New Vehicle Purchasing Policy : नवे वाहन खरेदीपूर्वी जाणून घ्या हे नवे धोरण!

New Vehicle Purchasing Policy : नव्या वर्षात नवी कार खरेदी करण्याच्या अपेक्षेवर अनेकांचा हिरमोड होऊ शकतो.कारण नवे वाहन खरेदी करण्यासाठी राज्य सरकार नवे धोरण आणत आहेत. यात नवी कार किंवा इतर नवे चारचाकी भारी वाहन,आलिशान कार पार्किंग साठी काही नियम बनविण्यात येणार आहेत.

नवे वाहन घेण्यापूर्वी पुरेशी पार्किंग जागा असणे आता नियमांनुसार खूप गरजेचे राहणार आहे.त्यामुळे आता स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नवी कार खरेदी करणे आणि सेकंड हॅन्ड कार घेण्यासाठी आता या नियमांचे पालन करावाच लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राज्य सरकारने नवे धोरण आणि यात नियम बनवून येणाऱ्या काही दिवसात वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याची योजना बनविली आहे.यासाठी सरकार आणि राज्य परिवहन विभागाने प्रादेशिक परिवहन विभागांना सूचना दिलेल्या आहेत.

विशेष म्हणजे जपान देशात वाहनांच्या नियंत्रणासाठी जी पॉलिसी आहे ती आता महाराष्ट्रात राबविली जात असल्याची चर्चा आहे.मयासाठी महाराष्ट्र सरकारने एक एक्शन प्लान बनविला आहे. राज्य सरकारचे वाहन खरेदीसाठी कोणत धोरण आहे,आणि नवीन वाहन खरेदी करण्यासाठी कोणत्या नियमांचा पालन करावा लागेल, या हे आपण आता या माध्यमातून जाणून घेऊया.

पार्किंग समस्या,इंधनाचा अमर्याद वापर,अपघात रोखण्यासाठी नवे धोरण.

राज्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे.यामुळे वाहतूक खोळंबा निर्माण होत असून अनेक ठिकाणी अपघात होत आहेत तर दुसरीकडे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन पार्किंगसाठी रस्त्यांवर जागा कमी होत आहेत.

रस्त्या अपघात विविध प्रकारच्या इंधनाचा अमर्यादित वापर अशा गोष्टींवर पूर्णतः निर्माण आणण्यासाठी जो धोरण आहे त्यात एकूणच नव्या वाहन खरेदीवर नियंत्रण आणून अशा समस्या दूर होऊ शकतात असा राज्य शासनाचा मानस आहे त्यामुळे आता वाहन खरेदीवर थेट नियंत्रण आणला जाणार आहे जपानच्या धर्तीवर महाराष्ट्रात हे नवी धोरण राबविले जाऊ शकते.

जपानमध्ये वाहन खरेदी करण्यापूर्वी काय आहे पॉलिसी?

आधी जाणून घ्या की जपानमध्ये नवं वाहन खरेदी करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागते.तर तेथे वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहन कंपनी आणि स्थानिक प्रादेशिक परिवहन प्रशासनाला माहिती द्यावी लागते की कार किंवा इतर वाहन पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे किंवा नाही.याची चौकशी प्रशासन कडून केली जाते.जपानमध्ये वाहन खरेदी करण्यासाठी आणि ड्रायव्हिंग साठी कडक असे नियम आहेत.

त्यामुळे तेथे अपघातांची संख्या कमी होते,आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था चालत असते.त्यामुळे महाराष्ट्राने जपान मधली ही पॉलिसी राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी धोरण बनविणे परिवहन विभागाने सुरू केले आहे. यातून दर दिवशी वाढणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या खरेदीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाय करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे सरकारने राज्यात वाहनांची पार्किंग समस्या लक्षात ठेवून जपानच्या पॉलिसीवर अभ्यास केला आहे. तेथील विशेषज्ञ आणि इतर शासकीय संस्थांसोबत चर्चा करण्यात आली असून, लवकरच याचा अहवाल मिळाल्यानंतर या धोरणाला महाराष्ट्रात हिरवा कंदील मिळणार आहे.

महाराष्ट्रात वाहन खरेदी पूर्वी दाखवावी लागेल पार्किंगची जागा.

उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रात दरवर्षी साधारणतः 8 टक्के फरकाने विविध प्रकारचे कार आणि इतर वाहन खरेदीचा वेग वाढल्याने वाहनांचा संख्या प्रमाणही वाढला आहे.यामुळे महाराष्ट्रातील सर्व शहरात नवीन वाहनतळ,आणि सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंग सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

वाहनांचा वाढता खप आणि भविष्यात वाहनांची वाढती मागणी पाहता,पुढे वाहनांसाठी पार्किंग सुविधा अपुऱ्या पडू शकतात.त्यामुळे यासाठी राज्यात नव्या धोरणाची गरज असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.यासाठी हे वाहन खरेदी साठी नवीन धोरण बनविले जात आहे.

यामुळे आता नवे वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहन पार्किंगसाठी तुमच्याकडे पुरेशी जागा आहे किंवा नाही हे प्रादेशिक परिवहन विभागाला माहिती द्यावी लागेल,अन्यथा नवीन कार आणि इतर वाहने खरेदी केल्यानंतर पार्किंगची समस्या आणि इतर बाबी उद्भवू शकतात.

त्यामुळे आता नवे वाहन नियमानुसार खरेदी करावे लागणार आहे.अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना आणि कामकाजी लोकांना नवी कार किंवा इतर वाहने खरेदी करणे अशक्यप्राय होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nine + three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.