Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती.त्यात आता नवी माहिती समोर आलेली आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांपैकी 75 हजार लाडक्या बहिणींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे चार चाकी कार असल्याची माहिती समोर आली आहे.
या लाभार्थी महिलांची आता पडताळणी होणार आहे.दरम्यान चांगली आर्थिक स्थिती असतानाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील अशा लाभार्थी महिलांचे आर्थिक लाड पुरविणे आता सरकारकडून बंद होणार आहे.या संदर्भात सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केला होता.यात वार्षिक उत्पन्न आणि इतर बाबी पाहता निकष आणि नियमानुसार लाभार्थी महिलांना लाभ देण्याची प्रक्रिया सरकारकडून करण्यात येत आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात होताच,अख्ख्या राज्यात महिलांनी सरकारकडून आर्थिक लाभ मिळावा यासाठी भरभरून लाभार्थीसाठी अर्ज केला, यानंतर सरकारकडून सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
राज्यभरात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना डीबीटी प्रणालीतून दर महिना बँक खात्यात पंधराशे रुपये पाठविले जात आहे. आता यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेचा मोठा आर्थिक भार आला आहे.
त्यामुळे यापूर्वीच सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनात संदर्भात ज्या लाभार्थी महिला सधन असतानाही लाभ घेत आहेत,अशा अर्जांच्या संबंधात तक्रारी आल्यास पुर्ननिरीक्षण आणि पडताळणी करण्याचे संकेत दिले होते. बहुतेक आता सरकारकडून याच्यावर अंमलबजावणी सुरू झाली असल्याची चर्चा आहे.
सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन निकषांची तपासणी करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे. कोणत्या लाभार्थी महिलांच्या घरी चार चाकी आहे,त्या लाडकी बहीण योजनेचा निकषात बसतात की नाही, याची चाचपणी करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.
माहितीनुसार सरकारने आता महिला बाल कल्याण मंत्रालय आणि सचिव स्तर ते महिला व बालकल्याण विभागाकडून निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिलांना आता अपात्र करण्यासाठी उपाययोजनाची आखणी करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थींना मिळावा आणि पुढे सरकारकडून विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार 2100 रुपयांची आश्वासन पूर्ती व्हावी, यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार येणार नाही याची खबरदारी म्हणून सरकारने आता या योजनेत लाभार्थी संदर्भात पुर्ननिरीक्षण सुरू केले आहे.अशी चर्चा प्रशासन की स्तरावर सुरू आहे.
पुणे मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 75 हजार लाडक्या बहिणीकडे स्वतःची किंवा कुटुंबाची चार चाकी कार.
दरम्यान पुणे येथून प्रशासनिक स्तरावर माहिती समोर आली आहे. यात पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या संदर्भात पुणे महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जदार लाभार्थी महिलांच्या याद्यांचे पुनः निरीक्षण करण्यात आलेले आहे.
तशी यादी सुद्धा सरकारकडून पुणे जिल्हा परिषदेला देण्यात आल्याची माहिती आहे.आता पुणे जिल्हा परिषद या यादीची पडताळणी करणार आहे. ही यादी अशा 75 हजार 100 लाभार्थी महिलांची आहे, ज्यांच्याकडे स्वतःची किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे चार चाकी वाहने आहे.
त्यामुळे आता पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या या चार चाकी कारधारक लाडक्या बहिणीचे घरी जाऊन पडताळणी करतील.
पुण्यात आहे मुख्यमंत्र्यांच्या इतक्या लाडक्या बहिणी.
पुणे जिल्ह्यात महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते.यात लाखो महिलांना लाभार्थी म्हणून सरकारकडून योजने द्वारे आर्थिक लाभ दिल्या जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात योजना सुरू होताच 21 लाख 11 हजार 9991 महिलांचे एकूण अर्ज प्राप्त झाले होते,त्यापैकी 20 लाख 89 हजार 946 महिलांना लाभ देण्यात येत आहे.
या 20 लाखापेक्षा जास्त लाभार्थी बहिणींपैकी 75000 100 चार चाकी वाहने या लाभार्थी बहिणी किंवा त्यांच्या कुटुंबाचे नावे असल्याची माहिती आता समोर आलेली आहे.
चारचाकी धारक लाभार्थी बहिणींच्या याद्या सरकारने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या.
राज्यात प्रत्येक परिवहन विभागाकडून सरकारने चार चाकी वाहनांची यादी मागितली होती.ती परिवहन विभागाने सरकारला सुपुर्द केली आहे. या याद्या आता सरकारने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.
या यादीनुसार आता महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीत पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
यादरम्यान पुणे जिल्ह्यासाठी सरकारकडून दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागगाला देण्यात आलेले आहे, यातूनच पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या 75 हजार 100 लाडक्या बहिणींकडे चार चाकी कार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या महिला बालकल्याण ण विभागाला मिळालेल्या दोन याद्यापैकी पहिल्या यादीत 58 हजार 350 आणि दुसऱ्या यादीत 16 हजार 750 असे एकूण 75 हजार 100 वाहनधारकांची यादी आहे.
या यादीत असलेली नावे आता तालुका निहाय या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.यानंतर प्रत्यक्षात लाभार्थी महिलांच्या घरी पोहोचून पडताळणीचे काम तात्काळ सुरू होईल,असे पुणे जिल्हा परिषदेने सांगितलेले आहे.
महिला बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांचे आदेश.
महिला बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सोमवारी राज्यात सर्व जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली, यात राज्यातील सर्वाधिकार्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश जारी केले होते. यामुळेच आता राज्यात यासंदर्भात तपासणी करण्याच्या कामाला गती येणार आहे.
Ladki Bahin Yojana : लाभ सोडण्याच्या आव्हानाला प्रतिसाद नाही.
विशेष म्हणजे यापूर्वी सरकारने लाभार्थी महिलांपैकी ज्यांच्याकडे कार किंवा कुटुंबाचा उत्पन्न चांगला आहे,अशा लाभार्थी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडावा हे आव्हान केले होते. मात्र अश्या प्रकारे लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांकडून या आव्हानाला कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
त्यामुळे आता सरकारने आपल्या प्रशासनिक यंत्रणेमार्फत थेट कारवाईला सुरुवात केली आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता पडताळणी होऊ शकते,याचा अंदाज प्रशासनाला होता, यामुळेच सर्व जिल्ह्यातील प्रशासनाकडून यासाठी तयारी सुरू करण्यात आली होती.
उल्लेखनीय म्हणजे या योजनेच्या लाभासाठी अंगणवाडी सेविकांकडून अर्जदार महिलांचे बहुतांश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे काम झाले होते.त्यामुळे आपल्या परिसरात असलेल्या लाभार्थी महिलांची माहिती अंगणवाडी सेविकांना आहे, यामुळे सरकारकडून यादी पडताळणीचे काम अंगणवाडी सेविकांमार्फतच होणार आहे.
वाहनधारक लाभार्थी महिलांच्या संबंधातच पडताळणी होणार.
उल्लेखनीय म्हणजे शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या प्रशासनाला लाभार्थी महिलांपैकी वाहनधारकांची यादी वर्गवारी करून पाठविण्यात आलेली आहे.या योजनेच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांच्या नावे असलेली किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावे असलेली वाहनांची यादी आहे इतर वाहनधारकांचा या यादीत समावेश नाही.
त्यामुळे फक्त योजनेशी संबंधित लाभार्थी महिलांची यादी जिल्हा प्रशासनाला मिळालेली आहे,आणि यानुसारच आता अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन अशा वाहनधारक लाभार्थी महिलांच्या संबंधात पडताळणी करण्यात येणार आहे.