4 नविन Amrit Bharat Express ट्रेन. जाणून घ्या ! कोठून कुठपर्यंत धावणार ?

भारतीय रेल्वे कडून प्रवाश्यांसाठी विविध सेवा आणि नवीन एक्सप्रेस ट्रेन सुविधा दिल्या जात आहे. वंदे भारत नंतर आता भारतात Amrit Bharat Express ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नुकतेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पुणे शहरातून या चार Amrit Bharat Express देशातील विविध ठिकाणांसाठी धावणार आहेत. Amrit Bharat Express ट्रेन कुठून कुठपर्यंत धावणार? या एक्सप्रेस ट्रेनची तिकीट किती राहणार आणि या संबंधात जाणून घेवू या आणखी माहिती….

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे शहरातून 2 वंदे भारत ट्रेन Vande Bharat Semi Express Trains सुरू करण्यात आली होती. या दोन्ही वंदे भारत पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर दरम्यान धावतात.त्याचा प्रवास पुण्यातून सुरू होतो.मात्र या एक्सप्रेस ट्रेनचे तिकिट शुल्क सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्या बाहेर आहेत.

त्यामुळे कमी किमतीत प्रवासी सुविधा म्हणून आता भारतीय रेल्वे कडून पुण्यामधून कमी तिकीटमध्ये Amrit Bharat Express From Pune गाड्यांमध्ये प्रवास करता येणार आहे.यासाठी आता पुण्यामधून भारतीय रेल्वेने 4 Amrit Bharat Express Train सुरू करण्याचे प्रयत्न करून सुरू केले आहेत.

त्यामुळे पुण्यातून लवकरच 4 नव्या Amrit Bharat Express Train हे विविध शहरांसाठी धावणार आहेत.

कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या एक्सप्रेस ट्रेन सुविधा.

रेल्वे मंत्रालयाकडून जुलै 2023 मध्ये देशात पहिली Amrit Bharat Express Train लॉन्च करून त्याला अहमदाबाद ते गांधीनगर या रुटवर सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे Amrit Bharat Express ही वंदे भारत एक्सप्रेस सारखे एक्सप्रेस ट्रेन आहे,पण त्यात एसीची सुविधा नाही.

त्यामुळे एसी ट्रेनच्या तुलनेत या ट्रेनचे दर कमी आहेत. त्यामुळे प्रवाशांना अमृत भारत मधून कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या एक्सप्रेस ट्रेन सुविधा मिळत आहे.अमृत भारतला गुजरात येथून सुरू केल्यानंतर प्रवाशांचे याला चांगले प्रतिसाद मिळाले.

त्यामुळे आता महाराष्ट्रात पुणे शहरातून उत्तर भारताकडे जाण्यासाठी 4 अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलेला आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे – दानापुर आणि पुणे ते छपरा.
नंतर हडपसर- मुजफ्फरपुर आणि हडपसर- पुरी एक्स्प्रेस ट्रेन.

विशेष म्हणजे मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यातील 20 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची सुरुवात केलेली आहे.हे पुनर्विकास प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण होतच पुणे मधून पहिल्या टप्प्यात पुणे – दानापुर आणि पुणे ते छपरा या दोन अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन धावतील.

यानंतर हडपसर- मुजफ्फरपुर आणि हडपसर- पुरी या दोन Amrit Bharat Express दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे.यासाठी आता पुणे आणि हडपसर रेल्वे स्थानकांचा विस्तारीकरण करण्याचे काम सुरू आहे.

असे राहणार Amrit Bharat Express चे तिकीट दर.

पुण्यामधून जे चार अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे त्यांचे प्रवास दर हे फार कमी राहणार आहे. विशेष म्हणजे या एक्सप्रेस ट्रेनची सुविधा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सारख्याच आहेत.

सध्या पुण्यामधून पुणे ते कोल्हापूर वंदे भरत एक्सप्रेस सुरू असून,त्याची सामान्य कोच मधील तिकीट दर हे 1160 रुपये आणि उच्च श्रेणीतील अर्थातच एसी आणि थ्री टीयर ची तिकीट दर 2005 रुपये इतकी आहे.

या तुलनेत Amrit Bharat Express ट्रेन ची तिकीट दर फार कमी राहणार आहे.मात्र या एक्सप्रेस ट्रेन चे प्रवासी कोच हे वंदे भारत एक्सप्रेससारखेच राहणार आहे.

रेल्वे मंत्री रेल्वे बोर्डात चर्चा.

पुणे मधून चार Amrit Bharat Express ट्रेन सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव आणि महाराष्ट्रातील रेल्वे बोर्ड सोबत सध्या चर्चा सुरू आहे.पुणे येथून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहे,अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ता रामपाल बारपग्गा यांनी नुकतीच दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 − seven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.