India Post Recruitment Feb 2025 : नवी मुंबई ग्रामीण भागात डाक विभागात पदांची भरती सुरु! जाणून घ्या, अर्जासाठी शेवटची तारीख आणि Online अर्जसाठी माहिती!!
नवी मुंबई येथील ग्रामीण भागात डाक विभागात डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि या साठी अर्ज कसा करावा लागेल हे आपण जाणून घेवू या.
India Post Recruitment Feb 2025 : 21 डाक सेवक रिक्त पदांसाठी होणार भरती
भारतीय डाक विभागाकडून पोस्टल विभागात नवी मुंबई मधील डाक अधीक्षक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या या पदांसाठी नवी मुंबई कार्यक्षेत्रात ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी भारती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
एकूण 21 डाक सेवक रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.शैक्षणिक पात्रता धारक उमेदवार या रिक्त पडणासाठी येत्या 3 मार्च 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकणार आहे.{Indian Post Department}
डाकसेवक पदांसाठी नवी मुंबई डाक विभागात निघालेल्या पदभरतीत सामील होण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय डाक विभागाच्या indiapostgdsonline.gov.in या लिंकवर क्लिक करून Online माहिती माहिती घेवू शकतात.सोबतच येथून आपला अर्ज सादर करू शकतात.
Online Registration साठी उमेदवार खालील Link वर क्लिक करून अधिसूचना पाहू शकतात.
{ Indiapost Recruitment 2025 : www.indiapost.gov.in }
शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील.
नवी मुंबई डाक विभागात निघालेल्या पदभरतीत इच्छुक उमेदवारांसाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती खालील माहितीवरून जाणून घ्या.
नवी मुंबई पोस्ट ऑफिस भरती 2025
- पोस्टचे नाव
- डाकसेवक
- एकूण पदे
- 21
- Onlineअर्ज करण्याची शेवटची तारीख
- 3 मार्च 2025
- किमान शैक्षणिक पात्रता
- 10वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा
- 18 ते 27 वर्षे
- पगार
- रु. 10,000 ते रु. 69,000
इच्छुक उमेदवारांना अर्ज Online पद्धतीनेच सादर करावयाचे आहे.इतर कोणत्याही माध्यमातून किंवा Offline अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची सूचना डाक विभागाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे.यात नमूद केलेल्या सुचनानुसार उमेदवारांना शुल्क भरणे आवश्यक असेल.