Ligier Mini Electric Car : फक्त १ लाख रुपयात मिळणार इलेक्ट्रिक कार.जाणून घ्या वैशिष्ट्य !

Ligier Mini Electric Car : देशात पर्यावरणाला सुरक्षित अशा इलेक्ट्रिक आणि सीएनजी इंधन वर चालणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनांची उत्पादन आणि चलन दोन्ही वाढले आहे. यात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारात मोठी वाढ होत आहे.

नवनवीन आकर्षक आणि आधुनिक फिचर्स असलेल्या कमी किमतीच्या कारची मागणीही वाढत आहे.ग्राहकांच्या या संबंधात कल लक्षात घेऊन आता इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्यांनी आता कमीत किमतीत आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यास सुरुवात केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतात आतापर्यंत उत्पादित झालेल्या इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात कमी किमतीची आणि युरोपियन डिझाईन मध्ये बनलेली कार आता भारतात येणार आहे. या कारचे नाव लेगीयर मिनी इलेक्ट्रिक कार Ligier Mini Electric Car आहे.

युरोपियन कार मॉडेल वर आधारित ही इलेक्ट्रिक कार भारतात दाखल होण्यापूर्वी याच्या चाचणी दरम्यान प्रदर्शित करण्यात आली आहे.ही टू सीटर मिनी कार Two Seater Car आहे.

खूप कमी किमतीत मिळणारी ही कार फक्त एका चार्ज मध्ये 63 ते 192 किलोमीटरची रेंज देऊ शकणार आहे.सध्या ही कार भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात लॉन्च झाली नाही,मात्र याच्या बॅटरी पॅकच्या पर्यायासह Battery Pack Option.ही कार लवकरच देशातील ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल, असा वाहन बाजारात अंदाज वर्तविला जात आहे.

ही असेल आश्चर्यचकित करणारी किंमत ?

युरोपियन कार मॉडेल वर आधारित लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार भारतात दाखल होण्यापूर्वी याच्या आकर्षक किलोमीटर क्षमतेवर आणि कमी किमतीवर चर्चा सुरू झाली आहे. एका अंदाजानुसार ही कार भारतात फक्त 1 लाख रुपये किमतीमध्ये मिळणार आहे.

भारतात लॉन्च होताच या मिनी आकर्षक कारला ग्राहक फक्त एक लाख रुपयात खरेदी करू शकणार आहे. असे झाल्यास आतापर्यंत भारतातील ही सर्वात स्वस्त अशी इलेक्ट्रिक कार असेल.

मिनी इलेक्ट्रिक कारचे बॅटरी ऑप्शन आणि रेंज.

 

भारतात सध्या इलेक्ट्रिक कार उत्पादन आणि विक्रीवर जोर दिल्या जात आहे. यात आता युरोप मधील legier ही कंपनी स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात दाखल करण्याची तयारी करीत आहे.लीगिअर मिनी इलेक्ट्रिक कार ही सर्वात स्वस्त कार ठरू शकते.सोबतच विविध मॉडेलमध्ये ही कार दाखल होण्याचीही शक्यता आहे.

भारतीय बाजारपेठेत लीगिअर मिनी इलेक्ट्रिक कार G-GOLD,E-EPIC,R-REBEL आणि I-IDEAL या चार मॉडेल्स मध्ये उपलब्ध होण्याची तयारी उत्पादन करणाऱ्या Ligier Mini Electric Car या कंपनीने सुरू केली आहे.

वरील मॉडेल्स नुसार इलेक्ट्रिक कार अनुक्रमे 63 किमी 123 किमी आणि 192 किलोमीटर पर्यंतची रेंज फक्त एका चार्जिंग मध्ये देऊ शकते. मात्र ही इलेक्ट्रिक आणि सर्वात स्वस्त मिनी कार भारतात केव्हा लॉन्च होणार याबाबत कंपनीने अधिकृत माहिती सार्वजनिक केलेली नाही.येणाऱ्या काही दिवसातच यासंदर्भात अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

 

विशेष डिझाईनिंग मुळे लीगियर मिनी कार चर्चेत.

सध्या ही मिनी इलेक्ट्रिक कार भारतातील बाजारात दाखल झाली नाही,मात्र सोशल प्लॅटफॉर्म आणि वाहन बाजारात या इलेक्ट्रिक मिनी कारची खूप चर्चा सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे भारतातील रस्त्यावर ट्रॅफिक आणि सुरक्षा या संबंधाने ही मिनी कार उपयोगी ठरू शकते.याचे कारण म्हणजे ही इलेक्ट्रिक कार आकाराने खूप लहान आणि फक्त टू सीटर असेल.

मोपेड डिझाईनिंग मध्ये लॉन्च करण्यात येणार.

ही युरोपियन डिझाईन असलेली मिनी कार मोपेड डिझाईनिंग मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.उल्लेखनीय म्हणजे या मीनी इलेक्ट्रिक कारची लांबी फक्त 2958 mm. आणि रुंदी 1499mm तसेच उंची फक्त 1541mm असू शकते.याला युरोप देशामधील रस्त्यांवर धावणाऱ्या कारचे डिझाईन देण्यात येणार असून युरोपियन मॉडेलवर आधारित या मीनी इलेक्ट्रिक कारला फक्त दोन दरवाजे राहू शकतात.भारतातील रस्त्यांवर ही कार कमी सीट आणि लहान आकारामुळे ड्रायव्हिंग साठी सुविधाजनक ठरू शकते.

ही असेल आकर्षक फीचर्स.

लीगअर मिनी इलेक्ट्रिक कार मध्ये फक्त 12 ते 13 इंची व्हील्स राहणार आहेत. या कारची अंतर्गत डिझाईन ही Interior Design Sporty राहणार असून डॅशबोर्ड वर 10 inch Touch Screen Infotainment System, Android Auto Support, Power Steering, Hit Driver, Auto Climate Control,आणि  Corner AC Vents हे आधुनिक आणि डिजिटल फीचर्स असू शकतात अशी वाहन बाजारात चर्चा आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.