Hotel Taj in Nagpur : मुख्यमंत्री यांची नागपुरात हॉटेल ताज उभारण्याची विनंती, एका मिनिटात ताज ग्रुपने केली उभारण्याची घोषणा !

Hotel Taj in Nagpur : जगप्रसिद्ध टाटा ग्रुपचे हॉटेल ताज हॉटेल चेनिंग मध्ये आता नागपूरचा नाव जोडला जाणार आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एक विनंती करताच, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये ताज हॉटेल उभारण्याची घोषणा स्व.रतन टाटा यांच्या ताज ग्रुपने केली आहे.यासाठी लवकरच हॉटेल ताज मॅनेजमेंट उपराजधानी नागपूर येथे नवीन आलिशान ताज हॉटेल बनविण्याची योजना आखणार आहे.

Hotel Taj in Nagpur : सीएम.फडणवीसांच्या विनंतीला ताज मॅनेजमेंटने होकार देत घोषणा करून दिला सन्मान.

नागपुरात हॉटेल ताजमहल उभारण्यामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासाठी एक विनंती महत्त्वाची ठरली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला ताज हॉटेल उभारण्याची विनंती करताच त्यांच्या विनंतीला हॉटेल ताज मॅनेजमेंट फक्त एक मिनिटात होकार देत मान दिला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यानंतर लगेच उपराजधानी नागपूर नवीन ताज हॉटेल उभारण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.मुंबईतील वांद्रे येथे नवीन ताज हॉटेलच्या भूमीपूजन प्रसंगी हॉटेल ताज नागपुरातही उभारण्यात येणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये नागपूरकरांना आपल्याच शहरात आलिशान हॉटेल ताज मध्ये हॉस्पिटलिटी आणि फाईव्ह स्टार हॉटेलिंग चा लाभ घेता येणार आहे.

हॉटेल ताजमहल 5 स्टार चेन हॉटेलिंग जगभरात विस्तारलेली.

उल्लेखनीय म्हणजे जगप्रसिद्ध टाटा ग्रुपचे हॉटेल ताजमहल 5 स्टार चेन हॉटेलिंग जगभरात विस्तारलेली आहे.Taj Group Chain Hoteling System.भारतातील अनेक मेट्रोपॉलिटीन शहरांमध्ये हॉटेल ताज आहेत. आता उपराजधानी नागपूर येथेही फाईव्ह स्टार हॉटेल ताज उभारण्यात येणार आहे.

Hotel Taj Luxury Stay.ताज ग्रुप कडून मुंबईमध्ये वांद्रे उपनगरात ताज हॉटेलची उभारणी होत आहे.यासाठी हॉटेल ताज मॅनेजमेंट कडून भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी त्यांनी ताज ग्रुप मॅनेजमेंट कडे नागपूर मध्ये ताज हॉटेल असावे ही इच्छा व्यक्त केली. यानंतर लगेच त्याच ग्रुपने नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केलेली आहे.

या व्यतिरिक्त नागपुरात त्याच ग्रुपचे इतर दुसरे जिंजर हॉटेल देखील उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नागपुरात यापूर्वीच एक जिंजर हॉटेल आहे त्यात आणखी एका हॉटेलची भर पडेल.

मुंबईची आणि देशाची शान मानले जाते हॉटेल ताज.

सेंट्रल मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या समोर अगदी समुद्रकिनाऱ्यावर इंग्रज काळापासून आलिशन हॉटेल ताज उभारलेली आहे.

येथील पारंपरिक हॉस्पिटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलिंग सुविधा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर सर्वात आधी उभारलेला हा फाइव स्टार हॉटेल ताज भारतातील एक आकर्षक असा मॉन्युमेंट जगप्रसिद्ध आहे.तो मुंबईची आणि देशाची शान मानल्या जाते.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस.

वांद्रे येथे हॉटेल ताज भूमी पूजन प्रसंगी उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हॉटेल ताज उभारण्यात यावा अशी विनंती या ग्रुपला केली,आणि यावेळी उपस्थित त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की,हॉटेल ताज ग्रुपने वर्तमान काळात आपल्या हॉटेल हॉस्पिटल ची व्याख्या बदलली आहे,आज अनेक देशात ताज ग्रुपचे प्रस्थ मानले जाते.

मुंबई, भारतातील इतर शहरे आणि विदेशात जेव्हा हॉटेल ताज पाहतो,तेव्हा आपण मुंबई किंवा भारताच आहोत असा वाटते. लवकरच भारतातील हा 21 व्या शतकातील मान्युमेंट म्हणून जगाच्या समोर येईल असा विश्वास आहे. वांद्रे परिसरात सुंदर असा हॉटेल ताज उभारला जात असल्याने मी ताज हॉटेल ग्रुपचे आभार मानतो.

स्व.रतन यांची केली आठवण आणि  नागपुरातही ताज हॉटेलची घोषणा करण्याची विनंती.

वांद्रे येथे ताज हॉटेल उभारणे हे रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे प्रकल्प होते, हॉटेल उभारणी कामात काही अडचणी आहेत,असा त्यांनी मला सांगितले होते.

कदाचित त्या समस्या सोडविण्यात आम्ही त्यावेळी कमी पडलो आज त्यांच्यासमोर याचा भूमिपूजन झाला असता तर रतन टाटा नक्कीच आनंदी झाल असते.यानंतर आता अशा प्रकल्प उभारणी संदर्भात काही अडचणी आल्या, तर आम्ही या ग्रुपच्या मागे राहू,विकासासाठी आम्ही एक प्रकारे यांचे पार्टनर आहोत असे समजा.

मुंबईला आणखीन अशा हॉटेलची अपेक्षा आहे.ताज हॉटेलच्या प्लॅनिंग आणि डिझाईन मुळे मुंबईच्या सुंदर ते आणखीन भर पडणार आहेत.

या ग्रुपचा महाराष्ट्रात चांगला प्रस्थ आहे,पण ताज ग्रुपचे नागपुरात कोणते हॉटेल नाही,आता ताज ग्रुपने नागपुरात हॉटेल उभारले पाहिजे,आणि तुम्ही आजच याबाबतची घोषणा करा,अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताज ग्रुप मॅनेजमेंटला केले.

या नंतर लगेच नागपुरात ही हॉटेल ताज उभारण्यात येणार असल्याची घोषणा करून मुख्यमंत्री यांच्या विनंतीला ताज ग्रुपनेही सन्मान दिला आहे. {Taj Hotel Announcment For Nagpur} त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्राच्या उपराजधानी असलेल्या नागपुरात फाईव्ह स्टार सुविधा देणारा ताज हॉटेल लवकरच उभारण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.