विशिष्ट डिझाईन,ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि पावरफुल मायलेज परफॉर्मन्स सह भारतात दाखल होईल.
विशेष म्हणजे टोयोटाची ही BEV SUV इनोवा सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इलेक्ट्रिक कार क्षेत्रात नवी क्रांती आलेली असताना टोयोटा ऑटोमोबाईल्सने प्रगत तंत्रज्ञान आणि अनेक डिजिटल आणि आकर्षक फीचर्स,उत्कृष्ट डिझाईन सोबत ही एसयू इलेक्ट्रिक कार लॉन्चिंग करण्याची तयारी करीत इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचललेले आहे.एकूणच इनोव्हा इलेक्ट्रिक एसयूव्ही आपल्या विशिष्ट डिझाईन,ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि पावरफुल मायलेज परफॉर्मन्स सह बाजारात लवकरच दाखल होईल.