सध्या चीन मध्ये HMPV Virus “ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस”(Human Metapneumovirus) हा वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत असतानाच जगात आलेल्या या नवीन एचएमपीव्ही विषाणूबाबत भारताही भीतीचे वातावरण दिसत आहे. याचे कारण म्हणजे मागील दोन दिवसात भारतात 3 प्रकरणे नोंदविण्यात आली आहे.
यामुळेच या विषाणसंदर्भात विविध चर्चा वाढल्या आहेत.मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR (इंडियन मेडिकल रिसर्च काऊन्सिल)ने यावर आपले स्पष्टीकरण सार्वजनिक केले आहे.त्यानुसार हे विषाणू किती धोकादायक आहे आणि त्यावर सध्या भारतात उपचार प्रणाली काय आहे,याबाबत विस्तृत माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ICMR ने भारतात HMPV Virus ची केली पुष्टी केली.
ICMR ने भारतात पुष्टी केली आहे की, चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे 3 प्रकरण भारतातही आढळले आहेत. Human Metapneumovirus हे 3 प्रकरण कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि राजस्थान मध्ये समोर आले आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका नवजात बालकाला याची लागण झाली होती,मात्र त्यावर उपचार करून हा नवजात बालक बरा होऊन घरी गेला आहे.तर इतर दोन case ही नॉर्मल आहेत.
देशात ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की भारतात या विषाणूबद्दल घाबरण्याची काहीच गरज नाही.यावर योग्य उपचार आणि नियंत्रणासाठी प्रणाली सशक्त आहे.या संबंधात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक (आरोग्य सेवा)डॉ. अतुल गोयल यांच्या मते, एचएमपीव्ही हा विषाणू तसा नवीन नाही भारतासह जगातील सर्व देशांमध्ये हा व्हायरस दीर्घकाळापासून सक्रिय आहे.सामान्य न्यूमोनिया व्हायरसप्रमाणे असलेल्या या विषाणूचा संसर्ग बहुतांशी हिवाळ्यात वाढतो, परंतु सध्या भारतात त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे सध्या नाहीत.
भारतात या HMPV Virus पसरण्याबाबत चिंता का?
गेल्या काही दिवसांत चीनमध्ये एचएमपीव्हीव्ही या विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, भारतातही त्याच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.याचे कारण आहे, गेल्या दोन दिवसात भारतात या विषाणूमुळे तीन आणि आठ महिन्याच्या बालकाला आढळून आलेला संसर्ग.
या बालकांवर भारतात योग्य ते उपचार करण्यात आलेले आहे. आयसीएमआर. आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की जरी हे संसर्ग या बालकांमध्ये दिसून आला मात्र एकूण तिन्ही केस मध्ये कोणीही चीनला जाण्याची कोणतीही नोंद नाही.
भारतात आढळून आलेली ही तिन्ही प्रकरणे ICMR च्या नियमित निरीक्षणाद्वारे समोर आली आहे.उल्लेखनीय म्हणजे न्यूमोनियाच्या काही प्रकरणांमध्ये, विषाणू संसर्गाचे परीक्षण करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात, जेणेकरून अश्या संसर्गास कारणीभूत असलेले व्हायरस अचूकपणे ओळखता यावे.
बेंगळुरूमधील दोन्ही नवजात बालकांना ” झाला होता, उपचारादरम्यान त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, जिथे HMPV च्या संसर्गाची पुष्टी झाली.
भारतात हा HMPV Virus नवीन नाही.
देशाच्या आरोग्य मंत्रालयानुसार सध्या चर्चात असलेला एचएमपीव्ही HMPV हा विषाणू तसा भारतात नवीन नाही, आणि परंतु तो बऱ्याच काळापासून जगभर पसरलेला आहे. चीनमध्ये या व्हायरसची काही लोकांना लागण झाल्यानंतर भारतातसुद्धा,गेल्या दोन दिवसांत 3 आणि 8 महिन्यांच्या नवजात बालकांसह एकूण 3 जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.मात्र याबाबत घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMRआपल्या सार्वजनिक निवेदनातून म्हटले आहे.
हिवाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो.
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले आहे की, हिवाळ्याच्या ऋतूत न्यूमोनिया या विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असते.याचा वृद्ध आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर जास्त परिणाम दिसतो.सध्या, न्यूमोनिया विषाणूच्या संसर्गामुळे सर्दी आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांशी संबंधित आजारांवर संपूर्ण देशभर निरीक्षण केले जात आहे, परंतु देशात आतापर्यंत त्यात कोणतीही तीव्र वाढ झाल्याचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत.
तर दुसरीकडे हिवाळ्यात साधारणतः सर्दी आणि श्वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढतात. याची ICMR कडे वार्षिक आकडेवारी असते.त्यामुळे आताही यासंदर्भात तेवढेच रुग्ण आताही समोर येत आहेत. HMPVV च्या संसर्गाबाबत जी उपचार प्रणाली आहे.ते भारतात सक्रिय आहे,आणि हा न्यूमोनियल विषाणूबाबतीत देशात सर्व ठिकाणी योग्य अशी उपचार प्रणाली मजबूत आहे.आणि हा संसर्ग उपचार करण्यायोग्य आहे.त्यामुळे याबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
काय म्हणाले केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी.नड्डा.
देशात HMPVV विषाणू संसर्ग बद्दल सुरू असलेल्या चर्चा आणि अफवा दरम्यान सोमवारीच केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी यासंदर्भात एक विशेष असा निवेदन जारी करण्यात आला. त्यात हा विषाणू भारतात नवीन विषाणू नाही, यापूर्वीही असे प्रकरण नोंदवले गेले आहेत.’एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांनीही स्पष्ट केले आहे.हे विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये आढळून आल्यानंतर त्याची ओळख झाली होती.आणि यानंतर तो अनेक वर्षांपासून जगभरातील विविध देशात यापूर्वीच आढल्या गेला.
HMPV Virus हवेतून पसरतो.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एचएमपीव्ही हा विषाणू हवेतून मानवी शरीरात श्वासाद्वारे पसरतो.सोबतच तो सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते. विशेषत्वाने हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात हा विषाणू अधिक वेगाने पसरतो. चीन नंतर भारतात आता काही प्रकरण समोर आल्यानंतर, चीनमधील एचएमपीव्ही प्रकरणांच्या अलीकडील अहवालांच्या पार्श्वभूमीवर, भारतात आरोग्य मंत्रालयासह आयसीएमआर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल हे प्राधिकरण आता चीन तसेच शेजारील देशांमधील एकूण संसर्ग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
WHO ने या विषाणू संदर्भात भारतात परिस्थितीची दखल घेतली.
वैश्विक आरोग्य संघटना ‘WHO ने या विषाणू संदर्भात परिस्थितीची दखल घेतली आहे, लवकरच त्याचा अहवाल आणि देशानुसार आकडेवारी ही वैश्विक संघटना भारतासोबत शेअर करेल. दरम्यान त्याच्याकडून ICMR आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्रामकडे उपलब्ध असलेल्या व्हायरससाठी देशातील डाटा पुनरावलोकन करण्यात आले आहे.सध्या भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू जन्य प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.सोबतच भारतात या संसर्गाची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 4 जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठकही झाली आहे.
सरकार आणि आरोग्य मंत्रालय ‘अलर्ट’
दरम्यान सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, देशाची आरोग्य यंत्रणा आणि अश्या संसर्गजन्य विषाणूंवर पाळत ठेवणारे नेटवर्क देशात अलर्ट मोड वर असून ते सतर्क आहेत, त्यामुळे भारत कोणत्याही सार्वजनिक आरोग्य आव्हानांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे या विषाणू संदर्भात भारतात काळजी करण्यासारखी काहीच स्थिती नाही आणि आरोग्य मंत्रालय, आणि इतर सर्व आरोग्य प्राधिकरण पूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.