Gold Rates February : पुढच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे.मात्र व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर भारतात सोने चांदीच्या दारात आतापासूनच वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
Valentines Day पूर्वी नागरिकांचा एकमेकांना कौटुंबिक स्तरावर भेट देण्यासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा कल दिसत आहे.त्यामुळे अचानक सोने चांदीची खरेदीत वाढ झाली आहे.यामुळेच सध्या सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. याचा चलन काही वर्षापासून भारतातही वाढला आहे.येणाऱ्या 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येईल.सध्या व्हॅलेंटाईन डे वीक सुरू असल्याचे मानले जाते.
यादरम्यान पश्चिम संस्कृतीनुसार लोक आपल्या जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना उपहार देतात, व्हॅलेंटाईन डे मध्ये एकमेकांना पुष्पगुच्छ फुले तसेच भेटवस्तू देण्यात येते, दरम्यान व्हॅलेंटाईन डे पूर्वी वेलेंटाईन डे वीक मध्ये अनेक लोक आपल्या प्रियजनांसाठी महागड्या वस्तूंची खरेदी करताना सुंदर असे सोने चांदीच्या वस्तू आणि दागिने खरेदीवर जोर देता.
सोने चांदीचे वस्तू गिफ्ट करण्यासाठी सध्या लोकांचा कल वाढला आहे.यामुळेच व्हॅलेंटाईन डे च्या वीकच्या पार्श्वभूमीवर सध्या सोने आणि चांदीच्या दरात या आठवड्यात वाढ दिसून येत आहे. लोकांचा सोने खरेदी कडे व्हॅलेंटाईन डे पूर्वी आकर्षण वाढल्याने सराफा मार्केटमध्ये सध्या सोने-चांदीचे दर वाढलेले आहे.
7 फेब्रुवारी रोजी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 84 हजार 780 रुपये आणि चांदीचा दर 96 हजार 170 रुपये वर आला होता.भारतात वेगवेगळ्या शहरात सोने चांदीचे वेगवेगळे दिसून येत आहे.जर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना सोने चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भारतात कोणत्या शहरात सोने-चांदीचा दर 7 फेब्रुवारी रोजी कसा आहे हे आपण जाणून घेऊया…
Gold Rates February : सोने चांदीचे दर असे आहेत.
सोने चांदी खरेदी विक्री क्षेत्रात बुलियन मार्केटचा खूप महत्त्व आहे. जगात आणि भारतात येथूनच सोन्या, चांदीचे नियमित दर निर्धारित होत असते.7 फेब्रुवारी रोजी बुलियन मार्केट नुसार 22 कॅरेट सोने प्रति दहा 10 ग्रॅम किंमत 77 हजार 715 इतकी आहे,तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 84 हजार 780 रुपये आहे.तर दुसरीकडे प्रती 10 ग्राम चांदीची किंमत 992 रुपये आहे अर्थातच सध्या चांदी प्रति किलो 96 हजार 170 रुपये किंमत झाली आहे.
बुलियन मार्केटचा सोने-चांदी दराचा तक्ता असा आहे.
( बुलियन मार्केटच्या वेबसाईटनुसार 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर )
पुणे
22 कॅरेट सोने – प्रति 10 ग्रॅम दर
77 हजार 596 रुपये.
24 कॅरेट सोने -प्रति 10 ग्राम किंमत
84 हजार 650 रुपये.
नागपूर
22 कॅरेट सोने-प्रति 10 ग्रॅम दर
77 हजार 596 रुपये.
24 कॅरेट सोने-प्रति 10 ग्राम किंमत
84 हजार 650 रुपये.
मुंबई
22 कॅरेट सोने – प्रति 10 ग्रॅम दर
77 हजार 996 रुपये.
24 कॅरेट सोने –प्रति 10 ग्राम किंमत
84 हजार 650 रुपये.
नाशिक
22 कॅरेट सोने – प्रति 10 ग्रॅम दर
77 हजार 596 रुपये.
24 कॅरेट सोने –प्रति 10 ग्राम किंमत
84 हजार 650 रुपये.
टीप: वरील सोन्याचे दर हे सूचक स्वरूपात आहे यात टीसीएस जीएसटी आणि इतर त्याच्या समावेश नाही वर्तमान सोने-चांदीदारांसाठी स्थानिक ज्वेलर्स वर्तमान दर अचूक सांगतील.
उल्लेखनीय म्हणजे भारतात जानेवारी महिन्यात प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 78 हजार रुपयांवर पोहोचला होता. यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला काही कमी आली. यानंतर जानेवारी महिन्यात चांदीचा दर प्रति किलो 91 हजार 60 रुपये इतका होता.
तर या फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्राम दर 82 हजार 310 रुपये होता. तर यादरम्यान चांदीचा प्रति किलो दर 94 हजार 260 रुपये होता. यात सोन्याच्या दरात या आठवड्यात वाढ झालेली आहे.
हे आहेत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यामध्ये फरक.
सोने चांदीचे दागिने खरेदी करताना विशेषतः सोन्याचे दागिने बनविताना आणि खरेदी करताना 24 कॅरेट सोन्याच्या कॉलिटी वर जास्त लक्ष देण्यात येते. 22 तसेच 24 कॅरेट सोन्यामध्ये काही फरक असते. हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे,चांदी आणि जस्त Copper, Silver.यासारख्या धातूंचे नऊ टक्के मिश्रण करून 22 कॅरेट सोन्याचे दागिने तयार होतात.सोन्यात 24 कॅरेट सोने हे शुद्ध मानले जाते.Puer Gold.मात्र 24 कॅरेट सोन्यातून दागिने बनवता येत नाही.
त्यामुळे सराफा मार्केटमध्ये ज्वेलर्स 22 कॅरेट दरामध्ये सोन्याचे दागिन्यांचे व्यवहार करतात. 24 कॅरेट शुद्ध सोने खरेदी करण्यासाठी मार्केट रेट नुसार किंमत अदा करावी लागते.
एकूणच 24 आणि 22 कॅरेट सोने खरेदी करताना वर्तमान किंमत आणि त्यावर लागणारा विविध प्रकारचा टॅक्स जोडूनच सोन्या चांदीचे खरेदी विक्री व्यवहार होतात.