Vermicompost Project : शेतकऱ्यांनो, एका वर्षात कमवा दहा लाख रुपयांचा नफा!

शेतकऱ्यांनो एका वर्षात कमवा दहा लाख रुपयांचा नफा! जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा हा व्यवसाय कोणता ?

Vermicompost Project : महाराष्ट्रातील शेतकरी प्राकृतिक आपत्ती आणि पिकांच्या बरबादीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली असताना महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मात्र दुसरीकडे सरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी विविध योजना राबवित असते. तर दुसरीकडे आता शेतकरी शेती करताना शेती आणि शेती उत्पादनासाठी पूरक व्यवसाय आणि इतर जोडधंदे करून उदरनिर्वाह करीत आहेत. अनेक शेतकरी असे शेती पूरक व्यवसाय करून भक्कम नफा सुद्धा कमवित आहेत.

महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी विविध शेती प्रकल्पातून आपल्या चांगले असे उत्पन्न सुरू केलेले आहेत यापैकी गांडूळ खत प्रकल्प अर्थातच वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट ( Vermicompost Project) सध्या फायद्याचा व्यवसाय झाला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत प्रकल्प निर्मिती करून त्यातून उत्पन्न घेत आहेत,आणि त्यात चांगला असा नफा मिळवित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय उत्तम पर्याय आहे.

फक्त 40 ते 50 हजार रुपये गुंतवणूक करून कोणीही हा प्रकल्प सुरू करू शकतो.यातून दोन वर्षात वार्षिक 8 ते 10 लाख रुपयांची उत्पन्न मिळण्याची हमी मिळते.

असे तयार करा गांडूळ खत प्रकल्प.

गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी शेतामधील जागा सुद्धा उपयुक्त असते. माती मध्ये गांडूळ सोडून आणि काही प्रक्रिया करून हे शेती उत्पादनासाठी हे खत तयार होते.सुरुवातीला गांडूळ प्रकल्प उभारताना 20 बेडची तयारी करावी लागते. यात प्रत्येक बेड हा साधारण 1.5 ते दोन मीटर लांब आणि रुंद असते.

जमिनीवर गड्डा करून किंवा प्लेन जमिनीवर ताडपत्री शेणखत,आणि माती पसरवून, त्यामध्ये किमान 100 किलो गांडूळे मिसळून एका महिन्यातच हा सेंद्रिय खत तयार होते.शेतीला पौष्टिक असा हा खत तयार होते.गांडूळ खत शेतीतील मतिल्स पोषक तत्त्वांचा पुरवठा करून पीक उत्पादनात सुधारणा करण्यास योग्य राहते.

काय आहे गांडूळ खताचा फायदा.

शेतकऱ्यांसाठी शेती करताना पीक उत्पादन चांगले घेण्यासाठी गांडूळ खत फायदेशीर आहे. या खतामुळे मातीची जलधारण क्षमता सुधारते तसेच मातीमधील असलेल्या पोषक तत्वांची घनता वाढते. शिवाय जमिनीचा पोत निरंतर टिकून राहते.

पिकांसाठी गांडूळ खत उत्तम राहते,कारण पिकांच्या वाढीसाठी यात हार्मोन्स तयार होतात.गांडूळ खत वापरल्याने शेतकऱ्याला रासायनिक खत वापर करण्याची गरज राहत नाही अगदी कमी खर्च आणि सोपी प्रक्रिया आणि या व्यवसायातून जास्त नफा मिळतो. यामुळे राज्यभरात अनेक शेतकरी आता गांडूळ खत प्रकल्प तयार करून जोड व्यवसाय करीत मुनाफा घेत आहेत.

मोठ्या प्रमाणात विक्री होते गांडूळ खत.

गांडूळ खत खरेदी करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या शेतकऱ्यांची राहते आपल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना गांडूळ खताची गरज असते,याव्यतिरिक्त नर्सरी व्यवसायीआणि फळे, पालेभाजी आणि फुलांची शेती करणाऱ्यांसाठी गांडूळ खत हा गरजेचे असतो, त्यामुळे शेतकरी आणि इतर शेती व्यवसायीक थेट प्रकल्पातून गांडूळ खताची खरेदी करतात.त्यामुळे हा जोड व्यवसाय सुरू केल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांचा फायदा मिळतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 + 9 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.