Reliance Deal With Murlidharan : आणि…मुकेश अंबानी यांनी फक्त 10 रुपयात विश्व प्रसिद्ध स्पिनर मुथय्या मुरलीधरनला सोबत घेतले !

Reliance Deal With Murlidharan : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी फक्त 10 रुपयात महत्त्वाची डील केली आहे. जगप्रसिद्ध श्रीलंकन क्रिकेट स्पिनर आणि निवृत्त क्रिकेटर मुथैया मुरलीधरन सोबत रिलायन्स एफएमसीजी कंपनीने या डील साठी हात मिळविले आहे.

आरसीपीएल ने यापूर्वी प्रसारण अधिकार संपादित करून क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविले आहे. यानंतर रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी श्रीलंकेचे जगविख्यात गोलंदाज मुरलीधरण सोबत हात मिळविले असून मुरलीधरन आणि मुकेश अंबानी हे दोघेही मिळून आता स्पोर्ट्स ड्रिंक उत्पादन करून ते जगात विकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या दोघांमध्ये फक्त 10 रुपयात ही डील झालेली आहे. रिलायन्सची एफएमसीजी कंपनी आरसीपीएल ने मुरलीधरन सोबत स्पोर्ट्स ड्रिंक साठी ही महत्त्वाची डील केली आहे.

या ड्रिंक चे नाव ‘स्पिनर’हे ठेवले आहे.आरसीपीएल आणि मुरलीधरन मिळून ही स्पोर्ट्स ड्रिंक तयार करून विकणार आहेत,आणि या स्पिनर्स ड्रिंक ची किंमत फक्त 10 रुपये राहणार आहे.

त्यामुळे क्रिकेट आणि FMCG जगतात RCPL आणि स्पिनर मुरलीधरन यांच्यामध्ये फक्त 10 रुपयांमध्ये ही आंतरराष्ट्रीय Deal झाल्याचे बोलले जात आहे.

स्पोर्ट ड्रिंक मध्ये स्पिनर स्पोर्ट ड्रिंक टक्कर देणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगात विश्वातील सर्वात खतरनाक स्पिनर म्हणून भारतातील अनिल कुंबळे आणि श्रीलंकन मुथिया मुरलीधरन,शेन वॉर्न यांची गणना होते. यापूर्वी स्पोर्ट्स ड्रिंकच्या क्षेत्रात गेटोरेड आणि पॉवररेड सारखे स्पोर्ट्स ड्रिंक मजबुतीने पाय रोवून असताना आता स्पिनर स्पोर्ट ड्रिंक टक्कर देणार आहे.

या ड्रिंक ची किंमत निम्मी असल्याने या क्षेत्रात मुकेश अंबानी यांची एफएमसीजी कंपनी जोरदार मुसंडी मारेल ही शक्यता वर्तवली जात आहे.

स्पिनर स्पोर्ट ड्रिंक ची बोतल 150 ml ची असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोकाकोला हे दिग्गज कंपन्या बनवितात आता अंबानींची रिलायन्स एफएमसीजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध स्पिनर मुरलीधर यांचा चेहरा या स्पोर्ट ड्रिंक मागे असणार आहे.स्पोर्ट ड्रिंक क्षेत्रात हे अजीब कॉम्बिनेशन तयार झालेले आहे.

मुरलीधरनच्या मैसूर येथील बेवरेज फॅक्टरीत उत्पादन सुरू.

महत्वाचे म्हणजे श्रीलंकन क्रिकेटर मुरलीधरनची भारतात कर्नाटकच्या मैसूरमध्ये फॅक्टरी आहे. यासाठी रिलायन्सने त्याच्यासोबत करार केलेला आहे,आणि मुरलीधरनच्या याच बेवरेज फॅक्टरी मध्ये आता स्पिनर ड्रिंक चे उत्पादन आणि पॅकेजिंग ही सुरु झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी काही काळापूर्वी एफएमसीजी कंपनी लाँच केली आहे.यानंतर स्पिनर सॉफ्ट ड्रिंक हे लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. यासाठी मुकेश अंबानी यांनी SIL कंपनी आपल्या ताब्यात घेतली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.