HSRP Number Plate : केंद्र सरकारच्या निर्देशाने महाराष्ट्रात आता सरकारकडून हाय सेक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे.{High Security Number Plate}31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनांना या एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यांचे निर्देश देण्यात आलेले आहेत.यानंतर 10 एप्रिल पासून कोणत्याही वाहनावर जर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नसेल तर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अशा वाहनांवर नियमानुसार कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करतील.
महाराष्ट्रातील सर्व चार चाकी, बाईक्स,ट्रान्सपोर्ट वाहनांना 31 मार्च पर्यंत निर्धारित रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे निर्देश सरकारकडून जारी करण्यात आलेले आहे.यासदर्भात राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या मार्फत एसएसआरपी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन साठी बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.यासाठी प्रादेशिक परिवहन मंत्रालयाच्या निर्देशावर नंबर रजिस्ट्रेशन बुकिंग आणि पुढील कारवाईसाठी एजन्सिज नेमण्यात आलेले आहेत.
31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची कारवाई सुरू राहणार आहे.यानंतर सुद्धा या नंबर प्लेट लावली नसेल तर अशा वाहनधारकांविरुद्ध 01 एप्रिल 2026 पासून कारवाई सुरू करण्यात येणार असून,जर वाहनावर HSRP Number Plate लावलेली नसेल तर मोठा दंड भरावा लागणार आहे. यापुढे राज्यातील सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.चला तर मग जाणून घेऊया HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय आहे? याची सरकारी किंमत किती असेल आणि हे नंबर प्लेट रजिस्ट्रेशन साठी बुकिंग कसा करावा लागेल….
HSRP Number Plate बसविण्यासाठी रजिस्ट्रेशन बुकिंग सुरू
नुकतेच पुण्यामध्ये राज्यात सर्वात आधी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी रजिस्ट्रेशन बुकिंग सुरू करण्यात आलेली आहे.सोबतच सर्व जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन बुकिंग प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
या संदर्भात पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी माहिती देताना म्हटले आहे की, उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत आता सर्व वाहनांना ऑनलाइनरित्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन लावण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे नेमके काय ?याबाबत बोलताना त्यांनी माहिती दिली.
- HSRP नंबर प्लेट्स अल्युमिनियम धातूपासून बनविले जात आहे.
यावर विशेष असा एक होलोग्राम लावलेला असेल तो क्रोमियम सिस्टम वर आधारित आहे. - एखाद्या स्टिकरप्रमाणे हा होलोग्राम दिसतो, पण यातच त्या वाहनाचा सर्व तपशील ऑनलाईन नमूद असतो.Hologram On HSRP Number Plate
- या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वर लावण्यात आलेल्या होलोग्राम मध्ये सर्व तपशील सरकारी स्तरावर नमूद केलेला असतो.
- वाहनाच्या आणि वाहन मालकाच्या सुरक्षितेसाठी हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाचा आहे.{Vehicles And Owner Security}
- नंबर प्लेटवर एक युनिट लेझर कोडही छापलेला असतो, आणि प्रत्येक वाहनासाठी हा Unic Lesure Code स्वतंत्र दिलेला आहे, त्यामुळे कोणीही तो सहज काढू शकत नाही.
असे होते एचएसआरपी नंबरप्लेट रजिस्ट्रेशनची बुकिंग?
राज्यात सर्व वाहनांना सेक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा बाबतीत कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. 31 मार्च पर्यंत या नंबर प्लेट सर्व वाहनांना लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना ही आधुनिक अशी सेक्युरिटी नंबर प्लेट कशी लावावी? यासाठी रजिस्ट्रेशन आणि मुख्य प्रक्रिया काय आहे हे प्रश्न पडलेले आहे.
त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आणि आपले वाहनाचे HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन बुकिंग करण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत शासकीय वेबसाईट वर वाहनधारक माहिती घेऊ शकतात.
या वेबसाईटवर एचएसआरपी नंबर प्लेट कशी बुकिंग कराल? याची माहिती देण्यात आलेली आहे.आपल्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट नसेल तर, वाहनधारक या संकेतस्थळावर जावून तेथे.
आपल्या कोणत्याही प्रकारच्या वाहनाचे नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर, वाहन मालकाचा रजिस्टर मोबाईल क्रमांक भरून सबमिट करून ऑनलाईन एचएसआरपी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन बुकिंग ची प्रक्रिया करू शकते.
यासाठीवाहनधारकांनी अधिकृत पोर्टलवर HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग करून आपल्या सोयीप्रमाणे यासाठी अपॉईंटमेंट तारीख घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावा, असे आवाहन वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
इतकी आहे HSRP Number Plate ची किंमत?
वाहनधारक आणि वाहनाच्या सुरक्षेसाठी एचएसआरपीची नंबर प्लेट महत्त्वाचे असल्याने याचे रजिस्ट्रेशन बुकिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.ही नंबर प्लेट वाहनावर लावण्यासाठी सरकारला प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत एजन्सीही नेमण्यात आलेले आहे.
हाय सेक्युरिटी नंबर प्लेट वाहनांवर लावण्यासाठी विविध शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.खालील वाहनांप्रमाणे एचएसआरपी नंबर प्लेट ची किंमत राहणार आहे.
एचएसआरटी नंबर प्लेटची किंमत.
थ्री व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी.
मोटर सायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये + जीएसटी,
फोर व्हीलर सह इतर सर्व वाहनांसाठी 745/- रुपये + जीएसटी इतका शुल्क राहणार आहे.