Railway Job Recruitment : भारतीय रेल्वे कडून रेल्वे गट डी (Group D मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती होणार आहे.23 जानेवारीपासून रेल्वेच्या विविध विभागातील 32 हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून आयोजित करण्यात आलेली आहे.
पद भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज सुधारणेसाठी ऑनलाईन विंडो 25 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.ती 06 मार्च 2025 पर्यंत सुरू राहील.
या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या अर्जात झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. सध्या Railway Recruitment Board कडून रेल्वेभरती 2025 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही गुरुवार 23 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.
सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे.भारतीय रेल्वेने स्तर 1 अंतर्गत गट डी पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.
भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड द्वारे देशातील विविध रेल्वे विभागांसाठी पदांची भरती निघाल्याने रेल्वे भरती परीक्षेद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.यासाठी ईच्छूक उमेदवार रेल्वे भरती बोर्डच्या अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.in वर आवश्यक माहिती घेवू शकतात.
Railway Job Recruitment असे आहे पद भरतीसाठी अर्जाचे वेळापत्रक.
- रेल्वे भरती बोर्ड द्वारे रेल्वे भरती 2025 साठी अर्ज करण्याकरिता वेळापत्रक जारी करण्यात आला आहे
- .त्यानुसार अर्जाची प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होईल
- 22 जानेवारी 2025 पर्यंत ईच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
- आणि अर्ज केल्यानंतर 24 जानेवारी 2025 पर्यंत फी जमा करता येईल.
गट ड च्या 32438 पदांसाठी भरती होणार.जाणून घ्या वयोमर्यादा!
या संदर्भात रेल्वे भर्ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, CEN क्र. 08/2024 अंतर्गत गट ड च्या 32438 पदांसाठी भरती करण्यात येईल. या रिक्त पदासाठी अर्ज 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारले जातील.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावी. यात आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
भरती बोर्डाच्या वेबसाईटनुसार या भरती मध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात 3 वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे उमेदवारांच्या वयाची गणना ही एक जानेवारी 2025 पासून केली जाईल
ग्रुप डी मध्ये या पदांसाठी होईल भरती प्रक्रिया.
- रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड द्वारे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रुप डी Group D च्या विविध खालील पदांकरिता भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
- सहाय्यक (एस एंड टी)
- सहाय्यक (वर्कशॉप)
- सहायक कॅरेज आणि वॅगन
- असिस्टंट ब्रिज
- सहायक लोको शेड (डिझेल)
- सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)
- सहायक लोको शेड ( इलेक्ट्रिकल)
- सहाय्यक (पी.वे.)
- सहायक टी एल अँड एसी (वर्कशॉप)
- सहायक टी.एल.अँड एसी
- असिस्टंट ट्रॅक
- असिस्टंट टीआरडी
- पॉईंट्समन बी ट्रॅक मेंटेनर IV.
शैक्षणिक पात्रता
वरील सर्व पदांसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड द्वारे उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आलेली आहे.वरील पदांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
उमेदवारांना अर्जासाठी हे तारखा लक्षात ठेवा.
RRB CEN क्र. 08/2024 गट डी भर्ती 2025: या रेल्वे गट डी भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आहेत
रेल्वे स्तर 1 भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 23 जानेवारी 2025 (PM 00:00)
RRB CEN क्र. 08/2024 गट डी भर्ती 2025: या रेल्वे गट डी भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आहेत
रेल्वे स्तर 1 भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 23 जानेवारी 2025 (PM 00:00)
RRB CEN क्र. 08/2024 गट डी भर्ती 2025: या रेल्वे गट डी भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आहेत
रेल्वे स्तर 1 भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 23 जानेवारी 2025 (PM 00:00) असे अर्ज करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.22 फेब्रुवारी पर्यंत अर्ज स्वीकारणे,यानंतर 6 मार्च 2025 पर्यंत अर्जातील त्रुटी सुधारणा करण्याचा अर्जदार उमेदवारांना संधी मिळणार आहे. यानंतर नियमानुसार रेल्वे भरती द्वारे हजारो पदांसाठी विविध निर्धारित ठिकाणी भरतीसाठी परीक्षा आणि पुढील प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा
अशी होईल भरती प्रक्रिया.
इंडियन रेल्वे मध्ये होणाऱ्या या पदभरती मध्ये उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी Computer Based Test, आणि शारीरिक कार्यक्षमता Physical Action Test आधारावर केली जाईल.यात CBT ही फक्त एकच टप्प्यात होईल.या टेस्ट मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात PET साठी बोलाविण्यात येईल.यानंतर यशस्वी उमेदवारांचे शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे पडताळणी आणि उमेदवारांची वैद्यकीय तपासणी प्रक्रिया होईल.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी 2019 मध्ये रेल्वे ग्रुप डी च्या 1 लाख 3 हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती.यासाठी देशभरातील एक कोटी 15 लाख सुशिक्षित युवकांनी विविध पदांसाठी अर्ज केले होते.यानंतर आता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून भारतीय रेल्वे भरती 2025 होणार आहे. यात हजारो पदांची बंपर भरती करण्यात येणार आहे.