Whatsapps Update 2025 : आधुनिक जग हे डिजिटल जग असून आता तंत्रज्ञानात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI चा विस्तार झाला आहे. यात व्हाट्सअप ची पालक कंपनी मेटा META आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून व्हाट्सअप मध्ये नवनवीन फीचर्स लॉन्च करीत आहेत.
गेल्या काही दिवसात व्हाट्सअप मध्ये अनेक नवीन फीचर्स WhatsApp New Feature आली आहेत.मात्र आता यामध्ये एक धमाकेदार असा नवा व्हाट्सअप फीचर आला आहे. WhatsApp मधील या ट्रिक मधून तुम्हाला कोण ट्रेक Track करीत आहे हे जाणून घेणे सोपे बनले आहे.
विशेष म्हणजे व्हाट्सअप हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेज ॲप आहे यात चॅटिंग व्हॉइस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग,डॉक्युमेंट शेअरिंग,कंटेंट अपलोडिंग डाउनलोडिंग,विविध बँक माध्यमांसाठी ऑनलाईन पेमेंट, यासारख्या अनेक सुविधा मिळत आहेत व्हाट्सऍप ला जगात संचलन होताना अनेक वर्ष उलटली आहे.
मात्र याची पेरेंटल कंपनी मेटा META त्यात दर महिन्यात नवीन अपडेट्स आणि आकर्षक फीचर्स आणत आहेत. जे युजर्स साठी सुविधा जाणा झालेले आहे.यात मेटा कंपनीने गेल्या महिन्यात व्हाट्सअप युजर साठी अनेक नवीन फीचर्स आणलीत.या बाबत आपण या माध्यमातून जाणून घेऊया.
Whatsapp सुरक्षितता आणि गोपनीयता बाळगणारा ॲप.
उल्लेखनीय म्हणजे व्हाट्सअप मेसेज ॲप हा युजर साठी सुरक्षितता आणि गोपनीयता बाळगणारा ॲप आहे. यासाठी यात विविध फीचर्स आहेत. यामुळे जगभरात 3.5 बिलियन पेक्षा जास्त नागरिक व्हाट्सअप चा वापर करतात. वर्तमान काळात व्हाट्सअप प्लॅटफॉर्मवर यूजरना अनेक Advanced Features Facilities मिळत आहे.
आता व्हाट्सअप ने लाईव्ह लोकेशन फीचर्स सुरू केले आहे.याच्या मदतीने व्हाट्सअप युजर्स लाईव्ह लोकेशन Live Location देवू शकणार आहे.त्यामुळे संबंधित व्यक्ती तुम्हाला ट्रॅक करू शकणार आहे.आणि तेही अगदी सहजपणे.
Whatsapp चे हे फीचर जरी खूप सोयीस्कर असले तरी हे फीचर वापरताना एखादी चूक मोठे नुकसान सुद्धा करू शकते, याचे कारण म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याकडे येते यापूर्वी त्याला लोकेशन माहीत नसते.
कॉल करून किंवा कोणत्याही माध्यमातून ती व्यक्ती आपला लोकेशन विचारतो व्हाट्सअप मध्ये या फीचर्स मुळे जर लाईव्ह लोकेशन शेअर करून नंतर ते बंद करायला विसरला,तर यामुळे गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे हा फीचर्स कसा वापरावा,आणि याची व्हाट्सअप मध्ये काय प्रोसिजर आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
लाईव्ह लोकेशन पाठवले असेल तर वापरा ही सतर्कता.
- व्हाट्सअप चे हे नवीन लाईव्ह लोकेशन फीचर्स वापरताना
सर्वात आधी व्हाट्सअप यूजर चे लोकेशन कुणाला दिलेले आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात पहिले व्हाट्सअप ऍप्लिकेशन वर जावे लागेल. - यात डिस्प्लेवर दिसणारे तीन डॉट मेनू आयकॉन वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर सेटिंग ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- थोडा खाली स्टोर केल्यास लोकेशन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर लोकेशन वर क्लिक करतात लाइव लोकेशन कोणाला पाठवले आहे हे कळेल येथून लाईव्ह लोकेशन बंद करण्याचा पर्याय आहे.
विशेष म्हणजे व्हाट्सअप चे हे नवीन फीचर्स वापरताना सजगता आणि सतर्कता या दोन्हीही बाबी बाळगावी लागेल. कारण व्हाट्सअप मध्ये लाईव्ह लोकेशन वापरल्यानंतर हे पर्याय बंद न केल्यास कोणीही व्हाट्सअप मधून व्हाट्सअप युजरला सहजरीत्या ट्रॅक करू शकणार आहे.
पण हे तेव्हा होईल जेव्हा तुम्ही कुणाला लाईव्ह लोकेशन पाठवले असेल आणि नंतर ते बंद करायला विसरला तर. व्हाट्सअप मध्ये हे एक सीक्रेट फीचर आहे.याच्या मदतीने लाईव्ह लोकेशन कुणाला पाठवले आहे हे सहज ओळखता येईल.