Dearness Allowance Hike : कर्मचाऱ्यांना DA संदर्भातमोठी खुशखबर देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केलेली आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जीवनमानात बदल होणार असून त्यांना महागाई सोबत लढताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.सरकारने फेब्रुवारी 2025 या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे.
पश्चिम बंगाल सरकार देशात पहिली अशी सरकार ठरली आहे,ज्याने या आर्थिक वर्षात आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हा 4 टक्के डीयरनेस अलाउन्स (Dearness Allowance) वाढविण्याची घोषणा केली आहे.
यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होईल. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आलेली आहे.{West Bangal Government Announce 4 % DA Hike}
सध्या सर्वच राज्यातील शासकीय कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी आपल्या महागाई भत्त्यात केव्हा वाढ होते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.प.बंगाल मधील कर्मचाऱ्यांची आता ही प्रतीक्षा संपली आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात DA Hike) चार टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारीही आपल्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहे.
Dearness Allowance Hike : केंद्राने शासकीय कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याची घोषणा केली.
प.बंगालचे अर्थमंत्री यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या 4 टक्के महागाई भत्ते वाढीची ची घोषणा केलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईच काळात दिलासा मिळणार आहे.विशेष म्हणजे यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्याची घोषणा केली होती.
{Government Employees Income Tax}यामुळे आधीच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.आता सर्व राज्यात राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जर वाढला तर सरकारकडून एकाच वर्षात कर्मचाऱ्यांना दुहेरी पद्धतीने लाभ मिळू शकणार आहे.
का आहे DA कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा?
मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांना जो मूळ वेतन मिळतो,त्यात Dearness Allownce (DA) महत्वाचा असतो. महागाई भत्ता वाढ म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असते.कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात बेसिक सॅलरी मध्ये हा मुख्य भाग असतो.
याच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते जसे की एचआरए, टीए ठरविले जातात.महागाईच्या वाढीच्या प्रमाणात त्यांच्या मूळ वेतनात डीए समाविष्ट केला जातो.
एक एप्रिल 2025 पासून लागू होणार वाढलेला भत्ता.
प.बंगाल कर्मचाऱ्यांसाठी 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर आता हा एक एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.1 एप्रिल 2025 पासून कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तेथील कर्मचाऱ्यांचा डीए 14 टक्क्यावरून 18% होणार आहे. याचा लाखो कर्मचारी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.{DA Hike}
लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही आनंदाची वार्ता मिळणार.
सध्या केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ घोषणा झालेली नाही.केंद्रीय कर्मचारी याची वाट पाहत आहे दरम्यान येणाऱ्या होळी सणापूर्वीच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना डियरनेस अलाउन्स वाढीची घोषणा करू शकते.
यासाठी सध्या केंद्र सरकार All India Consumer Price Index (एआयसीपीआय) आकडेवारीची वाट पाहत आहे. डिसेंबर 2024 पर्यंतची ही आकडेवारी केंद्र सरकारला मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए वाढीची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारकडे सध्या नोव्हेंबर 24 पर्यंतचेच आकडे उपलब्ध आहे.यानुसारच या कर्मचाऱ्यांचा 3 टक्के DA वाढ आता जवळजवळ निश्चित झाली आहे.
56 टक्के पर्यंत जाणार महागाई भत्ता
सध्या केंद्र सरकारकडे ऑल इंडिया कंजूमर प्राईस इंडेक्सचे नोव्हेबर 2024 पर्यंतचे महागाई संदर्भात आकडे आलेले आहे. तोपर्यंत महागाई दरात 0.49 इतकी वाढ झालेली आहे.
{Dearness Allowance Hike Updates}पुढील वाढीमुळे आता कर्मचाऱ्यांचे 55.5% वरून थेट 56% होईल कर्मचाऱ्यांसाठी नवीन डीए.1 जानेवारी 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाऊ शकते.
कर्मचाऱ्यांचे मूळ सॅलरीत होणार वाढ.
जर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच डीए. वाडीची घोषणा केल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन मध्ये वाढ होणार आहे.सध्या बेसिक सॅलरी ही 18000 असून जास्तीत जास्त कर्मचारी वेतन हा 2 लाख 50 हजार इतका आहे.सरकार कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी पाहून डीयरनेस अलाउन्स ठरविले जाते.
{Government Employees Basic Salary} एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी जर 33 हजार रुपये असेल, तर त्याला 53% डीए प्रमाणे 17490 रुपयांची वाढ होते. येणाऱ्या दिवसात हा DA 56% झाल्यास वरील मूळ वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्याला 18,418 मिळणार आहे यामुळे त्याला दर महिन्याला 990 रुपयांची तर एका वर्षात 11880 रुपयांची वाढ होईल.